हर्षद – प्राची जोरी बाई गो
जोरी ही लग्नाची
कामे करूनी थकली बाई गो
दमली आयशी वराची
गजाननाला आवतन केलं
माय आयली डोंगराशी
हिरवा शालू नेसली वरमाय
चोळी घातली बुट्ट्याशी
अंबार्यावर वेनी शोबे
वेनी गो फुलांची
कानात कुर्या बुगर्याबाल्या
नाकात नथनी सोन्याची
भांगामंदी बिंदी खाली
टिकली मोठी कुंकवाची
टिक् ठूशी नी बानू ल्याली
नाकात नथनी मोत्याची
पायात पैंजन कमरेला पट्टा
जोरवी गो चांदीची
गोट पाटल्या तोरे हातभर
बांगरी गो वर्खाची
पांच खर्यांच्या अंगठ्या बोटी
चमचम गो हिर्यांची
बर्हारी गांवकरी सगेसोयरे
करा तयारी लग्नाची
नाच नाचूनी दमली बाई गो
दमली रानी रावांची
— सौ. सुधा मोकाशी
Leave a Reply