एकदा मज भेटला राजनेता त्यास पुसिले, ‘काम तुझा कोणता ?’कोणीतरी बोलले,परतला हा आता कुचकामी विदेशवारीसाठी गेला होता |१|जाऊनी तिकडे ह्याने केले काय ?कर्जासाठी रडला मोकलुनी धायदया कोणा आली काय ? जाचक अटीशिवाय पर्याय नाय |२| लपवीन्या आपले अपयश घातला याने बहुरूपी वेश विकसीत करीन म्हणे देश बघा ह्याचा लंगड़ा अभिनिवेश |३|स्वदेशिचा पडला मागे विचार परदेशी मालाला मागणीच फार डोक्याला ह्याच्या जडला आजारहा करू पाहतो आहे देश भिकार |४|हातात ह्याच्या मिळताच सत्ता सुरुवात केली मिळवायला मत्ता धनोपहार हाच याचा शिरस्ता चमच्यानां याच्या फुकटचा भत्ता |५|ओढा याला आता खुर्चीवरून खाली स्वदेशिच्या पेटवा प्रखर मशाली ….!* काव्य *नरेन्द्र श्रावणजी लोहबरे
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
Leave a Reply