25 ऑगस्ट 1928 रोजी लंडनच्या हॅमरस्मिथ नावाच्या उपनगरात जन्मलेल्या केनेथ जॉर्ज सटलच्या नावावर एक अतिशय लांबलचक आणि गंभीर विक्रम आहे. 1953-54च्या हंगामात वेस्ट इंडीजच्या दौर्यावर गेलेल्या इंग्लिश संघात तो होता पण तो कधीही कसोटी सामना खेळला नाही की एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दिसला नाही. हा होता ससेक्सचा सलामीवीर. डावखुरा फलंदाज आणि डावखुरा पारंपरिक मंदगती गोलंदाज. 1949च्या हंगामात त्याचे प्रथमश्रेणी पदार्पण झाले ससेक्सकडून. 1954 ते 1969 या 15 वर्षांच्या कालावधीत ससेक्स संघाने काऊंटी चॅम्पिअनशिप स्पर्धेत खेळलेल्या सर्वच्या सर्व 423 सामन्यांमध्ये केनचा संघात ‘खेळणार्या अकरा’मध्ये समावेश होता! ओळीने 15 वर्षांत 4-2-3 सामने! 1953 ते 1969 या कालावधीतील (सलग) 17 हंगामांमध्ये 1,000 धावा काढण्याचा पराक्रम त्याने केलेला आहे.
एकूण 612 प्रथमश्रेणी सामन्यांमधून त्याने 30,225 धावा काढल्या 49 शतके आणि 156 निमशतकांसह.
25 ऑगस्ट 1995 रोजी ब्रिटानिक अॅश्युरन्स काऊन्टी चॅम्पिअनशिप स्पर्धेत ग्लॅमॉर्गनविरुद्ध एबरगॅवनीच्या मैदानावर खेळताना अॅन्ड्र्यू सायमंड्सने पहिल्या डावात नाबाद 254 धावा काढल्या. या खेळीदरम्यान त्याने 16 षटकार लगावले. प्रथमश्रेणी सामन्याच्या एका डावासाठी हा विक्रम आहे. दुसर्या डावात 76 धावा काढून सिम्मो बाद झाला पण यातही त्याने 4 षटकार लगावले होते. एका प्रथमश्रेणी सामन्यात 20 षटकार हा विक्रम सिम्मोने आपल्या नावावर करून घेतला. एक जीवशास्त्रीय पालक कॅरिबिअन पार्श्वभूमीचा, जन्म इंग्लंडमध्ये, मग दत्तक जाणे, कांगारूंच्या भूमीत स्थायिक – सिम्मोचा जीवनप्रवास खळबळजनक आहे लेकिन उसका जायजा फिर कभी.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply