आपल्याला डायबेटीस, ब्लड प्रेशरचा त्रास असेल किंवा आपण स्थूल असाल, सतत तणावाखाली असाल तर फक्त ५ मिनिटात कोणतीही नळी आपल्या रक्तवाहिनीत न घालता किंवा स्ट्रेस टेस्ट न करता फक्त झोपून आपणाला हार्टअटॅक येण्याची काय रिस्क आहे हे सांगणे फक्त ५००-६०० रुपयांत शक्य झाले आहे. या मशिनला कोलिन व्हि.पी. (प्रोफायलर) म्हणतात. यामध्ये आपली कॉम्प्युटराइज्ड नाडी परिक्षा होते ।
आपल्या दोन दंडांना व पायाला ब्लड प्रेशर, कफ बांधून दोन मनगटांना इ.सी.जी. चे पट्टे बांधून व छातीवर फोनो कार्डिओग्रामचा सेंसर बांधून फक्त ५ मिनिटांत आपल्या रक्ताच्या गतीचा अभ्यास वेव फॉर्ममध्ये (आलेख) व चारीही ठिकाणातील ब्लड प्रेशर रेकॉर्डिंग करुन अपल्या धमन्यांना होणारा अॅथेरोस्क्लेरॉसीस हा रोग ८०-९० टक्के अचूकतेने ओळखता येतो. शितावरुन भाताची परिक्षा या तत्वानुसार जो रोग सर्व रक्तवाहिन्यांना होत आहे तोच रोग आपल्या हृदयाच्या करोनरीजना व मेंदूला रक्तपुरवठा करणार्या धमन्यांना होत आहे असा निष्कर्ष काढून हार्ट अटॅक व स्ट्रोकची रिस्क सांगितली जाते व धमन्या सुधारण्यास स्टॅटीन, एस इन्हीबिटर अशी औषधे देऊन राहाणीमान सुधारण्याचा सल्ला ही दिला जातो.
हार्ट अटॅक येण्याचा धोका फार लवकर असल्याने योग्य तो सल्ला घेऊन पुढे येणारा प्रचंड खर्च वाचवता येऊ शकतो म्हणूनच साधारण ४० नंतर शहराच्या धकाधकीत रहाणार्या प्रत्येक माणसाने हा तपास करणे जरुरी आहे.
या मशिनमध्ये पुढची पायरी म्हणजे व्यायाम केल्यानंतर वेव्ह फॉर्म किंवा ब्लड प्रेशरमध्ये होणारे बदल यांचा अभ्यासही करता येतो. दरवर्षी आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये होणार्या बदलांचा गुणात्मक अभ्यासही करता येतो.
— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे
Leave a Reply