नवीन लेखन...

सू-सुटका!

अं….अं….मला माझ्या आयुष्यातला,अगदी पहिला दिवस सुध्दा आठवतोय.खर्र।़।़च!!अहो तुम्हाला खोटंच वाटणार.कारण तुमचं आयुष्य वर्षांच आणि माझं आयुष्य दिवसांचं! अजून मी माझं घरसुध्दा पाहिलेलं नाही! माझं नकटं नाक अजून मी आरशात पाहिलेलं नाही!! मला कळतंय तेव्हापासून आम्ही सर्व बाळं इथेच राहतो.इथे म्हणजे ह्या हॉस्पिटलात!म्हणजे कळलं ना,मी किती लहान आहे ते?तर ही ह्या हॉस्पीटल मधली गोष्ट.मला सारखं वाटायचं,’आपण आपल्या आई जवळ जावं.आईच्या कुशीत झोपावं.डोळे मिचकावत,हात-पाय हलवत,गुर्र फुर्र करत आईशी बोलावं.मग आपल्याला आईने मस्त थोपटावं. आपल्याला आंजारावं,गोंजारावं.पण कसं काय?नि कसं काय?आम्हा सगळ्या लहान मुलांना,एका खोलीत कोंडून ठेवायचे.आणि आम्ही एखादवेळेस पळून जाऊ,म्हणून की काय आमचे हात-पाय बांधून ठेवलेल.म्हणजे एका मोठ्या फडक्यात आम्हाला जाम गुंडाळून ठेवायचे.आणि…आणि…आमच्या आयांना मात्र,मस्त हॉलमधे ठेवलेलं.आणि ते पण एकदम मोकळं-मोकळं!!मधेच कधीतरी,पांढरे कपडे घातलेली,एक बाई यायची.मग आमची तुरुंगातून सुटका व्हायची.एकदा मी आईजवळच्या पाळण्यात होते.खेळत होते.चांगली सुखात होते.इतक्यात कुणीतरी म्हणालं,ठनरसं आली.नरसं आली.ठमी मान वळवून पाहिलं तर,’तीच ती! पांढऱ्या कपड्यातली बाई!!’मी भीऊन गच्च डोळेच बंद केले.तर नरसं म्हणाली,ठअगं बाई,झोपली वाटतं छकुली?ठआणि नरसं ने मला उचललं आणि खोलित नेऊन डांबून ठेवलं!मी तिला घाबरले म्हणून तिने मला उचलले! तेव्हापासून मी ठरवूनच टाकलं आई जवळ असताना ही नरसं बया पांढऱ्याच काय पण काळ्या कपड्यात आली तरी हिला घाबरायचं नाही! आणि डोळे तर अजिबात बंद करायचे नाहीत.

खरं सांगते,कालचा दिवस तर,मी माझ्या ‘आडव्या आयुष्यात ‘कधीच विसरणार नाही!हसू नका.अहो जो पर्यंत मी स्वत:हून उभी राहात नाही,तोपर्यंत माझं आयुष्य आडवंच नाही का?

हं,तर काय सांगत होते,कालचा दिवस.काल माझा ‘सुनिल गावस्कर’च होणार होता.पण थोडक्यात वाचले!अँ? असं तोंड उघडं टाकून माझ्याकडे पाहताय काय?सुनिलच्या आईने लिहिलेलं.’पुत्र व्हावा ऐसा’हे पुस्तक तुम्ही वाचलं नाही वाटतं?….हं.! तरीच.तरीच असे मोठे डोळे करुन माझ्याकडे पाहताय!तुम्हाला काय वाटलं मला काय माहित नाही?अहो मी आईच्या पोटात होते नां,तेव्हा आईने वाचलं,मी ते ऐकलं!का।़।़य? आता तरी ट्युब पेटली की नाय?थांबा हं.तुम्हाला नीट सांगते काय-काय झालं ते.दुपार संपत आली होती.संध्याकाळ सुरू व्हायची होती.आमच्या झोपा-बिपा झाल्या होत्या. हात-पाय जाम आखडले होते.आम्ही पाच जणं,गुर्र गुर्र,खिंची खिंची खुर्र करत,आनंदाने फुर्र फुर्र थुकी उडवत होतो.आम्ही सर्व दूध प्यायची वाट पाहात होतो.इतक्यात ती नरसं आली.आमच्याकडे निरखून पाहू लागली.आम्हाला आनंद झाला! आम्ही पाचही जणांनी एकमेकांकडे पाहिलं.’कोण जाणार पहिल्यांदा आईकडे?तू का मी? मी का तू?’आम्ही एकमेकांना डोळे मिचकावत विचारू लागलो.चुळबूळ करू लागलो. लाथा मारून बांधलेला कपडा सैल करू लागलो.काय आश्चर्य!पांढरी नरसं माझ्याच समोर येऊन उभी राहिली!तिने माझ्या केसातून हात फिरवला.मला खूप खूप आनंद झाला.मी दुपट्यातल्या दुपट्यात पाय झाडले.थुर्र फूर्र करून थुकीचे बुडबुडे काढले! इतरांकडे पाहून,ठमी जिंकले।़।़।़ रे,मी जिंकले!असं ओरडले!! पण…पण..हा माझा आनंद जास्त वेळ टिकला नाही. कारण,पांढरी नरसं माझ्याकडे पाहात म्हणाली,ठअगं बाई! हे बाळ,पाच नंबरचं? की नऊ नंबरचं? काही कळतंच नाही बाई?सगळी बाळं,बाई अगदी सारखीच दिसतात! कम्माल झाली बाई!!ठहे ऐकल्यावर तर मी जामच घाबरले.भीतीने पाय थरथरले!डोळे गरगरले! हातांच्या मुठी वळत मी जोरात ओरडले, ठनऊ-नऊ! अहो माझ्या आईच्या कॉटचा नंबर नऊ आहे!मी आहे नऊ नऊ,माझे गाल मऊ मऊ!!पण,’लहान मुलांच ऐकावं, हे ठ्या माणसांना कधी समजणार,हे आईच जाणे!’कारण त्याचवेळी,पाच नंबरच्या आईचं बाळ पण जोरात ओरडायला लागलं.ते म्हणालं,माझा नंबर पाच-पाच.दुपट्यामधे करतो नाच!मला हवी माझी आई.त्याला हवी त्याची आई.आणि नरसंला कळेना कुणाची कुठली आई?तिच्या कपड्यांसारखाच,नरसंचा चेहरा पांढरा-फट्ट झाला!नरसंने मला उचललं आणि पाच नंबरच्या पाळण्यात नेऊन ठेवलं.पाच नंबरच्या आईने मला लगेचच मांडीवर घेतलं.एक पाय उडवत थोपटलं.प्रेमाने आंजारलं-गोंजारलं.

(आठवलं ना,लहानपणी हॉस्पिटलात,सुनिलची आणि दुसऱ्या एका मुलाची अदलाबदल झाली होती.पण मामाने तेव्हाच ओळखलं आणि सुनिलला परत आपल्या आईकडे परत आणल.)त्या पाच नंबरच्या आईने मला मांडीवर घेताच,मी जाम जाम घाबरले!मला वाटलं आता माझा ‘सुनिल होणार.’माझे हात-पाय गारठले.घशाला कोरड पडली.तोंडातली थुकी सुकली. पोटात खड्डा पडला. मी कसेबसे डोळे मिचकावले.आणि…आणि..मला सू झाली.दुपटं ओलं गार झालं.मी आतून बाहेरून पार गारठून गेले.ती अनोळखी आई जोरात ओरडली, ऩर्स, दुपटं बदला ताबडतोब.’धावत-पळत नरसं आली.नवीन दुपटं घेऊन आली.नरसंने ओलं दुपटं सोडलं.आणि….आणि…ती अनोळखी आई माझ्याकडे पाहून एव्हढ्या मोठ्याने ओरडली की,मी दचकून आडव्या-आडव्याच घसरले!ती अनोळखी आई दात ओठ खात,नरसंकडे पाहात म्हणाली,ठकाय ग भवाने,ही तर बब्बड आहे!! माझा लाडोबा कुठे गेला? जा आधी माझा मुलगा घेऊन ये.नरसं लगाबगा जाऊन त्यांचा लाडोबा घेऊन आली.त्या अनोळखी आईने,प्रेमाने माझा पापा घेतला.माझ्या केसातून हात फिरवला.आणि मला अलगद उचलून,माझ्या आईकडे घेऊन गेली.आता कळलं ना,मी कालचा दिवस माझ्या ‘आडव्या आयुष्यात’ का विसरणार नाही ते!!(अहो,मला वेळीच ‘सू’ झाली,म्हणून माझी ‘सुटका’ झाली!!)आई माझी वाटच पाहात होती.आईने मला जवळ घेतलं,आंजारलं-गोंजारलं,प्रेमाने थोपटलं तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला.मी आईच्या कुशीत शिरले आणि डोळे गच्च बंद केले.मला हवा होता आईचा उबदार स्पर्श आणि आईचाच मऊ-मऊ वास!!ती अनोळखी आई सुध्दा प्रेमळ होती.आपल्या मुलासारखंच तिने मला जवळ घेतलं होतं.पण त्या दिवशी मला एक गोष्ट समजली,’सर्व-सर्व आयांचं,सर्व-सर्व मुलांवर खूप-खूप प्रेम असतं पण तरीही सर्व-सर्व मुलांना आपलीच आई हवी असते!!’ हो किनई?

— राजीव तांबे

Avatar
About राजीव तांबे 45 Articles
श्री राजीव तांबे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुलांसाठी गंमतशाळा, शिबिरे वगैरेंचे नियमित आयोजन करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांमध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक खेळणी बनविलेली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..