नवीन लेखन...

स्मृती नाहीशी होण्यास ट्रान्स फॅट जबाबदार आहेत का?

ट्रान्स फॅट ही एक प्रकारची अनसॅच्युरेटेड फॅट असून खाल्ल्या नंतर मात्र शरीरात ती सॅच्युरेटेङ फॅट सारखी वागते, आणि म्हणूनच ह्याचा सेवनाने LDL म्हणजे वाईट कोलेस्टरॉल वाढते. ट्रान्स फॅट ही ट्रान्स फॅटी अॅसिड म्हणून ही ओळखली जाते. ही दोन स्वरूपात आढळते. प्राणीजन्य पदार्थातून जसे की जास्त चरबी असलेले मटण, बीफ, कोकराचे मटण, तसेच पूर्ण फॅट असलेले दूध ह्यात ट्रान्स फॅट निसर्गत:च आढळते तर दुसर्‍या प्रकारात ही फॅट अन्न प्रक्रियेच्या दरम्यान तयार होते. उदाहरणार्थ तेलापासून कृत्रिम तूप बनवण्यासाठी त्यात हायड्रोजन घातला जातो. ह्या प्रक्रियेस पारशली हायड्रोजनेशन असे ही संबोधिले जात. आशा प्रकारच्या तेलाचा वापर रेडीमेड खाद्य पदार्थात त्याचे पोत, शेल्फ लाईफ (पदार्थ दिर्घकाळ टिकण्यासाठी) पदार्थांची स्टॅबीलीटी टिकण्यासाठी केला जातो. तेल जास्त तापवल्यास किंवा एखाद्या वापरलेल्या तेलाचा वापर वारंवार करत राहिल्यास त्यातील ट्रान्स फॅटचे प्रमाण तुलनेत वाढत जाते. तळणीचे तेल सातत्याने वापरणे हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. आपणा सर्वांना माहित आहेच की ट्रान्स फॅटचे सेवन बर्याच रोगांशी निगडीत आहे.

image-1ट्रान्स फॅट आणि स्मृती / मेमरी ह्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे?
मेंदूचे आधार स्तंभ असलेले तुमचे वागणे आणि तुमचा मूड ह्या दोन्ही गोष्टींचा ट्रान्स फॅटच्या सेवनाशी सबंध आहे हे पुर्वीच लक्षात आले आहे. पुरूषांच्या आणि मुख्यत्वे करून त्यांच्या productive वयात ट्रान्स फॅटच्या सेवनाचा त्यांच्या बुद्धीमतेवर परिणाम करणारा एक महत्वाचा घटक आहे असे नवनवीन प्रयोग दाखवत आहेत.

AHA च्या 2014 मधील परिसंवादात आहारातील ट्रान्स फॅटच अतिसेवन आणि त्याचा स्मृतीवर होणारा परिणाम ह्या विषयावरील शोध प्रबंध सादर करण्यात आला होता. युनिवर्सीटी ऑफ कॅलिफोर्नियातील San Diego School of Medicine ह्या विद्यापीठात Beatrice A. Golomb ह्यानी “High consumption of dietary trans fatty acids and its impact on the memory” ह्या विषयावर अध्ययन केले. त्यासाठी 20 ते 85 ह्या वयोगटातील स्त्री, पुरूषांची निवड केली. ह्या सर्व सहभागी व्यक्तींच्या आहारा विषयीची माहिती गोळा केली आणि शब्द उजळणीच्या सहायाने त्यांच्या स्मृती संदर्भात 104 कार्ड द्वारा चाचणी घेतली. ह्या कार्ड्स मध्ये सिक्वेलनी शब्द दाखवण्यात आले. त्यापैकी 82 कार्डस मध्ये दाखवलेले शब्द पहिल्यांदाच दाखवण्यात आले होते तर 22 कार्डस मध्ये लिहिलेले शब्द आधीही दाखवण्यात आले होते.

सहभागी व्यक्तींना तो शब्द पहिल्यांदा दाखवण्यात आला होता की तो परत परत दाखवण्यात आला ह्या संदर्भात विचारणा केली असता असे आढळले की 45 किंवा त्यापेक्षाही कमी वय असलेल्या व्यक्ती 86 शब्द ओळखू शकल्या. ट्रान्स फॅटचे सेवन करणार्‍या व्यक्तींची तुलना जेव्हा ट्रान्स फॅट न घेणार्‍या व्यक्तींशी केली असता असे निदर्शनास आले की 1 ग्राम ट्रान्स फॅटचे सेवन करणार्या व्यक्ती 0.76 शब्द कमी ओळखू शकल्या. जेव्हा व्यायाम, शिक्षण, अ‍ॅक्टिव्हीटी आणि मूड ह्या गोष्टी सुद्धा अडजस्ट केल्या तेव्हा सुद्धा ट्रान्स फॅट घेणाऱ्या व्यक्तींमध्ये स्मृती कमी झालेली आढळली. पण हा फरक वयस्कर व्यक्ति मध्ये जाणवला नाही.

परदेशी व्यक्तिंव्यक्तींपेक्षा भारतीय व्यक्ती ट्रान्स फॅट कमी घेतात असा समज आहे. पण हे खरं आहे का? काहींच्या मते हे खरं ही असेल पण माझ्या मते तरी हे खरं नाही. भारतीय जरी प्राणीजन्य पदार्थातील फॅटचे आणि प्रोसेसङ खाद्य पदार्थांचे सेवन कमी करत असल्या तरी बरेचसे भारतीय गोड पेय्य, मिठाई, तळलेल्या पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात करतात. तसेच वापरण्यात आलेल्या तेलाचा वापर वारंवार करताना दिसतात.

कमर्शिअलि तयार केलेले स्नॅक्स, बिस्किटे, कुकीज, आणि वापरलेल्या तेलाचा वारंवार वापर ह्या सर्व खाद्य पदार्थातून भारतीयांना ट्रान्स फॅट मिळते. “High trans fatty acid contents in Indian foods” ह्या विषयी Nutrition & Food science journal, Vol. 38 Iss: 6,564 – 569. ह्या जरनल मध्ये प्रसिद्ध झाला आहे. ह्या अध्यापनात २०० भारतीय स्नॅक्स आणि मिठाई ह्याचा समावेश केला आहे.

पदार्थांचे अनॅलिसीस करण्यासाठी प्रत्येक पदार्थ तयार करण्यासाठी त्यात कोणकोणते जिन्नस वापरले आहेत, त्यांचं प्रमाण, ते करण्याची पद्धत ह्या विषयीची माहिती दिली आहे. पदार्थांच्या अन्नघटकांचे पृथक्करण करताना Indian National Institute of Nutrition ह्या संस्थेचा अन्नघटकांचा डाटा बेस वापरण्यात आला आहे.

जेव्हा ह्या पदार्थांचे पृथक्करण केले तेव्हा हे पदार्थ कॅलरीज मध्ये जास्त आहेत असे निदर्शनास आले.खाली दिलेल्या तक्त्या वरून हे तुमच्या लक्षात येईल.
table

image-2शास्त्रीय प्रयोगांच्या आधारावर US Food and Drug Administration ह्यांनी 16 जून 2015 रोजी पारशली हायड्रोजनेटेड तेल जे आरटीफीशील ट्रान्स फॅटचा एक स्त्रोत आहे आणि जे प्रोसेसङ खाद्य पदार्थांत वापरले जाते ते आता जनरली सेफ (Generally Recognized Safe – GRAS) ह्या कॅटेगरी तून वगळण्यात आले असून खाद्य पदार्थ निर्मिती करणार्‍या संस्थांना ते खाद्य पदार्थातून काढून टाकण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी दिला आहे.

Avatar
About डॉ. शीतल म्हामुणकर 20 Articles
डॉक्टर शीतल म्हामुणकर ज्येष्ठ आहारतज्ज्ञ आहेत. त्या या क्षेत्रात ३० हून अधिक वर्षे कायरत असून क्रिडापटूंसाठी आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच काम केले आहे. डॉ. म्हामुणकर या प्रिव्हेंटा क्लिनिक या संस्थेच्या संचालिका आहेत. आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..