नवीन लेखन...

सुट्टय़ांच्या काळात अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी प्रभावी मोहिमेची गरज – गृहमंत्री आर आर पाटील



दिवाळी आणि एप्रिल-मे महिन्यांच्या सुट्टय़ांच्या काळात राज्यात रस्ता अपघातांचे प्रमाण वाढलेले असते. दरवर्षी सुमारे १२ हजार इतक्या लोकांचे मृत्यू रस्त्यावरील अपघाताने होतात तर सर्वसाधारण ५० हजार लोक गंभीर जखमी होतात. त्यामुळे यावर्षी दिवाळीच्या सुट्टय़ांच्या काळात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी मोहीम हाती घेण्याची गरज गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी व्यक्त केली. रस्त्यांवरील अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री.पाटील बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक अरुण पटनायक, परिवहन आयुक्त डी.जी.जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय धवड, पोलीस अधीक्षक बी.जी.शेखर आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सुट्टय़ांच्या कालावधीत विशेषत: येत्या दिपावलीच्या सुट्टीत होणारे अपघात टाळण्यासाठी प्रभावी मोहीम हाती घेण्याची गरज असून आरोग्य, परिवहन, सार्वजनिक बांधकाम विभागासह स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन जनजागृती करण्याचे आवाहनही गृहमंत्र्यांनी यावेळी केले. २५ डिसेंबर ते ७ जानेवारी या कालावधीत राज्यात रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करणार असल्याची माहितीही गृहमंत्र्यांनी यावेळी दिली. अपघातात मृत्यू पावणार्‍यांमध्ये तरुणांची संख्या जास्त असून ही बाब चिंताजनक आहे. यासाठी लोकजागृती करणे आवश्यक असून परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनी महाविद्यालयात जाऊन प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना हजर राहणे अनिवार्य करण्यासंदर्भात महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र पाठविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वारंवार अपघात होणार्‍या ठिकाणी फलक लावण्याच्या सूचना देऊन जे चालक नियम पाळ

त नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी यावेळी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.श्री.पाटील म्हणाले, अपघात झाल्यानंतर लगेच रुग्णवाहिका मिळण्यासाठी ठोस उपाययोजना करुन तशी यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. चाळीस वर्षावरील चालकांचे डोळे तपासण्यासाठी सर्वत्र मोहीम हाती घेणे आवश्यक असून वाहन चालकांना परवाना देताना तसेच परवान्याचे नुतनीकरण करताना चालकाची डोळे तपासणी अनिवार्य करणे गरजेचे

आहे, असेही त्यांनी सांगितले.वाहन चालकाला परवाना

देण्याच्या पद्धतीचे राज्यात सर्वत्र संगणकीकरण करणे, जनजागृतीसाठी टोल नाक्याजवळ फलक लावणे, शिबिरे, कार्यशाळा, प्रथमोपचाराचे प्रशिक्षण, माहिती पत्रकांचे वारंवार वाटप, दूरदर्शन आणि रेडिओवर जाहिराती अशा सर्व माध्यमांद्वारे ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

— बातमीदार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..