कोकणातील एका छोट्या खेड्यात जन्म घेतलेल्या एका युवकाने पुण्यात येऊन स्त्री शिक्षणाचे जे महान कार्य केले ते सगळ्यांनाच आदर्शवत ठरावे असेच होते. धोंडे केशव कर्वे हे त्या तरुणाचे नाव. ज्या काळात स्त्री शिक्षण, विधवा विवाह यांसारख्या गोष्टींना समाजातून तीव्र विरोध होता, अशा काळात धोंडो केशव कर्वे यांनी एक व्रत म्हणून समाजसेवेचे हे कार्य आरंभिले. शारीरिक कष्टाची कसलीही तमा न बाळगता त्यांनी हे कार्य केले. ऊन असो, पाऊस असो की कडाक्याची थंडी असो ते कोठेही पायी जात आणि आपल्या कार्यासाठी मदत म्हणून कोणाकडूनही फक्त एक रुपयाची देणगी घेत असत. अर्थात त्याची रीतसर पावती घेऊनच. त्या काळी एक रुपयापेक्षा जास्त देणगी देणारे लोक होते. परंतु अण्णासाहेब कर्वे यांचा देणगी म्हणा एक रुपयाच घेण्याचा आग्रह असे. एकदा ते असेच गोरे नावाच्या सरकारी वकिलाकडे भल्या सकाळीच गेले. त्यांच्यामुळे अर्थातच गोरेसाहेबांची झोप मोडली होती. परंतु तरीही त्यांनी अण्णांचे स्वागत केले. अण्णांनी जेव्हा एक रुपया देणगीचा प्रस्ताव मांडला, तेव्हा ते म्हणाले,”एक रुपया कशाला? मी तुमच्या कार्याला एकरकमीच देणगी देतो. ” त्यावर अण्णासाहेब कर्वे त्यांना नम्रतेने म्हणाले, की ‘ ‘गोरेसाहेब मला माझ्या कार्यात प्रत्येकाचा सहभाग करून घ्यायचा आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीकडून अथवा एका कुटुंबाकडून फक्त एकच रुपया देणगी घेण्याचे मी ठरविले आहे. त्यासाठी माझी कितीही पायपीट झाली तरी चालेल मी ती आनंदाने करीन. ” गोरे साहेबांना त्यांच्या या प्रांजळ निवेदनाचे खूप कौतुक वाटले. त्यांनी त्यांना एक रुपयाची देणगी दिली. त्यासरशी अण्णासाहेब दुसऱ्या घरी जायला निघाले. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांनी अतिशय प्रतिकूल काळात लावलेल्या स्त्री-शिक्षणाच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे.
Be the first to comment
महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य
राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत
अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...
अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर
अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
Leave a Reply