युद्धप्रसंगी किवा अन्य वेळी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी लष्करातील शूर वीरांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवले जाते. अलीकडे सैन्यातील वैद्यकीय अधिकारी मेजर लैशराम सिग यांना अशोकचक्र तर कॅप्टन देविदर सिग जस आणि सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस विनोदकुमार चौबे यांना
कीर्तीचक्र मरणोपरांत प्रदान करण्यात आले. देशासाठी प्राणाची आहुती देणारे हे वीर नेमके कसे होते ? त्यांनी कोणते बलिदान दिले.
सैन्यदलांमध्ये भूषणावह कामगिरी केलेल्या जवानांना परमवीर चक्रापासून कीर्ती चक्रापर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. त्यासाठी त्या वर्षीच्या त्यांच्या कामगिरीचा विचार केला जातो. स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते या जवानांना गौरवण्यात येते. या वेळी मेजर लैशराम ज्योतिन सिग यांना मरणोपरांत अशोकचक्र प्रदान करण्यात आले. युद्ध सुरू नसताना शांतता प्रस्थापित करण्याच्या काळात जवानांना देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे तर कीर्तीचक्र हा या काळातील दुसर्या क्रमांकाचा महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो. परवाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कॅप्टन देविदर सिग आणि छत्तीसगडमधील सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस श्री. विनोदकुमार चौबे या दोघांना कीर्तीचक्र मरणोपरांत प्रदान करण्यात आले.
अशोकचक्र मिळवणार्या मेजर लैशराम यांची कहाणी प्रेरणादायी आहे. १४ मे १९७२ रोजी जन्मलेल्या मेजर लैशराम यांचे शालेय शिक्षण मणिपूरमध्ये झाले. ते मणिपूर पब्लिक स्कूलचे हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात. लहानपणीच त्यांनी वैद्यकीय शिक्षण घ्यायचे ठरवले होते. १९९६ मध्ये मणिपूरची राजधानी असलेल्या इंफाळ येथील रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेतून पदवी घेऊन ते बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी २००१ मध्ये पटियाला येथील नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोट्र्स या संस्थेतून स्पोट्र्स मेडिसिन या विषयात पदव्युत्तर पदविका मिळवली.
१५ फेब्रुवारी २००३ रोजी त्यांची सैन्याच्या वैद्यकीय दलात शॉर्ट सव्र्हिस कमिशन्ड ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली. २६ एप्रिल २००७ रोजी त्यांचे परमनंट
कमिशनिग झाले. त्यांनी एका प्रकल्पांतर्गत भारतीय सीमेच्या दुर्गम आणि उंच प्रदेशांमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहिले तसेच अतिरेक्यांविरुद्ध कारवाई सुरू असलेल्या भागातील एका सैनिकी रुग्णालयातही काम केले. हा कालावधी सहा वर्षांचा होता. सैनिकी डॉक्टर म्हणून त्यांची कारकीर्द लहानच असली तरी प्रेरणादायी आहे.
सहा वर्षांच्या अनुभवानंतर त्यांची अफगाणिस्तानात काबूल येथील इंडियन मेडिकल मिशनमध्ये निवड झाली. त्यानुसार १३ फेब्रुवारी २०१० पासून ते काबूलमध्ये कार्यरत होते. काबूलला गेल्यानंतर १३ दिवसांनीच त्यांना अशोकचक्र मिळवून देणारा; परंतु प्राण घेणारा क्षण आला. या दिवशी सकाळी साडेसहा वाजताच काबूलमधील भारतीय दुतावासाच्या निवासी संकुलावर अतिरेक्यांनी ४ हल्ला केला. या वेळी तेथे सहा सैनिकी वैद्यकीय अधिकारी, चार वैद्यकीय मदतनीस आणि इंग्लिश लँग्वेज ट्रेनिंग टिमचे दोनसैनिकी अधिकारी उपस्थित होते. त्यांच्यावर सशस्त्र आत्मघातकी अतिरेक्यांनी जोरदार हल्ला चढवला. एका अतिरेक्याने बाहेरउभ्या असलेल्या स्फोटकांनी भरलेल्या एका गाडीचा स्फोट घडवून आणल्यानंतर तीन सुरक्षारक्षकांचा बळी गेला. त्यानंतर हा
अतिरेकी या हल्ल्यातून वाचलेल्यांना ठार करण्यासाठी आत शिरला. त्याच्याकडे अत्याधुनिक कॅल्श्निकोव्ह ही बंदूक होती. त्यातून तो प्रत्येक खोलीत जाऊन अंदाधुंद गोळीबार करत होता. त्याचबरोबर त्याचे हातातील ग्रेनेड्स फेकणेही सुरू होते. दरम्यान, पाच निःशस्त्र भारतीय सैनिकांनी एका खोली आश्रय घेतला. या खोलीवर ग्रेनेड हल्ला केल्यानंतर छताला आग लागली आणिबाथरूमपर्यंत पसरली. बाथरूममध्ये आणखी पाच अधिकार्यांनी आश्रय घेतला होता. पाच अधिकार्यांचे ओरडणे ऐकून मेजर लैशराम त्यांच्या खोलीतील ढिगार्यातून रांगत बाहेर आले. निःशस्त्र असलेल्या लैशराम यांनी त्या अतिरेक्यावर हल्ला करून त्याला खाली पाडले आणि तो ग्रेनेड हल्ला करू शकणार नाही तसेच भारतीय अधिकार्यांवर गोळीबारही करू शकणार नाही याची काळजी घेतली. त्यांनी या अतिरेक्याला घट्ट धरून ठेवले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे तो अतिरेकीही गोंधळून गेला. शेवटी त्याने स्वतःच्या शरीरावर लावलेल्या बॉम्बचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात अतिरेकी आणि मेजर लैशराम यादोघांचाही तत्काळ बळी गेला. बाथरूममध्ये अडकलेल्या पाच सहकार्यांचा जीव वाचवण्यासाठी मेजर लैशराम यांनी स्वतःचे बलिदान दिले, पण दुर्दैवाने त्या पाच सहकार्यांपैकी एकाचा भाजून मृत्यू झाला तर दुसर्याचा पाच दिवसांनी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. लैशराम यांच्यामुळे दोन अधिकारी, चार वैद्यकीय मदतनीस आणि दोन अफगाणी नागरिकांचेही प्राण वाचले. त्यांनी
दाखवलेल्या अतुलनीय शौर्य आणि निःस्वार्थी भावनेमुळे दहा सहकार्यांचे प्राण वाचले. या कामगिरीमुळे त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते मरणोपरांत अशोकचक्र देऊन सन्मानित करण्यात आले.
(अद्वैत फीचर्स)
— महेश धर्माधिकारी
Leave a Reply