सध्या सर्वत्र UPSC MPSC टॉपर्सच्या सत्कार व मनोगत व्यक्त करण्याचे पीक सर्वत्र आलेय- पुढे टीप असतेच- सेमिनारच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी batch सुरु होणार ह्यातून काय समजायचे – टॉपर्सचे मनाला हळुवार भिडतील असे अत्र तत्र सर्वत्र पोस्टिंग्स करायचे- बौद्धिक मते मांडायची आणि व्हा व्हा मिळवून स्वतःची पाठ थोपटून घ्याची- मुलेही मिळतात म्हणा- दुनिया बनती है बनानेवाला चाहिये- और ये तो मुंबई है- आजकाल पूना मे भी येही फॅड है!
क्लास लावताना जरा ह्या गोष्टी विचारच:
१) result सांगा- किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलं-त्यातील कितींनी मुख्य परीक्षा दिली-त्यापैकी किती उत्तीर्ण झाले?
२) फॅकल्टी सांगा- परीक्षा पास होऊन शिकवणारे आहे कि परीक्षा पास होत नाही म्हणून लेकचर मधून आर्थिक घडी शिवणारेच आहेत- हेही काही वाईट नसतात -अनेकदा उत्तमच असतात-पण नेहमी नाही-ते तपासाच
३) UPSC असेल तर वरील मुद्दा अजून महत्वाचा-कारण मग Academicans म्हणजे विषय तज्ज्ञ आणि स्पर्धक असे दोन फळीतील फॅकल्टी लागतात- एका विषयाला किमान दोन!
४) पुण्यात,ठाण्यात,गोरेगावात म्हणे UPSC १६००० मध्ये शिकवतात- MPSC अजून १२००० मध्ये- हा निव्वळ फसवेपणा असावा किंवा मोठे औदार्य दाखवणारे फॅकल्टी असावे- आपण हे विचारा कि टोटल कोर्स किती तासांचा- UPSC सामान्य अध्ययन किमान ४०० तासांचा, वैकल्पिक विषय किमान १३० तासांचा, आणि MPSC राज्यसेवा किमान ४०० तासांचा अभ्यासक्रम आहे- तासाला उत्तम फॅकल्टी किमान ७००/- घेतात हे लक्षात ठेवून गणित मांडा- ह्यात प्रशाकीय खर्च-नफा हे वगळले आहे- तरी फीस बाबतीत एक अंदाज येईल. कमी फीस म्हणजे सर्व वाईटच असे नाही, पण मोफत शिकवणारे- ज्ञानदान देणारे सोडून बाकीचे मग स्पर्धेत टिकायचे म्हणून कमी तासात ,किंवा हलके फॅकल्टी वापरून हे गणित जुळवता- आपण डोळस पणे हे तपासले पाहिजे- MPSC राज्यसेवा शुल्क साधारणपणे ३२-३५००० असते व UPSC चे ८५००० च्या आसपास असावे.
५) पण वरील गणितात वर्गात किती विद्यार्थी आहे हे मांडलेच नाही- आपण सांगा किती असावे- एक शिक्षक किती विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊ शकतो-१-२-३-४…. किती-हा अंदाज बांधा आणि विचार-BATCH साइझ.
६) टेस्ट सिरीज तर असावीच- सराव परीक्षा हवेच- त्याचे वेळापत्रक मागा -शक्य असल्यास मागच्या वर्षीच्या टेस्ट पहा-
७) अभ्यासिका-लायब्ररी हवीच- एक वेळ AC क्लासरूम नसेल तरी चालेल-पण समृद्ध लायब्ररी हवीच
८) मेंटॉर हवेच-जसे पी व्ही सिंधू ला गोपीचंद आहे, सचिन ला रमाकांत आचरेकर आहेत, तसे स्पर्धकाला देखील हवेच.
९) आजकाल सोशल मीडियावर मोफत नोट्स,दरोजचे बातम्या पसरवीत काही मुले नियमितपणे क्लासची जाहिरात करतात-पैसे ठेवून होत असलेली ह्या मार्केटिंगला तर मुळीच भुलू नका- ह्या मार्केटिंग तज्ज्ञांचे स्वतः कोणतीही परीक्षा पास न होण्यामागचे कारण हेच असावे कि चालू घडामोडी म्हणजे आज कि ताजा खबर नसते हे ह्यांना कळलेच नाही!
१०) ह्याव्यतिरिक्त आपण सुज्ञपणे तपासा- भेटा-वारंवार भेटा-डेमो लेक्चर हा प्रकारच फसवा असतो- का ते समजून घ्या –
भुलू नका- भान ठेवा- क्लास का लावताय तो उद्देश काय आहे आणि त्या उद्देशाला अनुसरून क्लास काय देतेय ह्याचा तपास करा मग क्लास प्रवेश निश्चित करा
— प्रा. हितेशकुमार एस. पटले
Leave a Reply