गेल्या दोन दशकांमध्ये चरबी कमी करण्याबद्दलचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यालाच लायपोसक्शन म्हणतात. यामध्ये चरबी कायमची कमी करता येते व शरीरालापण सुडौल बनवता येते. समाजात वावरताना स्वाभिमानाने, आत्मविश्वाासाने वागता येते. सुडौल व तंदुरुस्त शरीर हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. नियमित व्यायाम करूनही काही व्यक्तींमध्ये जास्त चरबी असते. ती कुठेही असू शकते, तर काही विशिष्ट ठिकाणीही असू शकते. बराच व्यायाम आणि डाएटिंग करूनही ही चरबी घालवता येत नाही. आनुवंशिकता हे बऱ्याच वेळा कारण असू शकते. गेल्या दोन दशकांमध्ये चरबी कमी करण्याबद्दलचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यालाच “लायपोसक्शेन’ म्हणतात. यामध्ये चरबी कायमची कमी करता येते व शरीरालापण सुडौल बनवता येते. समाजात वावरताना स्वाभिमानाने, आत्मविश्वाीसाने वागता येते.
लायपोसक्शन म्हणजे काय?
कातडीखाली असलेली चरबी छोटीशी जखम करून त्यातून विशिष्ट नळीवाटे काढतात. हे दोन प्रकाराने केले जाते.
पॉवर असिस्टेड लायपोसक्सन
यात इलक्ट्रिकच्या साहाय्याने किंवा हवेच्या दाबाने विशिष्ट नळी सतत हलवत ठेवतात. त्यामुळे चरबी पातळ होते व बाहेर काढण्यास सोपे जाते.
अल्ट्रासाऊंड असिस्टेड लायपोसक्शेन
यात अल्ट्रासाऊंडच्या साहाय्याने चरबी काढली दाते. चरबी काढण्याअगोदर प्रथम सलाईन व त्याचबरोबर अड्रेनलीन टोचले जाते, ज्यामुळे रक्तस्राव कमी होतो. या प्रकाराने गाल, हनुवटी, मान, दंड, स्तन, पाठ, छाती, पोट, कंबर, बसण्याची जागा, मांडी, पायाचा खालचा भाग, घोट्याजवळची वगैरे ठिकाणची चरबी काढता येते. याच वेळी जरूर असेल तर फेसलिफ्ट, स्तनांचा आकार कमी करणे किंवा पोटाची चरबी कमी करता येते.
अपेक्षा
लायपोसक्शन हे वजन कमी करण्यासाठी ट्रीटमेंट म्हणून केले जात नाही. त्यासाठी व्यायाम व खाण्यावर बंधन हेच योग्य आहे. लायपोसक्शनमुळे चरबी कायमची कमी करता येते. जिथे ती जास्त आहे किंवा इतर शरीराच्या मानाने बेडौल दिसते आहे, अशा जागांमधून ती कायमची कमी करता येते.
योग्य व्यक्ती कोण?
ज्यांच्यात कातडीची स्थिती उत्तम आहे, स्नायू चांगले आहेत, एकूण आरोग्य ठीक आहे, जखम भरण्याची क्रिया उत्तम आहे, विडी, सिगारेट ओढत नाही किंवा कुठला आजार नसेल अशी तरुण व्यक्ती लायपोसक्शन करून घेऊ शकते.
ज्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे, ज्यांच्यापुढे विशिष्ट ध्येय आहे अशा व्यक्ती.
ब्लड प्रेशर, डायबेटिस किंवा हार्टडिसीझेस असलेल्या व्यक्तींचा वेगळा विचार करावा लागतो. तसेच ज्या जागेतून चरबी काढायची त्या जागेची जर काही शस्त्रक्रिया आधी झाली असेल तरीही विचार करावा लागतो.
प्रथम सुरुवात कुठे करणार?
प्रथम अस्थेटिक सर्जनबरोबर विचारविनिमय करा. लायपोसक्शीनमुळे शरीर कसे सुडौल करता येईल याबद्दल माहिती करून घ्या. त्याचे परिणाम, करण्याचे वेगवेगळे मार्ग समजावून घ्या व मगच विचार करा. त्याचप्रमाणे करण्याअगोदर तुमची खरीखुरी आरोग्याबद्दल माहिती तसेच चालू असलेली औषधी, ऍलर्जी, स्मोकिंग वगैरेबद्दल सर्जनला सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ. आशीष दावलभक्त, ऍस्थेटिक प्लास्टिक सर्जन, पुणे.
Leave a Reply