सुवर्णमुद्रा
प्रकाशक- उत्कर्ष प्रकाशन, पुणे
शब्दांकन – मंगला गोडबोले
पाने 193, किंमत 200 रुपये
पुस्तक परिचय- विद्या साताळकर
पु. ना. गाडगीळ आणि कंपनी या पुण्यातल्या सराफी पेढीचे आधारस्तंभ, नव्वदीतही तरुणाईला लाजविणारा उत्साह अंगी असणारे अनंत गणेश ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांना वाहिलेला मानाचा मुजरा म्हणजे `सुवर्णमुद्रा.’ दाजीकाकांचे नातू सौरभ गाडगीळ यांच्या आग्रहातून तयार झालेल्या उत्कर्ष प्रकाशनच्या या देखण्या पुस्तकाला शब्दसाज चढविला आहे, सहजसुंदर भाषाशैली असलेल्या मंगला गोडबोले यांनी.
`ऐक पुण्यनगरी तुझी कहाणी…’ या पु. ना. गाडगीळ आणि कंपनीच्या जाहिरातीने पुस्तकाची वेधक अशी सुरुवात होते आणि पी. एन. जी.च्या, पर्यायाने दाजीकाकांच्या सोनेरी क्षणांच्या संस्मरणांमध्ये वाचक रंगून जातो. प्रारंभी दिलेल्या वंशवृक्षातून दाजीकाकांच्या पूर्ण कुटुंबाची ओळख होते. मूळचं कोकणातलं असणारं हे गाडगीळ कुटुंब 200 वर्षांपूर्वी सांगलीमध्ये स्थिरावलं आणि सराफी, सावकारी असा जोडव्यवसाय करत 29 नोव्हेंबर 1932 रोजी `गणेश नारायण गाडगीळ सराफ व ज्युवेलर्स’ या दुकानाचा शुभारंभ झाला. गाडगीळांचा पूर्वेतिहास स्मरताच पु. ना. ऊर्फ आबा गाडगीळ, गणेश नारायण ऊर्फ दादा हे दाजीकाकांचे वडील आणि तिसरे बापूकाका ही त्रयी आठवते. आबांची सत्शीलता, निर्व्यसनीपणा, समतोल वृत्ती, मितभाषी व्यवहार, जनहिताची तळमळ यांचा खोल ठसा दाजीकाकांवर उमटला. माधुकरीसाठी येणारे विद्यार्थी, जेवायला येणारे वारकरी, वाईचे, काशीचे विद्वान ब्राह्मण, सख्खे, सावत्र, चुलत गोत, सुना-मुलींचा गोतावळा असा सतत माणसांचा राबता असणाऱया, नांदतं गोकुळ असलेल्या सांगलीच्या घरात दाजीकाकांची जडणघडण झाली. वयाच्या विसाव्या वर्षी दाजीकाकांनी दुकानात पाऊल ठेवलं आणि हा परिपाठ पुढे सत्तर वर्षे टिकून राहिला. `आधुनिक पाणिनी’ म्हणून संबोधल्या जाणाऱया काशीनाथशास्त्री अभ्यंकर यांची पुण्यात राहणारी बुद्धिमान कन्या कमलाबाई दाजीकाकांच्या सहधर्मचारिणी झाल्या. पतीशी, सासरघराशी पूर्ण तादात्म्य पावल्या. सन 1958 च्या सुरुवातीला पुण्यात `मेसर्स पुरुषोत्तम
नारायण गाडगीळ आणि कंपनी’ या नावाने दुकान काढण्याचा धाडसी निर्णय दाजीकाकांनी घेतला आणि सचोटी व मालातील चोखपणा या गुणांमुळे चोखंदळ पुणेकरांनी यशाची माळ गाडगीळांच्या गळ्यात टाकली. `आपला धंदा हा मालक आणि कारागीर अशी दोन चाकांची गाडी आहे’ हे दाजीकाकांचं आवडतं वाक्य. म्ह
ूनच दाजीकाकांबरोबर सांगलीहून आलेले निष्णात कारागीर दाजीकाकांच्या आणि कमलाबाईंच्या आपुलकीच्या वागण्यामुळे पुण्यात कुटुंबासह स्थिरावले. 1962 मध्ये सुवर्णनियंत्रण कायदा आला. अशा कसोटीच्या क्षणांना दाजीकाकांना अनेकदा तोंड द्यावं लागलं; पण या काळात त्यांनी ग्राहकांनाही खुश ठेवलं आणि सरकारी नियमही पाळले. यानंतर 71 मध्ये दाजीकाकांचे चिरंजीव विद्याधर पुण्याच्या दुकानात कामाला लागले. त्यांच्या लग्नानंतर सूनबाईच्या रूपाने दुकानाच्या अकाऊंटची बाजू सांभाळणाऱया वैशाली गाडगीळांचा दुकानाला भक्कम आधार मिळाला. दाजीकाकांचे पुतणे अजित दुकानाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्याबरोबर आलेले सतीश कुबेर कंपनीशी एकरूप झाले आहेत. आय. टी. उद्योगामुळे मध्यमवर्गीयांच्या हातात पैसा खेळू लागला आणि हिऱया- माणकांचे दागिने त्यांच्या आवाक्यात आले. हा बदल लक्षात घेऊन गाडगीळांनी 97 मध्ये लक्ष्मी रोडवरच्या दुकानात हिरे व इतर रत्नांचा विभाग सुरू केला. या विभागाची जबाबदारी दाजीकाकांचे चुलतबंधू, नानासाहेबांचे उत्तम रत्नपारखी असलेले चिरंजीव राजाभाऊ यांनी घेतली. पुण्याच्या विस्तारलेल्या क्षितिजाची दखल घेऊन गाडगीळांनी पौड रोडला सोने-चांदी आणि हिरे-मोती विक्रीची अशी दोन दुकाने, तसेच चिंचवडला आणि कॅम्प विभागात शाखा उघडून चौफेर घोडदौड सुरू केली. दुकानाच्या उद्घाटनाला प्रीती झिंटा, लता मंगेशकर यांना बोलावले, पीएनजीची पहिली ब्रँड ऍम्बॅसिडर म्हणून लोकप्रिय देखणी अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांना नेमून जाहिरातींचा धडाका मारणे, दुकानात बारकोड सिस्टिम सुरू करणे, तसेच कॉम्प्युटराईज्ड स्टॉक रेकॉर्ड ठेवणे यातून दाजीकाकांनी आधुनिक काळाशी सहज जुळवून घेतल्याचे दिसते. आता तर त्यांनी `गाडगीळ मेटल्स अँड कमॉडिटिज’ या व्यवसायाला प्रारंभ करून प्रगतीचा पुढचा टप्
ा गाठला आहे. एवढेच नव्हे तर त्र+जू, गोड बोलणं, जनसंपर्काचा दाजीकाकांचा उत्तम वारसा लाभलेला त्यांचा नातू सौरभ यांच्या रूपाने गाडगीळांची सहावी पिढी व्यवसायात उतरली आहे. आता सांगलीत लावलेल्या पीएनजीच्या रोपाची शाखा थेट अमेरिकेपर्यंत लवकरच जाऊन पोचणार आहे.
माणसं जोडण्याचा छंद, नातेसंबंध टिकवणं, वाढवणं, सर्व नव्या-जुन्या गोष्टींशी जुळवून घेणं, स्वच्छता-टापटीप, सामाजिक जाणीव असणं ही दाजीकाकांची स्वभाववैशिष्ट्ये. पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवून दाजीकाकांनी पुण्यातील सराफांना एकत्र आणायला, त्यांच्यातल्या अपप्रवृत्ती दूर करायला सुरुवात केली. लातूर भूकंपग्रस्तांसाठी निधी उभारला. लक्ष्मी रोडवरच्या पे-अँड पार्क कायद्याला त्यांनी लाक्षणिक सत्याग्रह करून विरोध केला. आज लक्ष्मी रोडला असलेली पार्किंगची व्यवस्था त्याचेच फलित आहे. अनेक सेवाभावी संस्थांशी त्यांचा संबंध आला. कलाकारांना रोख बक्षिसे देणे, कार्यक्रमातील पैशाची त्रुटी भरून काढणे, अडचण असणाऱयांना सहज मदत करणे असा त्यांचा सढळ देणारा हात आहे.
पत्नीच्या निधनानंतर त्यांच्या अंगावरचे दागिने न काढता `वैकुंठावरील असामान्य काम करणाऱया मंडळींनाच ते मिळू दे’ या दाजीकाकांनी व्यक्त केलेल्या भावनेतून दाजीकाकांजवळ असलेल्या अंगभूत सौजन्य आणि परोपकारी वृत्तीचं दर्शन घडतं.
दाजीकाकांवर कालनिर्णय, पुणे महापालिकेतर्फे सत्कार, रोटरी एक्सलन्स ऍवॉर्ड अशा अनेक सन्मानांची खैरात झाली; पण यात दाजीकाकांच्या उद्योगाला `वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलची संलग्न भागीदारी’ हा दुर्मिळ सन्मान मिळाला. तेव्हा मानाचा तुरा खोवला गेला.
आजही आठवण झाली की अंगावर शहारे आणणारं पुण्यात 76 मध्ये घडलेलं अभ्यंकर हत्याकांड आणि त्या प्रसंगात दाजीकाका आणि कमलाबाईंनी केलेली मदत यांचा उल्लेख दाजीकाकांचे मेव्हणे ग. का. अभ्यंकर कृतज्ञतेने करतात. थीज्ञ ळी ेíाऩाऩहळ हे ब्रीद असणाऱया दाजीकाकांविषयी पुस्तकात बाबासाहेब पुरंदरे, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर असे अनेक मान्यवर, सराफी व्यावसायिक फत्तेचंद रांका, गाडगीळांचे कारागीर, सर्वसामान्य ग्राहक यांनी वेळोवेळी काढलेले गौरवोद्गार मुळातून वाचण्यासारखे आहेत.
लेखिकेने पीएनजीच्या मर्यादाही परखडपणे सांगितल्या आहेत. दाजीकाकांची
सात्विक, तेजस्वी मुद्रा असलेले सोनेरी मुखपृष्ठ, सुस्पष्ट टाईप, उत्तम छपाई, दाजीकाकांच्या संदर्भातली छायाचित्रं पुस्तकाची रंगत वाढवतात. काही ठिकाणी वर्णनाची पुनरावृत्ती झाली आहे, हा मोहरीएवढा दोष वगळता सचोटी, कसोटी आणि हातोटी या त्रिरत्नांचा मुकूट परिधान केलेल्या दाजीकाकांची अवघ्या महाराष्ट>ावर उमटलेली आणि लवकरच दूरदेशी जाणारी सुवर्णमुद्रा वाचकांच्या मनावर ठसविण्यात लेखिका पूर्णपणे यशस्वी झाली आहे.
सुवर्णमुद्रा
प्रकाशक- उत्कर्ष प्रकाशन, पुणे
शब्दांकन – मंगला गोडबोले
पाने 193, किंमत 200 रुपये
(सौजन्यः लोकमत)
— बातमीदार
Leave a Reply