मी बेसावध असताना
फक्त काही क्षणांसाठी
मला तिचं सौंदर्य भुरळ घालत…
त्या काही क्षणात मी
तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडतो
आणि तिच सौंदर्य माझ्या डोळ्यातून
माझ्या मैंदू पर्यत पोहचत…
माझ्या मेंदूपर्यत पोहचलेल तिचं सौदर्य
शब्दात रूपांतरीत होत
आणि तिच्या सौदर्याच वर्णन काव्य रूपाने
माझ्या ओठातून अलगद बाहेर पडत…
ते ऐकल्यावर कित्येकांना वाटत की
माझं मन तिच्या सौंदर्याच्या प्रेमात वेड झालं
आणि माझं हृद्य त्याचं गुलाम…
पण तस काहीच झालेल नसतं
माझ्या डोळ्यातून माझ्या मेंदूपर्यत पोहचलेलं
तिच प्रेम माझ्या ओठातून
बाहेर ही पडलेलं असत काही क्षणात…
माझ्यासाठी तिच्या सौंदर्याच
महत्व ते काही क्षणांच,
पण त्या काही क्षणात ही
तिच सौंदर्य जन्म देत एका कवितेस…
त्या काही क्षणात जन्माला आलेल्या
कवितेमुळेच तिच्यात आणि माझ्यात
एक अव्यक्त नात
निर्माण झालेल असतं कायमचच…
कवी – निलेश बामणे ( एन.डी.)
— निलेश बामणे
Leave a Reply