भारतीयांचा 47 टक्के वेळ व्हॅट्स – ऍप स्काइपवर या मथल्या खालील बातम्या वर्तमानपत्रात वाचण्यात आल्या आणि माझे विचारचक्र सुरू झाले. पहिल्यांदा त्याबाबतीत स्वतःचाच विचार केला तर माझ्या लक्षात आले माझ्या दिवसातील निम्मा वेळ नाहीपण साधारणतः दोन तास सोशल साइट्सवर खर्च होतात, माझ्याकडे स्मार्टफोन नसतानाही. माझा रविवार तर मला वाटत हल्ली जवळ – जवळ संपूर्ण सोशल नेटवर्क साइट्सवरच जातो. त्यासाठी मी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे ही टाळ्तो. रात्री दोन – तीन वाजतानाही लोक सोशल नेटवर्क साइटवरून चाटींग करताना दिसतात. कदाचित ते आपल्यादेशातील नाही तर परदेशातील मित्र-मैत्रिणींशी, नातेवाईकांशी चॅटींग करत असावेत. स्मार्टफोनच्या माध्यमातून आता संपूर्ण जग अचानक जवळ आलंय अगदी एका क्लिकच्या अंतरावर. आता जग स्मार्टफोन नावाच्या हातात मावण्याइतक्या छोट्याश्या पेटीत बंधिस्त झालेलं आहे. आता सार्या जगाचं भविष्य या पुढील काळात कदाचित ही बंधिस्त पेटीच ठरवेल. या पेटीच्या बाहेर आता जगातील काही मोजकीच लोक आहेत. त्यातील काही परिस्थितीमुळे, काही नाईलाजाने आणि हाताच्या बोटावर मोजण्याइतके स्वच्छेने. स्मार्टफोन आपल्या जवळ असावा म्ह्णून भारतातील सध्याची तरूण पिढी समाजात अनैतिक मानली जाणारी अथवा चुकीची कामे अगदी सहज करून जाताना दिसतात. आपल्या देशात गुन्हगारीचे प्रमाण वाढण्यालाही काही अंशी हे स्मार्टफोन कारणीभूत आहेत. आपल्या देशातील आजकालचे तरूण आपल्या पहिल्या पगारातून काय विकत घेत असतील तर ते स्मार्टफोन! या वरून आपल्या देशातील तरूण पिढी या स्मार्टफोनच्या किती आहारी गेलेली आहे हे अगदी सहज लक्षात येते.
मी आजही माझा जूनाच फोन वापरतो त्यामुळे मला व्हॉट्स- ऍप आणि वाय-फाय चा वापर करता येत नाही आणि इतर कोणत्या ही ऍपचा वापर करता येत नाही. त्यामुळे माझं काही ही आडत नसल्यामुळे आणि मला व्यक्तीशः त्याची तितकीशी गरज नसल्यामुळे मी स्मार्टफोन अजूनही विकत घेतलेला नाही. माझे मित्र आणि माझ्याशी जुजबी ओळख असणारे ही मला स्मार्टफोन घेण्याचा सल्ला देतात. पण माझा मोबाईल व्यवस्थित चालत असताना आणि मला आवश्यकता नसताना मी स्मार्टफोन विकत घ्यावाच का ?मला स्वतःला नाही पण माझ्या सभोवतालच्या लोकांना तो माझा कमीपणा वाटतो याचा अर्थ आपल्या देशात स्मार्टफोन हा स्टेट्स सिम्बोल होऊ पाहतोय. आजची तरूण पिढी खासकरून मध्यमवर्गीय कुटूंबातील हजारो रूपयांचे स्मार्टफोन प्रत्येक दोन – तीन वर्षानंतर विकत घेत राहिली तर त्यांच भविष्य नक्कीच धोक्यात आहे असंच म्ह्णावं लागेल. स्मार्टफोन आजच्या काळची गरज आहे हे जरी मान्य केलं तरी आपण त्या गरजेचे गुलामहोता कामा नये ना ? आजच्या गृहीणी ही स्मार्टफोनच्या आहारी गेलेल्या आहेत.त्यामुळे त्यांचे आपल्या कुटूंबाकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. या स्मार्टफोन आणित्यात उपलब्ध असणार्या ऍपच्या माध्यमातून माणसे जवळ आली पण त्यांच्यातीलप्रत्यक्ष संवाद जवळ- जवळ संपला. आजकाल तर नवरा – बायको ही एकमेकांशी सोशलनेट्वर्क साईटवरून संवाद साधतात, एकमेकांच्या हालचालींवर आणि ताज्या घडामोडींवरलक्ष ठेवतात. त्यामुळे त्यांना प्रत्यक्षात बोलण्याची गरजचभासत नाही. सोशलनेटवर्क साइट्स वरचा कोणासोबतचा ही नियमितचा संवाद नंतर कंटाळ्वाणावाटू लागतो मग तो संवाद कोणासोबतचा का असेना अगदी नवरा – बायकोसोबतचा ही. त्यामुळेहा संवाद क्रमशः कमी कमी होत जावून नंतर थांबतो. आपल्या देशात घटस्फोटाचं प्रमाणवाढत आहे त्याला हा न होणारा संवाद नंतर एक मोठ कारण म्ह्णून समोर येताना दिसतो.
आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आपल्या देशातीलशेतकरी जर स्मार्टफोनच्या आहारी गेला आणि तो आपला अर्धा वेळ जर त्यावर वाया घालवूलागला तर आपल्या देशाला ते परवडणारे नाही. स्मार्टफोनमुळे आपल्या देशातील तरूणांचीकल्पकता धोक्यात आलेली आहे कारण कित्येकांच्या कल्पकतेला पर्यायी ऍप स्मार्टफोनवरउपलब्ध झालेले आहेत. स्मार्टफोनच्या माध्यमातून समाजात चुकीची माहिती, चुकीच्यागोष्टी, चुकीची छायाचित्रे आणि चलचित्रे ही काही सेकंदात जगभरात पसरविली जातात.आता स्मार्टफोनमुळे कोणाची ही बदनामी ही एक गावा पुरती, शहरापुरती अथवा देशापुरतीमर्यादीत नसते आता ती बदनामी जागतिक होते. पूवी आपल्या आपल्या भावना व्यक्तकरण्यासाठी हक्काची माणसे लागायची पण आता ती हवीच अशी गरज उरलेली नाही कारण सोशलनेटवर्क साईट्च्या माध्यमातून आपल्याला अशी हजारो माणसे रोज भेटतात. आपल्यामुलांच्या आयुष्यात सध्या काय भानगडी सुरू आहेत हे पालकांना ही सोशलनेटवर्कसाईट्सच्या माध्यमातून कळ्ते आणि तेंव्हा ते आपल्या पाल्याशी त्याविषयीचर्चा करतात. त्याहून भयंकर म्ह्णजे वाचनसंस्कृती दिवसेन – दिवस कमी होत चाललेलीआहे. पूर्वी बसमधे, रेल्वेमधे अथवा इतरत्र वर्तमानपत्र अथवा इतर वाचनीय साहित्यवाचणारे तरूण दिसत नाहीत तर त्याउलट सर्वत्र स्मार्टफोनमधे घुसलेले तरूण पाहायलामिळतात. पुस्तकातील शंभर पाने वाचून आपल्या हवी ती माहिती मिळविण्यापेक्षा तीमाहिती आपल्या स्मार्टफोनवरील एका क्लिकवर मिळविण्याची सवय लागलेय आजच्या तरूणपिढीला . आजच्या तरूण पिढीची ही सारे झटपट कामे करण्याची आणि झटपट गोष्टी मिळविण्याचीसवय भविष्यात आपल्या देशाला महागात पडणार आहे यात शंकाच नाही. कालांतराने लोकांनास्मार्टफोन पासून दूर ठेवण्यासाठी सक्ती करण्याची गरज भासणार या बद्दल मला पूर्णखात्री आहे. तशी सुरूवात झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही. आज मी स्वतःला यास्मार्टफोन पासून दूर ठेवू पाहतोय पण माझ्या सभोवताळ्चे मला किती दिवस त्यापासूनदूर राहू देतील याबद्दल शंकाच आहे. पण मला वाटतं आपण स्वतः स्मार्टफोनचं गुलामहोऊन आपला मोल्यवान वेळ वाया घालविण्यापेक्षा स्मार्टफोनला आपला गुलाम करून आपलावेळ वाचावा म्ह्णून त्याचा योग्य वापर करायला हवा. तसं झाल तर आणि तरच आपल्या देशाचं भविष्य सुरक्षित राहील.
लेखक – निलेश बामणे
गोरेगांव(पूर्व) मुंबई – 400 065.
मो.8652065375 / 9029338268
Leave a Reply