पहा ना… काय आहे हल्ली सर्वंचजण “मी खुपच बिझी आहे…. वेळच मिळत नाही…” अशी अनेक अपेक्षाभंग वाक्ये आपल्याला ऐकायला मिळतात… म्हणजे अवघड कामे विज्ञानाने तंत्रज्ञान्याच्या मदतीने सहजसुलभ ऊपलब्ध करुनसुध्दा जो-तो प्रचंड प्रमाणात व्यस्त असतो… असो…
पण या विज्ञानाचा कशा प्रमाणात गैरफायदा घ्यायचा…. हे काही अतीहुशार महाशयांना माहीती असतच… किंबहुना यांचा जन्मच यासाठीच झालेला असतो. अशा महाशयांच्या मुखातुनच पुढील वाक्यरचना आपण ऐकत असतोच….,
“अरे मी म्हणजेच अॉफीसच… ,
माझ्या शिवाय अॉफीसमधील एक काम पुर्णंपणे संपत नाही…,
आमचे साहेब न… पुर्णंपणे माझ्यावरच अवलंबून असतात…
अरे एक दिवस सुट्टी घेतली ना…साहेब जाम चिडचिड करतात…
मी म्हणजे सरांचा ऊजवा हातच…….
मी म्हणेल तस सर ऐकतात……….
हल्ली कामाचा व्याप.. म्हणजे मलाच ताप………..
हाफ डे घ्यायचा म्हणल तरी अॉफीसच दोन दिवसांच काम रखडत……….”
अशी किंवा अनेक स्वताःचा मोठेपणा सांगण्याच्या नादात ही मंडळी ईतरांना खिणवत असतात… असो….
पण खरच अस असत का हो….? म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी खरच काम अडु शकतात का हो….? [याला थोड्याफार प्रमाणात सरकारी अधिकारी अपवाद आहेच म्हणा].. पण मी पाहीलय की 99 टक्के अॉफीसमध्ये एक प्रणाली (System) कार्यरत असती.. आणि हीच प्रणाली प्रत्येक अधिकाऱ्यांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या कुवतीनुसार त्याच्याकडून काम करुन घेत असती…तरीपण काहीजण जर आपल्याच कामात खोटेपणाने समरसुन जातात आणि “वेळच नसतो हो…” हीच वाक्यरचना सतत बडबडत असतात..
घ्या सांभाळुन…. आपलीच माणस असतात…
असतात अशीही मंडळी सभोवताली…….
— विवेक जोशी
Leave a Reply