आपले अपत्य शारीरिक, मानसिक व बौद्धिकदृष्ट्या उत्तम असावे हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते, त्याशिवाय ती स्वत:ला अपूर्णच समजते. केवळ आई होणं ही एकच जबाबदारी तिच्यावर नसते तर आजच्या धावपळीच्या जीवनात ‘एक अपत्य–सुखी दांपत्य’ ह्या सूत्राचा अवलंब करताना एकुलते एक अपत्य सुसंस्कृत, सुजाण, सुदृढ व सर्वांग परिपूर्ण असणे गरजेचे आहे. सुप्रजनन हा आयुर्वेदाचा मूळ गाभा आहे.
दर महिन्याच्या मासिक ऋतुचक्रामध्ये रजःप्रवृत्तीपासून १२ ते १६ दिवस गर्भधारणेसाठी योग्य असतात. गर्भशयामध्ये ह्याच काळात बीजाचे रोपण होणे शक्य असते. त्या वेळी रसाधातुचे पोषण होणे आवश्यक आहे. बीज, बीजभागदृष्टि गर्भाच्या आरोग्यासाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे पुरुषाचे शुक्र हे सुद्धा उत्तम प्रकारचे असणे आवश्यक आहे. जन्मास येणाऱ्या बालकाचे आरोग्य पूर्णत: माता–पित्याच्या मानसिक व शारीरिक अवस्थेवर अवलंबून असते. त्यासाठी आवश्यक शरीरशुद्धी, आहार–विहार व औषधी यांचा गर्भावर होणारा परिणाम यासंबंधी विचार करणे आवश्यक आहे.
सदृढ गर्भधारणेसाठी स्त्रीबीज व पुरुषबीज सक्षम असणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वात पहिला उपचार म्हणजे शरीरशुद्धी. यासाठी अत्यंत उपयुक्त उपचार म्हणजे ‘पंचकर्म’. गर्भधारणेसाठी इच्छा असणाऱ्या स्त्री–पुरुषाने शास्त्रोक्त पद्धतीने पंचकर्म अर्थात वमन, विरेचन, बस्ति इ. उपचार अवश्य करावेत. ह्या ठिकाणी विरेचन म्हणजे नुसते जुलाब नव्हेत किंवा बस्ति म्हणजे एनिमा नव्हे तर आयुर्वेदीय निर्माण पद्धतीने तयार केलेले व वनस्पतींनी सिद्ध केलेले तूप प्रकृती व वय शरीरशक्तीचा विचार करून किमान सात दिवस घ्यावे. शरीरशुद्धीसाठी बाह्यस्नेहन म्हणजेच अभ्यंग, मसाज इ. चा उपयोग करावा. केवळ वरवर पंचकर्म म्हणून शिरोधारा, अंगाला तेल लावणे असे वरवरचे दिखाऊ उपचार करू नयेत. शास्त्रशुद्ध पद्धतीने वमन, विरेचन, बस्ती, नस्य, इ. उपचार करून घ्यावेत. स्त्रियांनी गर्भाधानापूर्वी शोधन व बृहण उत्तरबस्ति, योगबस्ती क्रम, योनिघावत–धूपन, इ. उपचार तज्ञ आयुर्वेद स्त्रीरोग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली करावेत. याबाबतीत “वैद्यराज व्हिजन” ही संस्था मोफत समुपदेशन करू शकते. ह्या सर्व गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधि लागतो. त्यापेक्षा कमी वेळात केलेल्या शॉर्टकट उपचारांचा योग्य फायदा होणे शक्य नाही हे सुप्रजेसाठी इच्छुक दांपत्याने समजून घ्यावे.
पंचकर्म उपचारांनी शरीरसुद्धी होते व त्याबरोबरीने स्त्री व पुरुषबीजशुद्धी पण होते. सर्व इंद्रियांची शक्ती वाढते, मन प्रसन्न होते. स्त्री–पुरुषामधील आकर्षण वाढते व पुढे गर्भधारणा होऊन आरोग्यसंपन्न अपत्यप्राप्ती होते. शरीरशुद्धीच्या महत्त्वाच्या टप्प्यानंतर आर्तव व शुक्र वाढण्यासाठी ओजवर्धक औषधी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यात अश्वगंधा, क्रौंचबीज, शतावरी, गोक्षुर, विदारीकंद, बला, कृष्णतीळ, वासा, पिंपळी, पुनर्नवा, गुडूची, आमलकी, सुंठ, श्वेतमुसली, इ. औषधे शुक्र धातूचे सामर्थ्य वाढवितात. ‘तंत्र शुक्र बाहुल्यात् पुमान’ असे वर्णन संहिताकारांनी केले आहे. त्यामुळे निःसंशय सुप्रजानिर्मिती होते. व्यंगविरहित बालक निर्मिती हा ह्यामागील उद्देश आहे. ह्या औषधांमुळे रसाधातुचे उत्तम पोषण होते. सुप्रजननासाठी सार्वदेहिक शुक्र तसेच बीजभूत शुक्र ह्या दोन घटकांची गरज असते. ह्या औषधांमध्ये मायक्रोन्युट्रियंट्स असल्याचे सिद्ध झाले आहे. अलीकडे अनेक आहार द्रव्यांमध्ये अशी मायक्रोन्युट्रियंट्स असल्याचे दिसते. अनादि काळापासून वनस्पतींच्या रूपाने आयुर्वेदामध्ये ह्यांचा वापर करण्यात येतो.
१) | क्रौंचबीजामुळे शरीरातील टेस्टोस्टेरॅान वाढते. त्यामुळे लिबिडो म्हणजे कामशक्ती वाढते. |
२) | वासा व गुडुची – ह्या द्रव्यांमुळे शुक्रदुष्टी दुर होते व त्याप्रमाणे शुक्रामध्ये कुठल्याही प्रकारची विकृती रहात होत नाही. |
३) | शतावरी, अश्वगंधा, कृष्ण्तीळ ह्या द्रव्यांमुळे शुक्राणूंची संख्या वाढते व शुक्रबीज निर्मिती होते. ही सर्व औषध योजना करण्यामागे संहिताकारांचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. माझ्या खाजगी प्रॅक्टिसमध्ये मी ह्याचा वापर अनेक दांपत्यांवर केला असून त्याचे उत्तम परिणाम झालेले अनुभवास येतात. ह्यासाठी “शुक्रजीवक व अश्वमाह” ही औषधे मी वापरतो. दूध व तुपाबरोबर घेतल्याने ह्या औषधांमुळे उत्तम शुक्रवर्धन होते असा माझा अनुभव आहे. |
४) | विदारीकंद या द्रव्यात मॅग्नेशियम व ‘अ’ जीवनसत्व असून शुक्रपोषणासाठी ह्याची मदत होते. आमलकीमध्ये जीवनसत्व ‘सी’, जीवनसत्व ‘के’, कॅल्शियम, मॅग्नेशियम असते. त्यामुळे पेशींमध्ये कुठल्याही प्रकारची विकृती निर्माण होत नाही. आमलकीमध्ये आठ ते दहा मिलिग्रॅम जीवनसत्व ‘सी’ असून हे पेशींचा विनाश होऊ देत नाही. |
५) | अंनतमूळ आणि गोक्षुर हे स्त्री-पुरुषांमध्ये एकमेकांविषयी प्रेमभावना उत्पन्न करतात. ह्यामध्ये शुक्रबीज निर्मितीची शक्ती आहे. |
६) | पिप्पली व पुनर्नवा हे अॅन्टिफंगल व शोथनाशक आहे. |
पुढे औषधाइतकीच आहार योजना देखील महत्वाची आहे. त्यापूर्वी स्त्रियांना सुप्रजननासाठी देण्यात येणाऱ्या औषध योजनेबाबत थोडक्यात विचार करूया. स्त्रियांसाठी पुत्रजीवक, शिवलिंगी, शरपुंखा ही औषधे सुप्रजननासाठी परिणामकारक ठरलेली आहेत. यात शतावरी कल्पाचा वापरही महत्वाचा आहे. सुप्रजनन तर दूरच पण काही मातांना वारंवार गर्भस्त्राव व गर्भपात होतात. अनेक स्त्रियांचे प्रसव अकाली होऊन बालक मृत्यू पावते. काही स्त्रियांमध्ये तर सातत्याने पाच पेक्षा जास्त वेळा अकाली प्रसूती होऊन गर्भ मृत झाल्याचे दिसते. अशा स्त्रिया मातृत्व सुखापासून वंचित राहतात. आयुर्वेदात अशा स्त्रियांसाठी ‘क्षेत्रचिकित्सा’ वर्णन केली आहे. या चिकित्सेमुळे गर्भपात टाळता येतो. अकाली प्रसव व अलीकडे अनेक स्त्रियांमध्ये होणारे टॉर्च इन्फेक्शन ह्यावर चिकित्सा करता येते. आधुनिक विज्ञानामध्ये सुद्धा अकाल प्रसव, गर्भस्त्राव, गर्भपात ह्यावर निश्चित अशी चिकित्सा नसल्याचे मत अनेक स्त्रीरोगतज्ञ वेगवगळ्या परिसंवादापासून व्यक्त करीत असल्याचे माझ्या माहितीत आहे.
Leave a Reply