नवीन लेखन...

हा घ्या पुरावा……..!

जगत्गुरू भारताला लाखो वर्षांची प्राचीन परंपरा आहे. येथील हिंदू संस्कृती जगाला सदैव मार्गदर्शन करीत आलेली आहे, या जगत्गुरू भारतात आदर्श लोकशाही सांगणारे रामायण घडले, तसेच आदर्श राजकारण सांगणारे जगविख्यात महाकाव्य महाभारत घडले. स्वधर्मीय बांधवांवर अत्याचार करणार्‍या दुराचारी कौरवांच्यानिपःताची कुळकथा म्हणजे महाभारत होय. महाभारत म्हणजे कोणा धर्माच्या विरोधात नसुन, स्वधर्मातील कुप्रवृत्तींना नष्ट करण्यासाठीचे धर्मयुद्ध होय. याबाबत कोणी गळा काढुन कंठरव करायची गरज नाही. पुराणकालीन आख्यायिकांना काल्पनिक ठरविण्याचे षडयंत्र काही महाभाग करीतआहेत. प्राचीन इतिहासाचे चिकित्सक आणि सखोल अध्ययन करण्याची आवश्यकता आहे.

रामायणाचा काळ हा पाच ते दहा वर्षे प्राचीन समजला जातो, या काळात प्रभू श्रीरामचंद्राने रामेश्वरम् ते श्रीलंका पर्यंत सेतू बांधुन रावणावर स्वारी केली. समुद्रा वर दगडांचा सेतु बांधणे शक्यच नाही, असे आधारहीन वक्तव्य केलेजाते. या तथा कथीत विज्ञान वाद्यांनी पुनश्चनव्याने, खगोल शास्त्र आणि भूगर्भीय घटकांचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. दगडाची घनता अधिक असल्याने तो पाण्यात बुडतो, असे विज्ञानात शिकविले जाते. पण पाण्यापेक्षा कमी घनता असणारे दगड पृथ्वीतलावर आहेत, हे पुस्तकात छापावयास विज्ञानवादीका विसरतात? दगड पाण्यात बुडतो हे शिकविण्यासोबत, काही दगड पाण्यात बुडत नाही हे सुद्धा शिकविणे आवश्यक आहे.

कमी घनतेचे काही दगड पाण्यात बुडत नाही, हे रामायण कालीन नल व निल या वानरांना (वनात राहणारा नर) माहीत होते. त्या ज्ञानाच्या आधारे प्रभू श्रीरामचंद्रांनी सेतू बांधण्याचे दिव्य करून दाखविले. नैसर्गिक चमत्कारांनी युक्त घनतेचे दगड, काही जागरूक मंडळींनी व देवालयांच्या विश्वस्तांनी आजही जपुन ठेवलेले आहेत. यांपैकी एक देवालय म्हणजे मौजावासाळा मेंढा ता. नागभीड, जि.चंद्रपुर (महाराष्ट्र) येथील हनुमान मंदीर होय. हा दगड श्रीतुकाराम मनु जेंगठे यांनी ३० वर्षापुर्वी रामेश्वरम् येथुन आणला व मंदीरात ठेवला. हया दगडाचा आकार एक चौ.फुट एवढा आहे, पाण्यात घातला असता तो तरंगतो. ज्यांना तपासणी व अध्ययन करावयाचे आहे किंवा आपल्या शंकांचे निरसन करावयाचे आहे, त्यांनी मंदीराच्या विश्वस्तांना प्रत्यक्ष भेटावे. हा दगड तरंगतांना पाहील्यावर, राम सेतू पाण्यावर तरंगण्या संदर्भात कोणीही शंका घेण्याचा प्रश्नच उरत नाही. कमी घनतेच्या या दगडाची काही छायाचित्रेही मी सोबत देतआहे.रामायणाच्या संदर्भात पुरावा म्हणुन माझ्या नाणे संग्रहातील इ.स.पुर्व ५१७ ते ५४० या कालखंडातील नाण्याचा छायाचित्र सोबत देत आहे. हया नाण्यावर एका बाजुला श्रीराम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न तसेच हनुमान अंकीत आहे, तर दुसर्‍या बाजुला “रामलछमनजानकजयवलहनमनक” म्हणजे राम लक्ष्मण जान की जय बोलो हनुमान की असे छापुन आहे. सोबत दोन त्रिशुल धारीमुर्ती व वर्ष आहे.

प्राचीन ज्ञानाला आख्यायिका संबोधुन हिनविण्यापेक्षा, त्याचे महत्व समजुन अध्ययन केले पाहीजे ! अन्यथा आमच्या सारखे अज्ञानी आम्हीच ठरू! पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्याच्या नादापायी, रामसेतू हा आमचा प्राचीन वा नष्ट करण्याचे महा पाप आम्ही करीतआहोत. प्राचीन ज्ञानाचा भावी पिढीसाठी उपयोग करून घेता येईल का याचाही विचार करणेआवश्यक आहे. वानरांना जे ज्ञान होते, ते आम्हा स्वतःला सुज्ञ आणि विज्ञान वादी म्हणविणार्‍यांना कळू नये? यापेक्षा कोणती शोकांतिका असु शकेल?

— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..