आजकाल प्रत्येक कॉम्पुटर वापरणार्या व्यक्तीला सुरक्षित व अभेद्य
पासवर्ड कसा तयार करावा? असा जटील प्रश्न नेहमी पडत असतो. तसं ते काही कठीण
काम नाही, पण असा पासवर्ड बनविण्यासाठी आपण काही गोष्टींची काळजी मात्र
अवश्य घेतली पाहिजे.
पहिली गोष्ट म्हणजे पासवर्डसाठी
तुमचा फोन नंबर मोबाईल नंबर, तुमच्या बँक अकाऊंटचा नंबर, तुमची अथवा
कुटुंबातील कुणाचीही जन्मतारीख, घर नंबर, तुमच्या मुलामुलींची नावे, तुमचे
टोपण नाव इत्यादींचा वापर चुकूनही करु नका, जेणेकरुन तुमच्या परिचितांना
तुमच्या पासवर्डचा अंदाज येऊ शकेल. या सर्वांचा वापर कटाक्षाने टाळायलाच
हवा.
दुसरी गोष्ट पासवर्ड अधिक सुरक्षित व अभेद्य
करण्यासाठी तो क्लिष्ट बनविणे आवश्यक आहे. तो क्लिष्ट बनविण्यासाठी केवळ
अक्षरांचाच न बनविता त्यात काही अंक व स्पेशल कॅराक्टर्सचा वापर करायलाच
पाहिजे. तसेच त्याची लांबी किमान आठ कॅरॅक्टर्स इतकी तरी असावीच.
अशा
काही गोष्टींची दक्षता घेतल्यास असा पासवर्ड बनविणे सोपे आहे पण तो लक्षात
ठेवणे कठीण आहे. तेव्हा यापुढील लेखात आपण सुरक्षित व अभेद्य परंतु ‘सहज
लक्षात रहाणारा’ पासवर्ड कसा तयार करायचा ते पाहू.
— रमण कारंजकर
Leave a Reply