घोषाल कुटुंब फाळणीनंतर पूर्व बंगालमधून पश्चिम बंगालमध्ये स्थलांतरित झालं. हे एक हुशार कुटुंब. श्रेयाचे वडील बिश्वजीत घोषाल मुखोपाध्याय हे भारतीय आण्विक ऊर्जा महामंडळात प्रकल्प अभियंता म्हणून काम करतात आणि आईने साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. बंगालमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दोघे उत्साहाने सहभागी व्हायचे. या अशा कार्यक्रमांमध्ये श्रेयाची आई गाणं म्हणायच्या. चार वर्षांची असल्यापासून श्रेयाने आईला पेटीवर साथ देण्यास सुरुवात केली. तिचा जन्म १२ मार्च १९८४ रोजी झाला. या गाण्यांचा सराव करताना बाल श्रेया आईचं गाणं ऐकून तेच गाणं आपल्या बोबड्या आवाजात म्हणायचा प्रयत्न करायची. इथेच श्रेयाच्या संगीत शिक्षणाला सुरुवात झाली. तिची आई हाच तिचा पहिला गुरु. चार वर्षांची असताना श्रेयाने आईला हार्मोनियमवर साथ करायला सुरुवात केली. अशा रितीने श्रेयाचं संगीत शिक्षण अगदी लहान वयातच सुरु झालं. संगीत तर तिच्या रक्तातच होतं पण योग्य वेळी योग्य गुरु तिला लाभले आणि तिच्या अंगभूत कलेला चांगली चालना मिळाली. एकीकडे एक बाल गायिका घडत असताना तिने तिच्या शालेय शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष केलं नाही. अगदी लहान वयापासून व्यासपीठावर गाणी म्हणत म्हणत गाण्यांच्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेत घेत श्रेयाने सारेगम या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेमुळे तिचं आयुष्यच बदलून गेलं. संजय लीला भन्साळी देवदास सिनेमा बनवत होते. इस्माईल दरबार यांनी गाण्यांच्या गायिकाही नक्की केल्या होत्या. ऐश्वर्याच्या गाण्यांसाठी मा.लताबाईंचं नाव नक्की झालं होतं. बैरी पिया हे गाणं, त्या गाण्यातले चढ उतार फक्त दिदीच म्हणू शकतात आणि ऐश्वर्याची गाणी ही देखील टिपीकल दिदींचीच गाणी असल्याने लताबाईंची निवड नक्की होती. १९९९ साली श्रेया घोषाल सारेगम या स्पर्धेत एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. असंच एकदा सारेगम बघत असताना श्रेयाचा आवाज संजय भन्साळीच्या आईने ऐकला आणि तिने लगेच आपल्या मुलाला बोलावलं आणि तिचा आवाज ऐकायला सांगितला. आणि इथेच त्याला पारोचा आवाज मिळाला. तिच्या आवाजातला निरागसपणा त्याला फार आवडला आणि पारोसाठी असाच निरागस आवाज हवा म्हणत त्याने पारोसाठी श्रेयाला घेण्याचं नक्की केलं. सारेगमची महाअंतिम फेरी श्रेया जिंकली. परिक्षक म्हणून भारतीय संगीतातली दिग्गज मंडळी होती. श्रेया घोषालने सगळ्यांची मनं जिंकली. त्या परिक्षकांमध्ये एक होते संगीतकार मा.कल्याणजी. मुंबईतले तिचे पहिले गुरु कल्याणजीच. तिने हिंदूस्थानी संगीताचे प्रशिक्षण गुजराथ मधील कोट्यातील मा.महेशचंद्र शर्मा यांच्याकडून घेतले. मुंबईत कल्याणजी यांच्याकडे १८ महिने अभिजात संगीताचे प्रशिक्षण घेतले व नंतर मुक्ता भिडे यांच्याकडे ते सुरू ठेवले. श्रेयाने सा रे ग म ही दूरदर्शनवरील गाण्याची स्पर्धा प्रौढ गटातून जिंकल्यानंतर तिची कारकिर्द सुरू झाली. तिने देवदास या हिंदी चित्रपटातून पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. या चित्रपटातील गायनासाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वात्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीचा फिल्मफेअर पुरस्कार व आर. डी बर्मन पुरस्कार मिळाले. त्यांनी तिच्या आवाजात देवदास हिंदी चित्रपटांसाठीचं पहिलं ‘बैरी पिया’ हे गाणं ध्वनिमुद्रित केलं. देवदासच्या गाण्यांसाठी कुठलाही सराव तिने केला नाही कारण स्टुडिओतही ती अभ्यासच करायची. तिने सुमारे २०० चित्रपटांमध्ये गाणी म्हटली आहेत ज्यासाठी तिला एकूण ४ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ५ फिल्मफेअर पुरस्कार व सात दक्षिणेमधील फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. तिने मराठी, कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू, बंगाली, आसामी इत्यादी प्रादेशिक भाषांमधूनही पार्श्वगायन केले आहे.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
श्रेयाची मराठी गाणी
https://www.youtube.com/shared?ci=vlRQDsSbk50
https://www.youtube.com/shared?ci=awbXe_lwtI8
https://www.youtube.com/shared?ci=AVYU6MSAlQI
Leave a Reply