नवीन लेखन...

स्वामीजी आणि भारत निर्माण

(स्वामीजींनी एक उत्तम गोष्ट केली ती म्हणजे त्यांनी या कर्मयोगाची व्याख्या केली नाही. जर मला काही कृती करायची असेल तर आधी मला हे कळणे गरजेचे आहे की हे माझं कर्म आहे. तेव्हाच मी करु शकेन. पुन्हा कर्माची कल्पना ही निरनिराळ्या राष्ट्रात निर निराळी असते.)
विश्वाच्या उत्पत्तीपासून माणसाचा शोध चालू आहे. तो विश्व निर्मितीच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी कोणी या कामासाठी संगीताची उपासना करतो, कोणी विज्ञानाचा आधार घेतो तर कोणी अध्यात्माचा. सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, भौगोलिक अशा सर्व पातळ्यांवरील सर्व संघर्षाचे ध्येय हे एकच असते. ते म्हणजे त्या रहस्याचा शोध घेणे कोणी त्याला देव म्हणते तर कोणी शोध. फरक हा परिस्थिती आणि काळाचा असतो. भगवान बुध्द, महावीर आणि श्रीकृष्ण यांच्या परिस्थिती आणि काळ त्यांची कृती ठरवीत असतो. कृष्णाची गीता म्हणजे प्रमाण नव्हे. परंतु तो जगण्याचा मार्गदर्शक आहे. त्यातून जगण्याच्या सर्व अंगांना स्पर्श केला आहे आणि त्यातून जगातील हिंदुत्वाचा डोलारा उभा आहे.
या तत्वज्ञानाचा पाईक होण्याची संधी भारत व त्यातील लोकांना मिळाली. आणि त्याचा योग्य तो अभ्यास करुन त्या विश्वशक्ति पर्यंत पोहोचण्यासाठी उत्तमरितीने कर्मयोग ज्यांनी समजावून सांगितला त्यातील एक चांगला माणूस म्हणजे स्वामी विवेकानंद.
हा कर्मयोग समजावून सांगतांना स्वामीजींनी एक उत्तम गोष्ट केली ती म्हणजे त्यांनी या कर्मयोगाची व्याख्या केली नाही. जर मला काही कृती करायची असेल तर आधी मला हे कळणे गरजेचे आहे की हे माझं कर्म आहे. तेव्हाच मी करु शकेन. पुन्हा कर्माची कल्पना ही निरनिराळ्या राष्ट्रात निर निराळी असते.
वेदांमध्ये जे आहे ते माझे कर्म ही हिंदुंची धारणा असेल तर बायबलमध्ये जे आहे ते माझे कर्म अशी ख्रिश्चनांची धारणा. त्यामुळे कर्म ही अनेक गोष्टींसारखी वैश्विक संकल्पना आहे. तिची व्याख्या करणे अशक्य आहे. आपण केवळ भौतिकातील कृती आणि परिणाम यांच्यावरुनच तिची कल्पना करु शकतो. आणि येथेच गंमत सुरु होते.
बुध्दांने कुरु क्षेत्रावर जाऊन अहिंसा सांगितली असती तर तो हकनाक मारला गेला असता. आणि श्रीकृष्णानी बुध्दाच्या जागी राहुन युध्दाचा संदेश दिला असता तर तो क्रूरकर्मा ठरला असता.
म्हणूनच स्वामीजींनी कर्माची कल्पना देतांना पृथ्वीवरील सर्व देशातील सर्व लोकांना एकच संदेश दिला, “Do not injure only being; not injure only being is virtue, injuring any being is sin ” (Sankirt aphorism )
हा संदेश आणि त्याचे वास्तव हा भारतासाठी खुप वास्तव आहे. या शतकाच्या मध्यापर्यंत भारतात युवा वर्गाची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असेल याचा सुनियोजित वापर भारत निर्माणाच्या दृष्टीने खुप महत्वाचा आहे. या सर्वांना त्या जागी उभे राहुन कोणीतरी योग्य सल्ला देणे वा मार्ग दाखवणे गरजेचे आहे.
स्वामीजीच्या दृष्टीने हे कर्म योग्य रीतीने पटवून दिल्यास या युवा वर्गाचा निश्चित उपयोग करता येईल. अन्यथा याचा एखादा बुमरॅग होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
याचे एक कारण की मनुष्याच्या व्यक्तिगत पातळीवर जे हाती असते ते परिस्थितीनुसार त्याचे कर्म असते. परंतु त्याला योग्य निर्माणाकडे नेणे हे आणि योग्य ती परिस्थिती निर्माण करणे हीच मोठी आव्हानाची बाब आहे.
बर्‍याच वेळा या सर्वांचा उहापोह करणे हे गरजेचे वाटते. कारण एखाद्या गोष्टीला नकार देणे किंवा स्वीकारणे यात बर्‍याचदा आपण गोंधळतो. आपले गोंधळणे जर व्यक्तिगत असेल तर ती गोष्ट फारशी धोकादायक नसते. एखादा समुदाय, समाज राष्ट्र या गोंधळात सापडते. तेव्हा मात्र ती स्थिती अनेक समस्या निर्माण करु शकते.
उदाहरण द्यायचे असल्यास भारता समोरील कोणतीही गोंधळाची स्थिती आणि त्यावर काही लोकांचे भाष्य हे युवावर्गाच्या संस्काराचे मूळस्त्रोत असतात. प्रत्येक काळात काही माणसे त्यांचे विचार, त्यांची विधाने हे जनमाणस घडवित असतात. जनमाणसात वैयक्तिक पातळीवर त्याचे परीणाम फारसे विचारात नाही घेतले तरी सामाजिक पातळीवर त्या लोकांवर आणि विधानांवर मोठी जबाबदारी असते.
युवा हा शब्द सतत वापरण्याचे कारण की ते मन ही योग्य अयोग्याचा विचार करुनही संवेदनशील असू शकते. या बर्‍या वाईटाचा लवकच परीणाम आणि कृती युवावर्गातून दिसत असते. यास्तव त्यांना योग्य मार्गावर नेणे हेच भारत निर्माणाचे मुख्य काम आहे. असे स्वामीजींना वाटायचे. आता योग्य-अयोग्य, चांगले- वाईट कुणी ठरवायचे? करावे की न करावे कुणी सांगावे? एखादी गोष्ट स्वीकारावी ही त्यास नकार द्यावा याबद्दल आपली अर्जुनासारखी अवस्था असते.
या सर्वांवर प्रकाश टाकला असता सर्व गोष्टी या स्वीकाराव्या लागतातच परंतु नकारातही सौदर्य असते ते जेव्हा युवा वर्गापुढे ठेवले जाईल तेव्हाच अर्जुन स्थितीतून बाहेर पडता येईल.
जे समोर आहे ते दरवेळी कर्मच असेलच असे नाही. पण आधीपासूनंच भरलेल्या (मग ते संस्काराने असो वा बंधनाने) मनाने निर्णय घेणे म्हणजे नक्कीच कर्म नव्हे.
या सगळ्या अवघड अशा वाटणार्‍या गुंतागुंतीच्या विचारांचा सरळ सोपा अर्थ हा की आपण स्वतः मन आणि शरीर यांचे फक्त मिश्रण नव्हे. भारतातील तरुणांपुढे जर हे ठेवले गेले की या शरीराच्या अस्तित्वाचे प्रयोजन तुम्ही किती सुंदर आहात याची जाणीव करुन देणे हे आहे तर ते उपयोगाचे आहे. पण ते सोप्या भाषेत होणे हे त्याहून काळाची गरज आहे.
(उत्तम रंगांची, स्वरांची मस्त दुनिया आहे. याचा स्वच्छ मनाने अनुभव घेणे कुठल्याही पूर्वसंस्काराशिवाय त्याला भिडणे म्हणजे चेतना उत्तेजक असणे ती त्या सुखास कारणीभुत ठरते. जेव्हा ही चेतना अकुंचित होते तेव्दहा दुःख आणि कष्ट निर्माण होते.)
मनावर संस्कार करणारे पाच घटक असतात. स्थळ, काळ, अन्न, पूर्वसंस्कार आणि कृती.
प्रत्येकस्थळी जेथे तुम्ही असता त्याची तुमच्या मनावर वेगवेगळी छाप पडते. अगदी आपल्या घरातल्या वेगवेगळ्या खोलीत आपल्याला वेगवेगळे वाटते. अगदी तुम्हाला एखादी विशिष्ट जागा आवडली तर तुम्हाला असे आढळेल की काही वेळानंतर ती तशी नसते.
काळ हा ही एक घटक आहे. दिवसातील वेगवेगळ्या वेळेचा आपल्यावर वेगवेगळा परिणाम होतो.
वेगवेगळ्या प्रकारचे अन्न आपण खातो त्याचा परिणाम आपल्यावर बरेच दिवस राहतो.
आपल्यावर पूर्वसंस्कार आणि कृती याची मनावर वेगळी छाप पडते. सजगता, दक्षता, ज्ञान आणि ध्यान या सगळ्याची पूर्वसंस्कार पुसुन टाकायला मदत होते.
या पाचही घटकांचा कितीही प्रभाव पडत असला ती ज्ञानात जशजशी प्रगती होईल तस तसे आपला यासर्वांवर प्रभाव पडत जातो.
ही उत्तम रंगांची, स्वरांची मस्त दुनिया आहे. याचा स्वच्छ मनाने अनुभव घेणे कुठल्याही पूर्वसंस्काराशिवाय त्याला भिडणे म्हणजे चेतना उत्तेजक असणे ती त्या सुखास कारणीभुत ठरते. जेव्हा ही चेतना अकुंचित होते तेव्हा दुःख आणि कष्ट निर्माण होते.
त्यामुळे भारत निर्माणातील युवामन हे लहान बाळासारखे आहे त्याला गरम पातेल्याला हात लावू नको असे सांगितले तर ते नक्कीच लावेल आणि चटका बसेल. बंधनातून कृती घडणे योग्य नव्हे पण सूचना देणे ही गरजेचे शेवटी ते व्यक्तिगत चेतनेवर अवलंबून आहे.
समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायचा असेल तर त्या युवामनाला चेतनेची गरज आहे, उत्तेजनेची नाही.
चेतनेचा विस्तार म्हणजे सजगता म्हणजे शांती तेथे उत्तेजनाचा फरकही पडत नाही आणि तिचे अस्तित्वही उरत नाही.
जेव्हा सुर्य प्रकाश असतो तेव्हा मेणबत्ती पेटली आहे की नाही याने काही फरक पडत नाही. पण चेतना, उत्तेजनावर नीट लक्ष दिल्यानेच निर्माण होते.
त्यामुळे भारतीय युवा शाक्तिंसमोर उत्तेजना महत्वाची आहे हे ठेवायलाच हवे पण उत्तेजनेपेक्षाही मोठे काही तरी आहे जेथे चेतनेचा विस्तार होतो. हे ठेवायचे असल्यास स्वामीजींच्या विचाराने जाणे हाच आपल्या समोर सुर्य प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आहे. तेथेच भारत निर्माण आहे.
अनिकेत धामणगांवकर, सांगली.
(सौजन्य – “पंढरी प्रहार”)

— अनिकेत धामणगांवकर, सांगली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..