नवीन लेखन...

हाता पायाला मुंग्या येणे

दीर्घकाळ एकाच स्थितीत बसल्यानंतर किंवा झोपेतून उठताना मुंग्या येणे किंवा बधिरपणा जाणवू शकतो. हातापायाच्या एखाद्या शिरेवर बराच वेळ दाब आल्याने या संवेदना जाणवतात. हातपाय हलविणे किंवा हिंडू- फिरू लागले की त्रास जातो. झोपेतसुद्धा एकाच स्थितीत जास्त काळ राहण्याने असा शिरेवर दाब येणे संभवते. याकरिता निसर्गाने झोपेत कूस बदलली जावी, अशी एक यंत्रणा निर्माण केलेली आहे. समजा आपण डाव्या कुशीवर झोपलो आहोत. हळूहळू आपल्या डाव्या नाकपुडीतील अस्तर सुजू लागते. साधारण २ तासांनी नाकपुडी बंद होते. नाकपुडी बंद झाल्याची माहिती मेंदूकडे जाते व आपोआपच कूस बदलली जाते. दीर्घकाळ एकाच जागी बसणाऱ्या व्यक्ती आपले पाय आलटून पालटून असा दाब येणे टाळतात. शरीराच्या एकाच भागावर मधूनअधून किंवा सातत्याने मुंग्या येण्याची अथवा तो भाग बधिर असण्याची भावना येणे हे लक्षण तेथील संवेदना मेंदूत नेणाऱ्या चेतासंस्थेच्या भागातील दोषांचे आहे. शरीराच्या डाव्या अथवा उजव्या भागावर मुंग्या येणे हे लक्षण मेंदूत दोष निर्माण होत असण्याचे आहे. पक्षाघात (शरीराची उजवी अगर डावी बाजू शक्तीहीन होणे, लुळी पडणे) किंवा मेंदूला रक्तपुरवठा कमी पडणे, या आजाराची सुरवात अशी होते. डोक्यााला इजा झाल्यावर काही काळाने अशा मुंग्या येऊ लागणे हे मेंदूच्या वरच्या आभ्रयात रक्ताची गुठळी झाल्याचे (subdural nematoms) लक्षण आहे. मेंदूत गाठ होणे, मेंदूला सूज येणे, मेंदूत जिवाणू किंवा विषाणू यांच्यामुळे दाह होणे अशा अनेक मेंदूच्या आजाराची सुरवात झाल्याचे या मुंग्या येण्यापासून कळू शकते. एकाच हाताला मुंग्या येणे अथवा बधिरपणा जाणवणे हे मानेतील मणक्याकत दोष असल्याचे लक्षण असते. दोन मणक्यांवतील चकत्या झिजतात, त्या सरकतात, त्या सरकलेल्या भागाचा दाब मानेतून हातात येणाऱ्या शिरांवर येतो व मुंग्या येण्याचा त्रास सुरू होतो. असा त्रास बऱ्याच वेळा हाताला होतो तेव्हा पंज्याच्या करंगळी व अनामिका या बोटात होतो. जेव्हा मुंग्यांचा त्रास अंगठा व तर्जनी येथे होतो तेव्हा मनगटाजवळील “मीडियन’ (median) शीर दाबली जात असते. कार्पल टनेल सिंड्रोम (carpal tunnel syndrome) काही साध्या व्यायाम व औषधांनी बरे न वाटण्यास शस्त्रक्रिया करून हा आजार पूर्ण बरा करता येतो. नर्व्ह कंडक्शान स्टडीज (nerve conduction studies) या तपासानंतर हे निदान निश्चिरत करता येते. मधुमेह या विकारात पायाच्या (व हातांच्यासुद्धा) शिरा कमजोर होऊ लागतात. (peripheral neuropethy). लघवीला वारंवार जावे लागणे, तहान लागणे, वजन कमी होणे, थकवा होणे अशी लक्षणे असली, तर लगेच रक्त-लघवी तपासून मधुमेहाचे निदान केले जाते. अनेक रुग्णांना तळपायाची आग होते. मधुमेहाखेरीज कोणत्याही कारणाने तळपायाला जाणाऱ्या शिरांवर दाब येत असला किंवा रक्ताचा पुरवठा कमी पडला तर तळपायांची आग होते. कॅपसॅसिन नावाचे एक द्रव्य मिरचीपासून काढतात. कॅपसॅसिन असणारे मलम तळपायावर चोळल्याने तळपायाची आग होण्याचा त्रास शमतो. (capsacin). काही रुग्णांना उभे राहिले किंवा चालू लागले की पायांना मुंग्या येऊ लागतात. चालताना मधेच उभे राहण्याची वेळ आली तर पायात होणारा त्रास असह्य होऊ लागतो. आपल्या कमरेच्या मणक्याहतील चकत्या झिजून सरकल्या म्हणजे मज्जारज्जूतून पायात जाणाऱ्या चेताशिरांवर दाब येऊ लागतो, त्यामुळे हा त्रास होतो.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

48 Comments on हाता पायाला मुंग्या येणे

  1. झोपेतून उठल्यानंतर पायांना मुंग्या येतात पाय बधिर होतात मात्र चालल्यानंतर नॉर्मल होते व तद्नंतर मुंग्या येतात व क्राम येतात यावर काय उपाय करावा

  2. Sir mazaya Hatapayala mugya yetat haluhlu dokaya paryant yeu laglaya aahet sarkhi chkar yet chaltana blance jato plz yaver upay sangava

  3. तळपायांमध्ये सतत आग होते. ७ B12 इंजेक्शन घेतले. Multivitamin syrup चालू आहे. शुगर नाॅर्मल आहे. रात्री जास्त त्रास होतो.

  4. Sir, aaj oahilyandach achanak sarv sharirala asankhya suya aksath tochlyasarkha trass zala, mala diebetis Aahe, 1 goli roj gheto mi, age 54aahe maze. Please guide me aani kashamule zale ase te sangun upchar sangava hi vinanti.

  5. डाव्या हाताला खूप वेध साठी मुंग्या येतात आणि पुर्ण हात बधिर होतो,या वर उपाय काय करायला हवा ,खूप वेळ झोपून त्या अंगावर अस नाही झालेलं

    • डाव्या हाताला खूप मुग्य येतात आणि अक नाक पुडी बंद होते आणि झोप येत नाहीये कारण काय आहे त्याच

  6. sar maza mr.pai dava pay suzla ahe madhe admit kele teva normal zala pan atta parat suzla ahe dr. sngtat rakt purvtha hot nahi nus dapli ahe khup kharch kela pan pharak padad nahi sir kahi tri upchar sanga.

    • सर माझ्या डाव्या हाताच्या करंगळी आणि शेजारील बोटाला मुंग्या येतात उपाय सांगा

  7. माझ्या डाव्या पायाला गुडघ्याजवळ जळजळ होते व मांडीत दुखते त्रास झोपण्यापूर्वी जास्त होतो डॉ दावले होते पण काही फरक पडत नाही

  8. आईचे वय ६० आहे पण ४० या वषापासुन थांबुन थांबुन एका भागाची हात व माणेत आणी डोयात कळ व बधीरपणा मुया असा रास होतो काय उपचार करावेत औषध गरम पडतात उपचार करून कंटाळा आला आईला

  9. Maja donhi payana mungya alywar mala chalta yet nahi Ani ekach weli payawar sheer dablysarkh hot khup wel shir thanks plz yawar kahi upay saga mala ha tras 11th year pasun hot ata khup wadat ahe

  10. HELLO SIR, MAZYA HI LEFT HAND LA MUNGYA YETAT.TO HAT PURN BADHIR HOTO..MALA YAVAR KAHI UPAY SANGA…PLZ

  11. Sir, mazya ujavya hatala koparya pasun tarjani paryant khup Kala yetat kadhi saksli yetat tar kadhi ratri yetat, asahayyahya hotat Ya var kahi upay suchava

    • सर माझ्या डाव्या हाताला खांद्यापासून खूप दुखते accupressior 10 दिवस केले काही ऊपयोग नाही दावा हॅट वरही जात नाही रॅटRइ किंवा दिवस झोपल्यावर अश्या त्रास होतो सर काहीतरी उपाय सांगा मला पायातसुद्धा दुखते डाव्या अंगतज आणि त्यापासूनचे तिसरे बोट खूप वेदना देत्व

    • Hi mazya ujavya payat jra mungya yetat pn kamrepasun Khali purn pay khupch dukhtoy jrahi kami nahi hot halli tr tyamule pudhe payavhya joined madhe potachya side la pn dukhayla laglay khup tras hoto sahan hot nahi tri upay sanga pls

  12. Hello Sir, Mazya vadilana talpayala mungya yet astat. 2 varshapasun he chalu aahe. barech thikani dakhvale aahe pan kahi farak ni.
    Please advise me.

  13. डावा हात वडावा पाय तसेच डाव्या बाजुलाकपाळाच्या बधिर झाल्यासारखे होते अधुन मधुन

  14. सर माझ्या आईचे चार वर्षापुर्वी मनक्याचे आँपरेशन झाले आहे हाडाचा टि बी मुळे मनक्याची झिज झाली त्यामुळे मनके फिक्स केले आहेत पण आता त्यांना तळपायाची आग व पायापासून डोक्यापर्यंत सारखा मुंग्या येणे असा त्रास होत आहे पया ऊपाय सांगा

  15. Dear
    सर माझ्या आजीच्या गुडग्या पासून तळपाया परंत मुंग्या येतायत
    Axry and city scan केले मणक्यया मध्ये एक शीर chowk आहे असे कळले तर हेयज्यावर उपाय काय करता येतात?
    My content numbar8698851311

  16. सर मला फक्त सकाळी जाग आल्याआल्या दोन तीन सेकंद पायाला मुंग्या येतात उठवल्यानंतर लगेच ठीक होते प्लीज उपाय सांगा 9403685230

  17. सर माझ्या हाता व पायाला मुंंग्या ऐतात।।।।

  18. सर मला 1 महिन्यापासून दोन्ही पायात मुंग्या येत आहेत डॉक्टरांना पण दाखवल पण काहीच परिणाम नाही ,exercise पण करतोय काही उपाय सांगा सर

  19. सर माझा उजवा पाय मुंग्या येतात जड वाटतो व सूज ही येते please उपाय सांगा मधूमेह आणि bp आहे गोळ्या चालू आहे

  20. हाय सर माझ्या पायाची तळवे खुप दुखतात आणि जळन होते कृपया मला इलाज सांगा

  21. माझ्या हाताला, डोकयाला मुंगया येतात.उपाय सांगा. Mob.9820920215

  22. Mazya dawya hatala 15days mungya yetat. My age is 68
    Before 2months i was suffering from Stroke.Then ct scan report is normal.

  23. नमस्कार सर माझ्या डाव्या हात व पायात ताकत कमी होत चाले तर मला काही करुण उपाय सांगा माझ अजुन लग्न झाल नाय खुप टेंशन येतो पिलीज उपाय सूचवा
    माझा मोबाइल न: 8668580832 व्हाट्स आप न: 9730048510

  24. सर माझ्या डाव्या पायाला सूज व मुंग्या येतात चालताना त्रास होतो उपाय सुचवा

  25. माझ्या दोन्ही हाताच्या पंजाना व दोन्ही पायांच्या पंजाना 10’15 दिवसापासून मुंग्या येत आहे काय करावे लवकरात लवकर सांगा

    • Maze age 42 asun me lady aahe..office madhe desk work karte, last month pasun me phisiotherapy ghetey, pan left and right hatachya panjala mungya yet aahet, please upay suchva.

  26. Sir,
    Mazya davya payavar gudghyachya var mansa madhe , jara tanak bhag janvat ahe ani ata don mahinyapasun khup mungya yetat , krupaya karan sanga ..
    ani tyavar upay sanga

  27. सर,माझी डावी बाजू म्हणजे कानाच्या वरच्या व मागच्या बाजूस तसेच मानेला व खांद्यापासुन हाताच्या नखा पर्यंत खुपच त्रास होतोय.हात जड पडणे,मुंग्या येणे व छातीत डाव्या बाजूला टोचल्या सारखे होते.यावर काय ऊपाय आहे.ct scan व MRI पण केला मेंदूला काहीही नाही पण मानेची शीर दाबली जातआहे असे सांगीतले.

  28. Hello doctor माझा Mr nna high शुगर आहे. Ani atta tenna left hand and left leg LA mungya येतात sarkha so. Kutl test करून घेवू. घर ch उपचार सांगा pl.

  29. सर तुमचा हा लेख खूप सुंदर आहे रुग्णास नेमके कशामुळे काय त्रास होतो हैचा आंदाज येतो
    खूप खूप धन्यवाद सर

  30. साधारणपणे काय झाले असेल ह्याचा अंदाज आपल्या लेखातून मिळाला. आणि तोही खूप सहज शब्दात.
    खूप धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..