नवीन लेखन...

स्वयंपाक आणि मी

घरातकोणी बाईमाणूस नसल्यामुळे जवळ- जवळ पंदरा-वीस वर्षानंतर माझ्यावर स्वतःसाठी जेवनतयार करण्याची वेळ आली होती. एक वेळ मला जेवन नसेल तरी चालेल पण मला चहा लागतोच,चहा प्यायल्या शिवाय मला माझा दिवस सुरू झाल्यासारखाच वाटत नाही, चहाप्यायल्याशिवाय माझं डोकच चालत नाही असं म्ह्टलं तरी चालेल. प्रश्न एक – दोनदिवसाचा असता तर मी गॅसला हात ही लावला नसता पण प्रश्न आठवडाभराचा होता. आठवडाभरहॉटेलात खाणं माझ्या खिशाला परवडलही असत पण ते माझ्या पोटाला परवडणार नव्हत. मुळातमी आता शहाकारी असल्यामुळे आणि त्यात तेळ्कट तिकट खाणं माझ्या पोटाला फारस झेपतनसल्यामुळे आठवडाभर हॉटेलात खाण्याचा पर्याय माझ्यासाठी योग्य नव्हता. हल्ली बर्‍याच वर्षात मी स्वतःहून चहा ही गरम करूनघेतल्याचे मला स्मरत नाही. पण म्ह्णतात ना आडला नारायण…काय करणार हिंमत करून गॅसपेटवला आणि चहाचं पातेल त्यावर ठेवल त्या पातेल्यात एक कप पाणी, एक चमचा चहा पावडरआणि एक चमचा साखर टाकली. दुध टाकणार तोच लक्षात आलं दुध नासलेल आहे. खरं म्ह्णजेमीच दुध गरम करायला विसरलो होतो. दुध गरमीमुळे नासल होतं. त्यामुळे मला आता काळीकडक चहाच प्यायला मिळाली अशी काळी चहा ही मी बर्‍याच वर्षानंतर पित होतो. एके काळीयाच काळ्या चहावर तर मी पोसलो गेलो होतो. माझ्या लहानपणी याच काळ्या चहात मी पाच –सहा बटर बुडवून खात पोटाची खळगी भरत असे कधी – कधी. माझ नशीब त्यातल्या त्यात चांगलचम्ह्णावं लागेल कारण या काळया चहाला मी कधीच महाग झालो नाही. समाजात तुंम्हालास्वतःहून किती लोक चहा प्यायला घेऊन जातात, तुमच्या मनात नसतानाही तुंम्हाला चहापिण्यासाठी आग्रह किती लोक करतात, तुंम्ही कोणालाही भेटायला गेल्या नंतर तुंम्हालाचहा पिणार का हा प्रश्न न विचारता चहाचा कप तुमच्या समोर किती जण ठेवतात यावरूनखर्‍या अर्थाने तुमची समाजातील किंमत ठरत असते पण त्याच बरोबर समोरच्याच्या मनातीलतुमच स्थानही तुमच्या लक्षात येत असत.

आजमी स्वतःसाठी स्वतः च्या हाताने तयार केलेला चहा पिताना जो आनंद होत होता तो शब्दातव्यक्त करण केवळ अशक्य होत. मी तयार केलेल्या चहात साखर कमी पडलेली होती कारण चहातयार करण्याच गणित मी आता विसरलेलो होतो.काळाच्या ओघात मी आता इतका मोठा झालोय की आता मला पुन्हा लहान होणं जमणारच नाहीअसं वाटत होतं. पण माझ्या त्या वाटण्यात तथ्य नव्ह्त. एकदा का माणूस पोहायला आणिसायकल चालवायला शिकला की तो ते कधी ही विसरत नाही पण हेच गणित स्वयंपाकाच्याबाबतीत लागू पडत नाही हे मी आज खात्रीने सांगू शकतो. जेवन तयार करण्यासाठी सरावासोबत कोशल्य , बुध्दीमत्तेची आणि गणिताची जोड असावी लागते. वयाच्या अवघ्या चौदा-पंदराव्या वर्षी मी उत्तम स्वयंपाक करायचो, पीठ मळण्यापासून पोळ्या लाटण्यापर्यतमी सारे उत्तम करत असे इतकेच नव्हे तर पाटयावर वरवंट्याने उत्तम गोडा मसाला ही वाठून तयार करत असे. त्या पाट्यावरीलगोड्या मसाल्याची चव आजही माझ्या जीभेवर रेंगाळते कारण सध्याच्या मिक्सरच्यामसाल्याला ती चव काही केल्या येतच नाही, पण का ? हे कोडे मला उलगडत नाही. कदाचितआजच्या मिक्सरच्या मसाळ्यात हाताचा घाम मिसळत नसावा हे इतर कारणा पैकी एक कारणअसावं. आमच्या घरात ज्या काळात भात असलातर डाळ नसायची आणि पोळी असली तर भाजी नसायची त्याकाळात कधी- कधी हा गोडा मसालाच भाजीची जागा घ्यायचा.तो नसेल तर मिरचीची पुड, मीठ आणि शेंगतेळ यांचा घोळ ते काम करायचा. आता पोठभर भाजीखायला मिळत असतानाही त्या घोळाची चव आजही जीभेवर घोळत असते. मध्यंतरी कांद्यालासोन्याचा भाव आला होता पूर्वी कांद्याला फारस महत्व नव्हतं. आपल्या घरात कांदेनसतील तर अगदी शेजार्‍याकडून दोन – तीन कांदे मागून आणणे सहज शक्य होतं. त्यामुळेकांदयाची अथवा टोमॅटोची चटणी त्याकाळी भाजीला पर्याय होत होती. मला नावडती भाजीआमच्या घरात शिजली की मी आजही हया पर्यायाचा विचार करतो. आजही मला कांद्याची आणिटोमॅटोची चटणी खायला भयंकर आवडते. मला बाटाटा आणि भेंडीची भाजी सतत वर्षभर जरीखायला दिली तरी ती खाण्याचा मला कंटाळा येणार नाही. ज्या काळात मी जेवन करायचोत्या काळात मी पाककलेचे अनेक प्रयोग केले होते. त्यातील काही फसले होते तर काहीयशस्वी झाले होते. ते काही ही असो स्वयंपाकाच्या बाबतीत माझ्या हाताला चव आहे असेमी खात्रीने सांगू शकतो. मी कोणताही पदार्थ तयार केला तर तो शक्यतो चविष्ठ होतोच.आता काळ परवाच मी पहिल्यांदा आमरस तयारकेला उत्तम झाला होता पण तो तयार करण्यासाठी करावी लागणारी मेहनत लक्षात घेता मीतो पुन्हा तयार करण्याच्या भानगडीत पडेन याची शक्यता थोडी कमीच आहे. बर्‍याचवर्षानंतर पहिल्यांदा भात शिजवला तेंव्हा थोडी गडबड उडाली कारण माझ पाण्याच गणितचुकल ज्यामुळे भात थोडा करपला. पण दुसर्‍यांदा भात उत्तम झाला. मुंगाची डाळ, बटाटाआणि टोमॅटो यांचा छान सांभारही तयार केला होता. सांभार चविष्ठ होईल याची खात्रीवाटत नसतानाही तो नेहमीसारखाच चविष्ठ झाला होता. पीठ मळण्याचा अनुभव माझ्या गाठीशीअसला तरी सराव नसल्यामुळे थोडी तारांबळ उडत होती. पोळ्या लाटताना काही केल्यात्यांना मनासारखा गोळ आकार येत नव्हता. पूर्वी मी पोळ्यांना गोळ आकार देण्यासाठी छोट्या ताटाचा वापर करायचो. आता तसा ताट आमच्याकडे नसळ्यामुळे त्या ओबड –धोबडपोळ्या खाण्याशिवाय पर्यायच नव्ह्ता. पूर्वी जेंव्हा मी मांसाहार करायचा तेंव्हासारचं फार सोप्प होत. माझ्यासाठी अंड्याचा पर्याय उपलब्ध असायचा ज्यामुळेअंड्याची बुर्जी, अंड्याचा पोळा, अंड्याचासांभार, आणि उकडलेल्या अंड्याची चटणी सहज तयार करता यायची. आजकाल मी खात असणारी सोयाबीनची भाजी पनीर बुर्जी मी कधीच तयार केलीली नव्हती. जेवन करण्याची वेळ माझ्यावर आली म्ह्टल्यावर मीएक वेळ जेवन करणं टाळणार हे ओघाने आलच, ती एक वेळ भागविण्याचा पर्याय म्ह्णजे पाव.आज ही पाव चहात बुडवून न खाता चार- पाच पाव एका प्लेटमध्ये एकावर एक मांडून त्यावरचहा ओतून ते ओले झाल्यावर चमच्याने खाण्यात जी मजा असते ती काही औरच असते पण हा !ही मजा मी फक्त माझ्या घरात असतानाच घेतो. पूर्वी मला फारच आनंद झाला तर कांदाभजी, बटाटा भजी आणि कटलेस ही तयार करून खाल्याचे मला स्मरते. पण हल्ली मी ते खाणेटाळतो कधी तरी नाईलाज म्ह्णून खाल्लं तर तर ओळखीच्या हॉटेलातच खातो. खरं म्ह्णजे ह्ल्ली मी मनासारख काही ही खात नाही खाण्याबाबतीत हल्ली मी जरा जास्तच चोखंदळ झालोय.

मध्यंतरी एका पंचतारांकीत हॉटेलात काही दिवस वास्तव्य करण्याचा योग आला होता. तेथे ही मीकाही मोजक्याच पदार्थाचा स्वाद घेतला होता त्यातल्या त्यात माझ्या स्मरणात राहिलातो लिंबाच्या रसाचा सूप. जेवनाच्या बाबतीत वेळ पडली तर मी काहीही खाऊ शकतो . मला नआवडणार्‍या भाज्याही मी कधी-कधी औषध म्ह्णून खातो. मला काराल्याची भाजी खायलाआवडते की नाही ते नीट सांगता येणार नाही पण ती मी आवर्जून खातो. मी माझा रागजेवनावर कधीच काढत नाही. ताटात कधीच काही शिल्लक ठेवत नाही. जास्तीच अन्न ताटातकधीच वाढून घेत नाही. मी बर्‍याचदा पाहतो लग्न – समारंभात लोक हावर्‍यासारखे सर्वचपदार्थ ताटात वाढून घेतात आणि नंतर त्यातील निम्म्याहून अधिक पदार्थ ताटासह फेकूनदेतात. अन्नाची ही नासाही मला पाहवत नाही कारण एका वेळ्च पोटभर अन्न मिळविण्यासाठीलोकांची होणारी तगमग आणि त्यासाठी करावी लागणारी मेहनत मी प्रत्यक्ष पाहिलेली तर आहेचपण स्वतः प्रत्यक्षात अनुभलेली ही आहे. बर्‍याचदा मला नव्याने ओळख झालेले लोक घरीजेवायला येण्यासाठी आग्रह करतात पण मी त्यांचा आग्रह स्पष्ट नाकारतो कारण माझ्या खाण्या- पिण्च्ण्या सवयी त्यांना महीत नसतात आणि त्यांना त्याचा त्रास व्हावा अशीमाझी इच्छाही नसते. माझ्या आता पर्यतच्या आयुष्यात मी फक्त दोनच मित्रांच्या घरी जेवलोय.

आजहीआमच्या घरी मी जेवायला शेवटी असलो तर जे पदार्थ उरल्यास फेकावे लागतील असे पदार्थमी खाऊन संपवतोच. शिळा भात तळून खाण तसं शरिराला हानीकारकच आहे अस मी मानत असतानाहीतो खाणे मी टाळत नाही, का कोणास जाणे तो खायला मला खूपच आवडतो. कदाचित ! तेंव्हाचीसवय म्ह्णूनही असेल. मला गोडाचा रवा तयार करून खायला पूर्वी आवडायचा पण हल्ली तोप्रसादा पुरता मर्यादित झालेला आहे. सुरणाची भाजी हल्ली मला आवडू लागली आहे पण जरते उकडून त्याची बरीक काप करून खसखस लावून जर ते तव्यावर तळून तयार केलेली असेलतर.

स्वतःसाठीस्वतःच्या हाताने जेवन तयार करून ते खाण्यात एक वेगळीच मजा असते पण आपली संस्कृतीसर्वांना सोबत घेऊन जेवायला शिकविते प्रसंगी अन्न कमी पड्ल्यास एखाद्यावेळी कमीखाण्याचीही आपली मानसिक तयारी झालेली असते, प्रसंगी इतरांसाठी आपण अर्धपोटी अथवाउपाशी ही राहतो. स्वयंपाक या एका गोष्टीमुळेच आपल्या देशातील स्त्री-पुरूष यांच्यानात्यातील गोडवा टिकून आहे अस माझं ठाम मत आहे. तो यापुढे ही टिकून राहावा अस जर स्त्रियांना वाटत असेल तर प्रत्येक स्त्रिला स्वयंपाक हा करता यायलाच हवा.स्त्रियांनी पुरूषांना कोणत्याच बाबतीत कमी लेखनं आमच्यासारख्या काही महाभागानामान्य नसत. मग आमच्यासारखे काही महाभाग स्वयंपाक करण्यातही पटाईत होतात. पणस्वयंपाक करण हे बायकांच काम असल तरी सोप्प काम नसत हे मी शपथेवर सांगू शकतो.माझ्यावर आठवडाभर स्वयंपाक करण्याची वेळ आली तर मी त्यातून पळ्वाट शोधतोय. मग !स्त्रिया वर्षानुवर्षे नव्हे तर संपूर्ण आयुष्यभर हा उपद्व्याप कसा करतात हे एक न उलगडणार कोडच आहे. म्ह्णून तर आजकालच्या मराठी मालिकात त्यांचे अर्धाहून अधिक भागस्वयंपाकघरातच चित्रीत होताना दिसतात. फक्त अन्नच नाही तर कट-कारस्थाने ही याच स्वयंपाकघरात शिजताना दिसतात. पुरूषांना आपल्या रोजच्या कामातून आठ्वड्याला निदान एक रजातरी मिळते पण स्त्रियांना ती ही मिळत नाही. त्याबद्दल त्या तक्रार करीत नसल्या तरीपुरूषांनी हे समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे. आपल्या देशात स्त्रियांना स्वयंपाक घरात मदत करणार्‍या पुरूषांना बायल्या म्ह्णून संबोधले जाते हा ही पुरूषीमनोवृत्तीचाच एक भाग आहे. माझ तर व्यक्तीशः असं ठाम मत आहे की प्रत्येक पुरूषालास्वयंपाक करता यायला हवाच निदान खिचडी तरी तयार करता यायलाच हवी. आमच्याकुटुंबातील सर्वच पुरूषांना उत्तम स्वयंपाक करता येतो याचा मला अभिमानच आहे. आजबर्‍याच वर्षानंतर स्वयंपाक करताना मी थोडा बावचललो पण नंतर सावरलो. अगदी चुळीवरहीस्वयंपाक करण्याचा अनुभव माझ्या गाठीशी असल्यामुळे चुलीवर शिजलेल्या अन्नाला एकवेगळीच चव असते हे मी खात्रीने सांगू शकतो. चुळीत भाजलेले सुके बोंबिल आणि त्याचावास मला आजही विचलीत करतो. आता ही मी शुध्द शाकाहरी असतानाही मांसाहारी लोकांसोबतजेवायला मला काही अडचण नसते. मी माझ्या मित्रांसोबत चायनीज हॉटेलात गेल्यास नेहमीचमाझ्यासाठी शाहाकारी आणि त्यांच्यासाठी मांसाहारी जेवन मागवितो. आमच्या घरातहीरोजच दोन्ही प्रकारचे पदार्थ शिजत असतात. मी शाकाहारी असतानाही मला जर मटण अथवामच्छी साफ करून कापण्याची वेळ आली तर मी ते नक्कीच करेन. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयीचा इतरांना त्रास होता कामा नये या मताचा मी आहे. प्रत्येकानेत्याला जे खायला आवडत तेच खायला हवं पण पदार्थांच्या प्रेमात पडता कामा नये.प्रसंगी एखादा पदार्थ खाणं टाळता ही आलं पाहिजे आता मला उदया डॉक्टरने तू चहा पिऊनकोस म्ह्णून सांगितल तर मी नाही पिणार. पण काही लोक पदार्थाच्या प्रमापोठीस्वतःच स्वतःच्या हाताने तब्बेत बिघडवून घेतात. प्रत्येक पदार्थालाही पर्याय असतातफक्त ते पर्याय शोधावे लागतात. काही पुरूषांना स्वयंपाक करायला आवडतो पण भांडीघासायला आवडत नाही हे म्ह्णजे टाकाला जाऊन भांड लपविण्यासारखं नाही का ? मला तरवाटत कुटूंबातील प्रत्येक स्त्रिला स्वयंपाक घरातून आठवड्याला एक दिवस तरी सुट्टीमिळायलाच हवी. पण ते होण सहज शक्य नाही याची मला पूर्ण कल्पना आहे कारण काहीस्त्रियांनाच आपल्या स्वयंपाक घरात पुरूषांनी केलेली लुडबुड आवडत नाही. असो पण आतालग्नापूर्वी बायकोने नवर्‍याला तुला जेवन करता येत का ? हा प्रश्न विचारलाजाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आजच्या प्रत्येक तरूणाने स्वयंपाकघरातही आपल कौशल्य आजमावण्यासाठी सज्ज व्हायला हवं आणि ही काळाची गरज आहे असंम्हटल तर ते वावग ठरणार नाही.

— निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 419 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..