महाराष्ट्रात सरड्यांचे अच्छे दिन आलेले आहे, सरडे या झाडावरून त्या झाडावर उडी मारीत आहे.
(१)
जेंव्हा त्यांच्या झाडावर होता
तेंव्हा सरडा भ्रष्टाचारी होता.
जेंव्हा सरडा अमुच्या झाडावर आला
आमच्याच सारखा इमानदार झाला.
(२)
जिभेच्या स्वाद पायी
मधुर फळांची मैत्री जोडी.
अहंता स्वताची त्यागुनी
सरडा झाला रंगनिरपेक्षी.
काही म्हणी:
जिथे सरडा, तिथे सत्ता
उंदीर आणि सरडा, बुडते जहाज सोडती
सरडा येई घरा, तोच दिवाळी दसरा
सरड्याचे अनुकरण करा, सत्तेचे सुख भोगा.
— विवेक पटाईत
Leave a Reply