तीन तरूणींचं सेल्फीच वेड मुंबईत एका तरुणीचा आणि एका निधड्या छातीच्या तरुणाचा बळी घेण्यास कारणीभूत ठरलं. सेल्फीच्या वेडाने सध्या म्हातार्यांीपासून- तारूणांपर्यत सार्यां नाच पछाडलेले आहे. याला अपवाद फक्त ते आहेत जे मोबाईलचा वापर करत नाहीत.
तंत्रज्ञानापासून दूर राहणारे आज खर्याु अर्थाने सुखी आहेत असं म्ह्णण्याची वेळ आता जवळ आली आहे. सेल्फीच्या नादात हल्ली तरुणमंडळी फक्त स्वतःतील सौंदर्य शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यांना त्यांच्या सभोवतालच्या निसर्गातील सौंदर्य दिसेनासे झालेले आहे. सेल्फी हे आजचा समाज कसा आत्मकेंद्रीत होत चालला आहे याचे जीवंत उदाहरण आहे. जेंव्हा सेल्फी नव्हता तेंव्हा लोक आपल्या सभोवतालचे सौंदर्य शोधायचे आणि आपले सौंदर्य इतरांच्या डोळ्यात पाहायचे. सेल्फीभ हे सध्याच्या मणुष्याच्या आत लपलेल्या स्वार्थाचेच एक प्रतिबिंब आहे. पण सध्याच्या माणसाचा हा स्वार्थ आता इतरांच्या जीवावरही बेतू शकतो हे लक्षात आल्यानंतर आता सेल्फी हा विनोदाचा, मजा- मस्तिचा विषय राहिला नसून आता चिंतनाचा विषय झालेला आहे. सेल्फी काढण्यासाठी हल्लीचा माणूस स्वतःला अधिका – अधिक उगडा पाडू लागलेला आहे. महिन्यातून दोन- चार सेल्फी काढण्याचा मोह कोणालाही होऊ शकतो. पण दिवसातून दहा-पंदरा सेल्फी काढणारी व्यक्ती बरी आहे असं नाही म्ह्णता येणार. त्या व्यक्तीला सेल्फी काढण्याचा आजार जडलेला आहे असंच म्हणावं लागेल. प्रत्येकाने सेल्फी बाबत आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता जवळ आलेली आहे.
सेल्फी काढतानाही काळ, वेळ आणि स्थळ याचे भान प्रत्येकाने ठेवायलाच हवे, त्या तीन तरुणींनी ते ठेवले असते तर त्यांच्यातील एकीला आणि त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात समुद्रात बुडून त्या तरूणाचा नाहक बळी गेला नसता.
सेल्फी हा आपल्या सौंदर्याच प्रदर्शन मांडण्याचा एक प्रकार झालेला आहे. पण मणुष्य स्वभाव त्याचे काय करणार कालांतराने त्याला तेच ते पाहण्याचा कंटाळा येतो. तेंव्हा आपल्या सेल्फीकडे होणारं लोकांच दुर्लक्ष कित्येकांना मानसिक त्रासही देत असेल ज्यामुळे त्यांचा मनोरुग्ण होण्याच्या दिशेने प्रवास कदाचित जलदही होत असेल, त्यातून त्यांना येणार नैराश्य आणि त्या नैराश्यातून त्यांच्या हातून होणार्याह चूका याचा वाईट परिणाम शेवटी समाजमनावरच होणार. अर्थात लोकांच सेल्फीच वेड नव्हे व्यसन समाजाला घातक आहे हे आता प्रत्येकाने पटवून घ्यायला हवे. एखाद्या व्यक्तीला आपण ओळखतो अथवा आपण समुहाने कोठे – कोठे गेलो होतो हे इतरांना दाखविण्याचा अट्टहासही सेल्फीत दिसतो.
सेल्फीच्या नादात कोणीतरी जीव गमावल्याच्या बातम्या हल्ली वारंवार कानावर येत असतात. सेल्फीसाठी वारंवार नव्याने स्वतःतील सौदर्य शोधण्याचा अट्टहास करण्यापेक्षा आपल्या सभोवतालचे सौंदर्य इतरांपर्यत पोहचविणे अधिक सोप्पे नाही का ? सेल्फीसाठी सेल्फफीश होणे आता थांबायला हवे त्यातच समाजाचे आणि आपलेही खरे हीत आहे नाही का ?
— निलेश बामणे,
Leave a Reply