आपली प्रकृती सुधारण्यात विविध पदार्थांची वेगवेगळी भूमिका असते. सोयाबीनही त्यासाठी फायद्याचे ठरते. यापासून तयार केलेले पदार्थ आपल्याला निरोगी राहण्यास मदत करतात. यामध्ये सोया सॉस, मोड आलेले सोयाबीन, सोयाबीन दूध, आटा अशा सोयाबीनच्या पदार्थांचे सेवन केले असता अनेक आजारांपासून दूर राहता येते.
सोयाबीनपासून मिळत असलेल्या प्रथिनांमुळे (प्रोटिनमुळे) आपल्या हाडांना भरपूर कॅल्शियम मिळते. त्याचबरोबर यामध्ये असलेल्या इसोफ्लेवोन्स या घटकामुळे हाडांना पोहोचणार्यार इजांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ऑस्टियोरोसिसच्या धोक्यापासून दूर राहण्यास मदत मिळते.
सोयाबीनमध्ये प्रथिने व तंतूचे प्रमाण अधिक असल्याने रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित केली जाते. त्याचबरोबर आपल्या मूत्रपिंडाची गाळणक्षमता वाढवण्यासही सोयाबीनचे पदार्थ मदत करत असतात. त्यामुळे आपल्याला मधुमेह व मूत्रपिंडाशी निगडित आजार होण्याची शक्यता कमी होते.
सोयाबीनमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट तत्त्वामुळे प्रदूषण, उन्हाचा त्रास व वयानुसार मृत होणार्या पेशींची समस्याही थांबते. इजा पोहोचलेल्या पेशींचे पुनरुज्जीवन होण्यासही या अँटिऑक्सिडंटमुळे मदत होते. यामध्ये डायटरी फायबरही भरपूर प्रमाणात असल्याने आपले वजन घटवण्यासही सोयाबीनपासून बनवलेले पदार्थ साहाय्यकारी ठरतात.हे एक ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स’ प्रकारातील खाद्य आहे. अशा प्रकारातील खाद्य आपल्या रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते.सोयाबीनपासून तयार केलेल्या पदार्थांनी आपली भूक भागल्याचे समाधान लाभते.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
Leave a Reply