आय एस ओ आणि टेक्निकल सर्विसेस इन्चार्ज पदासाठी पदवीधरांचे इंटरव्यू चालू होते.” मनीष, तुला लक्षात आलं असेल की फर्स्ट क्लास पदवी असून तुला १० वी पर्यंतच्या अगदी बेसिक प्रश्नांची देखील उत्तरं येत नाहीयेत.याच कारण काय देशील ? ” GM दामलेंनी न राहवून विचारलं.'” सर, आमच्या कॉलेजची फाकल्टीच नीट नव्हती. शिवाय घरची परिस्थिती नसल्याने ट्युशन पण लावता आली नाही ” सहानुभूती गोळा करत मनीष भोसले म्हणाला.” अरे पण सेल्फस्टडीने ही उणीव भरता आली असती.असो, समज, तरीही तुला आम्ही घ्याचे ठरवले तर, कधी जॉईन होणार?” दामलेंना चांगले इंजिनिअर्स मिळत नसल्याच लपवता आल नाही. ” पण सर,स्टारटिंगला पगार किती देणार ? ” आपल्याला काही येत नाही या बद्दल काहीच वाटत नसल्याच स्पष्ट दिसत होत – वर पगारही विचारत होता. मराठी मुलांना झालय तरी काय? तसा निकाल लागल्या पासून तीन महिने जोबलेस होता, घरची परिस्थिती पण फार चांगली नव्हती.असो. ” सॉरी, मित्रा आम्ही तुला इ- मेलने कळवू – आल द बेस्ट , बाहेर कुणी असल्यास त्याला पाठवून दे.”
केतन पांचाल. हसतमुख, आनंदी, टेक्निकल प्रश्नांची उत्तरंही बऱ्या पैकी येत होती. इंग्लिश देखील चांगलं होत. अक्षरही चांगल होत.गुजराती असून मराठी पण चांगल बोलत होता.” केतन आम्ही जाहिरातीत आय एस ओ चा उल्लेख केला होता. आय एस ओ काय आहे सांगू शकशील ” दामल्यांनी विचारल. ” हो सर,गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली.खर तर हे सगळ संत तुकारामांनी कधीच सांगून ठेवल आहे. – बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले – किंवा – आधी केले मग सांगितले. थोडक्यात आधी आपली काम करायची पद्धत आणि
पद्धतीप्रमाणे काम करायचं ” ” अरे वा, आय एस ओ बद्दल बरीच माहिती दिसते
तुला.” दामलेंना झालेल्या आनंद हलक स्मित बनून ओठावर दिसत होता.” सर, खर सांगू इंटरव्ह्यू पूर्वी मी वेब साईट वरून तुमच्या कंपनीची माहिती काढली.भारतातील आय एस ओ मिळवणारी इंस्त्रूमेंट बनवणारी पहिली कंपनी. तुमच्या इथे पूर्वी काम करणारा काटकर माझ्या शेजारीच राहतो. त्यान मला तुमच्या येथे मिळणारी मोकळीक, टेक्निकल मार्गदर्शन , केलेल्या कामाच कौतुक, इथल्या अनुभवाची बाहेर किंमत इ सर्वच माहिती दिली.” केतनन एका दमात सांगितलं.
” म्हणजे तुला आय एस ओ आणि आमची कंपनी दोन्ही बद्दल चांगलीच माहिती आहे तर. गुड , मग एक सांग,समजा तुल आम्ही सिलेक्ट केले तर कधी रुजू होऊ शकतोस ” दामलेंनी मुद्दाम पगाराचा विषय बाजूला ठेवत एकदम उडी मारली. ” उद्या पासून ” केतन उत्तरला. ” पण तू पगाराबद्दल काहीच विचारलं नाहीस. आणि मी सांगितलं पण नाही – तरीही जॉईन होणार? ” दामलेंना कुतूहल लपवता येत नव्हते. “‘ सर, मी मराठी चांगल बोलत असलो तरी गुजराती आहे.मला शिकायचं आहे. कॉलेज मध्ये आपण शिकण्याची फी देतो – तुम्ही तर मला शिकवणार आणि पगार पण देणार, मग किती त्यांनी काय फरक पडतो ?” केतन न उलगडा केला. ” तरीही आमची कंपनी स्माल स्केल आहे, ग्ल्यामर नाही – बहुतेक लोक वर्ष भरात पुढच्या प्रवासाला जातात . तू ही हा जॉब तात्पुरता हातात हवा म्हणून घेऊन २-३ महिन्यात सोडून जाणार नाही याची काय खात्री ?” दामलेंनी भीती स्पष्टपणे बोलून दाखविली ” सर, मला पुढे जाऊन आय एस ओ मध्ये करिअर करायचं आहे. आय एस ओ च्या अंमल बजावणीत शिस्त, नीट नेटक्या कामाची सवय, सिस्टिम्स ह्याच प्रत्यक्ष अनुभव एक हाती मिळेल. काटकरनी मला येथे मिळणारा फ्री hand व अभ्यासाचे स्वातंत्र्य व त्याचा होणारा फायदा याची पूर्ण कल्पना दिली आहे. त्या साठी मी दोन वर्ष नक्कीच राहीन.”
” तरीही तुझी पगाराची अपेक्षा काय आहे ? ” ” सर, खर मला अर्धा पगार म्हणजे ३-४ हजार दिलेत तरी चालतील. पहिले काही दिले तर आपल्याला आपोआपच मिळते. मी कंपनी साठी चांगले काम केले तर फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. मला आई लहान पणी सुदामाची गोष्ट सांगायची. त्याने श्रीकृष्णाला फक्त पोहे नेले – काही ही मागितले नाही. तरीही त्याला भरपूर मिळाले.तुम्ही द्याल तो पगार चालेल.”
केतन न जॉब पटकावला आणि तो पुढे पांच वर्षातच GM झाला हे वेगळे सांगायला नको. सुदाम्याचे पोहे मात्र दामलेंच्या कायम लक्षात राहिले. काही दिल्या शिवाय मिळण्याची अपेक्षा कशी करायची – “मराठी बाण्याच्या” “ताठ कण्याच्या” मुलांनी नोकरी असो व व्यवसाय – हा मंत्र घ्यायला हरकत नाही.
पुरुषोत्तम आगवण मानद सचिव Chamber Of Small Industry Associations.Member, National Board of MSME
— पुरुषोत्तम आगवण
Leave a Reply