गुंतवणुकीवर अधिकाधिक परतावा मिळावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळतो, परंतु त्यात धोकेही असतात. म्हणून ज्येष्ठ नागरिक आणि काही तरुण मंडळीही सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असतात. अशाच काही सुरक्षित गुंतवणूक प्रकारांचा मागोवा.शेअर बाजारातून मिळणारा परतावा निश्चित नसल्याने अनेकांना गुंतवणुकीचा सुरक्षित मार्ग हवा असतो. विशेषत: निवृत्त झालेल्या
ज्येष्ठ नागरिकांना कुठे केलेली गुंतवणूक सुरक्षित राहील त्याचबरोबर चांगला परतावाही मिळेल याची चिंता असते. काही तरुणांनाही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा धोका पत्करायचा नसतो. तसेच गृहकर्ज आणि वाहन कर्ज फेडण्यासाठी गुंतवणूक केव्हाही मोडून पैसा उभी करण्याची गरज भासू शकते. खरे तर बँकांच्या मुदत ठेवीच्या योजना सर्वात सुरक्षित असतात. परंतु, या योजनांमध्ये पैसे ठेवल्यास मिळणारा परतावा फारच कमी असतो. गेल्या काही वर्षांमध्ये चलनवाढीचा दर दहा टक्क्यांहून अधिक राहिला आहे. अशा वेळी मुदत ठेवींवर सहा-सात टक्क्यांचे व्याज मिळाल्यास त्याला नकारात्मक परतावाच (निगेटीव्ह रिटर्न) म्हणावे लागेल. काही कंपन्यांच्या मुदत ठेवीच्या योजना असतात. या योजनांवर बँकांच्या तुलनेत अधिक व्याज मिळू शकते. कार्व्ही प्रायव्हेट वेल्थ या संस्थेच्या इंडिया वेल्थ रिपोर्ट 2010 या अहवालानुसार देशातील एकूण संपत्तीपैकी 66 टक्के संपत्ती फिक्स्ड इन्कम असेटमध्ये गुंतवली जाते. ही रक्कम 48 लाख कोटी एवढी आहे. जगातील सरासरी गुंतवणुकीचा विचार केल्यास केवळ 58 टक्के रक्कमच फिक्स्ड इन्कम असेट्समध्ये गुंतवली जाते. फिक्स्ड इन्कम असेट्समध्ये गुंतवणूक सुरक्षित राहते. अशा ग्राहकांसाठी मुदत ठेव, डेट म्युचुअल फंड्स आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटसारख्या पोस्टाच्या योजना महत्त्वाच्या असतात
.
ारतात मुदत ठेवींमधील गुंतवणुकीचे प्रमाण सुमारे 30 टक्के आहे. अशा परिस्थितीत नेमकी कुठे गुंतवणूक करावी, याचा निर्णय घेणे अवघड बनते.निवृत्तीच्या वेळी अनेकांना मोठी रक्कम मिळते. ही रक्कम सुरक्षित राहणे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते. त्यातील काही रक्कम गुंतवून त्यातून महिन्याला
ठरावीक रक्कम मिळत रहावी आणि सर्व घरखर्च चालावा, काही रक्कम मुलांची शिक्षणे आणि लग्न यासाठी राखून ठेवावी आणि उरलेली रक्कम आकस्मित खर्चासाठी वापरता यावी अशी त्यांची इच्छा असते. अशा व्यक्तींनी आपली रक्कम ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवली तर त्यांचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते. या योजनेत नऊ टक्के व्याज मिळते तसेच 60 वर्षांवरील व्यक्ती किवा 55 वर्षांवरील निवृत्त व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा असून ती पुढे आणखी तीन वर्षांसाठी वाढवता येते. गुंतवणुकीच्या पूर्ण सुरक्षिततेची हमी देऊन सर्वाधिक व्याज देणारी ही एकमेव योजना आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेत गुंतवणूक करण्यास हरकत नाही. परंतु मध्येच मोठ्या रकमेची गरज भासल्यास ती एक वर्षाच्या आत काढता येत नाही. तसेच त्यानंतरही किरकोळ दंड भरून गुंतवणूक मोडता येते. एखाद्याला प्रत्येक महिन्याला ठरावीक उत्पन्न हवे असेल तर पोस्टाच्या मंथली इन्कम स्कीम (एमआयएस) मध्ये गुंतवणूक करावी. या योजनेत वर्षाला आठ टक्क्यांचा परतावा दिला जातो. यात वैयक्तिक खात्यात साडेचार लाखांची कमाल गुंतवणूक करता येते तर संयुक्त खात्यात नऊ लाखांची कमाल गुंतवणूक करता येते. या योजनेतही एक वर्षापर्यंत गुंतवणूक काढून घेता येत नाही. तसेच त्यानंतर काढल्यास दोन टक्क्यांचा तर तीन वर्षांनी काढल्यास एक टक्क्याचा दंड सोसावा लागतो. काही कंपन्यांच्या मुदत ठेवीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करता येते. या गुं
वणुकीवर साडे नऊ ते अकरा टक्क्यांचा परतावा मिळू शकतो. पण, ही गुंतवणूक शासनाच्या योजनांएवढी सुरक्षित नसते. म्हणून एए किंवा एएए प्रमाणपत्र असलेल्या कंपन्यांच्या योजनांमध्येच गुंतवणूक करावी आणि ही गुंतवणूक विविध कंपन्यांमध्ये विभागून करावी. काही बोगस कंपन्याही अधिक व्याजदर देऊन मुदतठेव योजना जाहीर करतात. अधिक व्याजाच्या लोभाने ज्येष्ठ नागरिक या योजनांना बळी पडतात. त्यामुळे खात्रीच्या
कंपन्यांमध्येच गुंतवणूक करावी. म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करताना फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन आणि शॉर्ट टर्म इन्कम फंड्स अधिक योग्य ठरतात. या योजनांमध्ये आठ ते साडे आठ टक्क्यांचा परतावा मिळू शकतो.नोकरी किंवा व्यवसाय करणार्या काहींना शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची भीती वाटत असते. आपली गुंतवणूक सुरक्षित रहावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असल्याने काही लोक अधिक परताव्यासाठी फारसा धोका पत्करत नाहीत. शिवाय, काही कर्ज घेतल्याने त्याच्या परत फेडीसाठी गुंतवणूक केव्हाही मोडून रोख रक्कम हवी तेव्हा हातात मिळावी अशी त्यांची इच्छा असते. म्हणजेच त्यांना सुरक्षितता आणि लिक्विडीटी या दोन्ही बाबी महत्त्वाच्या वाटतात. अशा व्यक्तींनी पोस्टाच्या एमआयपी योजनेत पैसे गुंतवावेत. त्यांना दर महिन्याला ठरावीक रक्कम नको असेल तर ते पोस्टाच्या टाईम डिपॉझिट योजनेत पैसे गुंतवू शकतात. कंपन्यांच्या मुदत ठेवींवर चांगले व्याज मिळत असल्याने या मुदत ठेवींचाही विचार करायला हवा. लिक्विडीटीसाठी शॉर्ट टर्म फंड्स हा चांगला पर्याय ठरू शकतो. शॉर्ट टर्म फंड्समध्ये गुंतवणूक केल्यास हवी तेव्हा रोख रक्कम उभी करणे शक्य होतेच पण आयकरात सवलतही मिळते. या फंड्समध्ये गुंतवणूक केल्यास सात ते साडेसात टक्क्यांचा परतावा मिळतो. संपूर्ण रक्कम शॉर्ट टर्म फंड्समध्ये न गुंतवता काही रक्कम फिक्स मॅच्युरटी प्लॅन्समध्येही गतवावी. शॉर्ट टर्म फंड्समध्ये एक ते दोन वर्षांचीच मुदत असल्याने फारसा धोका नसतो. ही गुंतवणूक सुरक्षित असली तरी त्यातून संपत्ती फारशी वाढत नाही. म्हणून तज्ज्ञांच्या मते तरुणपणी एकूण गुंतवणुकीचा थोडा तरी भाग शेअर बाजारात गुंतवायला हवा. शेअर बाजारात गुंतवणूक करताना एकदम मोठी रक्कम गुंतवण्यापेक्षा थोड्या थोड्या रकमेची गुंतवणूक करावी आणि त्यानंतर शेअर बाजारा
्या परिस्थितीचा अंदाज घेऊन गुंतवणूक वाढवत न्यावी. ही गुंतवणूक करताना आपण किती धोका पत्करू शकतो याची नेमकी माहिती असायलाहवी. अशा प्रकारे सावध राहून
केलेली गुंतवणूक आर्थिक लाभ देतेच. पण,
मानसिक स्वास्थ्यही देते.
(अद्वैत फीचर्स)
— महेश जोशी
Leave a Reply