“सिद्धीदात्री” मा दुर्गेचे नववे स्वरुप ! “सिध्दगन्धर्वयक्षाद्दैरसुरैरमरैरपि । सेव्यमाना सदा भूयात् सिध्दीदा सिध्दिदायिनी ।।” अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासुन सुरु झालेल्या नवरात्रोत्सवाच्या आराधनेचा हा शेवटचा दिवस होय. चराचरांत वास करणार्या आदीशक्तीच्या उपासनेचा नववा दिन, अष्टसिध्दीची स्वामीनी माँ सिध्दीदात्री च्या आराधनेचा शुभदिन. भगवती सिध्दीदात्री च्या उपासनेने साधकांचे निर्वाणचक्र जागृत होते. मार्कंडेय पुराणानुसार आठ सिध्दी आाहेत. अणिमा, महिमा, गरिमा, लघिया, प्राप्ति, प्रकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिधदींची स्वामीनी असल्याने, तसेच मनुष्याला धर्म अर्थ काम व मोक्ष या चर्तुविध पुरुषार्थांचे दान देणारी म्हणुन “सिद्धीदात्री” होय. काही ठिकाणी सिध्दीदा असेही संबोधले जाते. सकल मनोरथ पुर्ण करणारी, मोक्षदायक, चर्तुभूज माता “सिद्धीदात्री” कमळावर विराजमान आहे. मातेच्या उजव्या हातांत चक्र आणि गदा असुन, डाव्या हातांमध्ये शंख व कमळपुष्प आहे. नवरात्रात देवीने आपल्या वेगवेगळया रुपांत चंड-मुंड, शुंभ-निशुंभ, रक्तबिज, महिषासुर आदी लक्षावधी दैत्यांचा विनाश केला, उरलेलया दैत्यांनी पाताळात पळ काढला. तेव्हापासुन भगवती अंबीकाच जगाचे पालानपोषन करते असा माता दुर्गेच्या भक्तांचा विश्वास आहे. महाप्रलयाच्या वेळी देवी महामारीचे रुप धारण करते, सनातन देवी प्राण्यांचे पालन करते. मानवाच्या भरभराटीच्या वेळी घरात लक्ष्मीच्या रुपात विराजते, तर अभावाच्या काळात दरिद्रता बनुन विनाशाला कारणीभूत ठरते. जल, स्थल, वायू, तेज, आकाशात तिचाच वास आहे, तिच्यापासुनच सृष्टीची उत्पत्ती होते. स्वर्ग आाणि मृत्युलोकाबाहेर ही तिचा वास आहे, हाच तिचा महिमा आहे. सिद्धीदात्री स्तोत्रपाठ कंचनाभा शखचक्रगदापद्मधरा मुकुटोज्वलो। स्मेरमुखी शिवपत्नी सिध्दिदात्री नमोअस्तुते॥ पटाम्बर परिधानां नानालंकारं भूषिता। नलिस्थितां नलनार्क्षी सिद्धीदात्री नमोअस्तुते॥ परमानंदमयी देवी परब्रह्म परमात्मा। परमशक्ति, परमभक्ति, सिध्दिदात्री नमोअस्तुते॥ विश्वकर्ती, विश्वभती, विश्वहर्ती, विश्वप्रीता। विश्व वार्चिता विश्वातीता सिध्दिदात्री नमोअस्तुते॥ भुक्तिमुक्तिकारिणी भक्तकष्टनिवारिणी। भव सागर तारिणी सिध्दिदात्री नमोअस्तुते॥ धर्मार्थकाम प्रदायिनी महामोह विनाशिनी। मोक्षदायिनी सिद्धीदायिनी सिध्दिदात्री नमोअस्तुते॥
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
Leave a Reply