जलाल आगा हे सुप्रसिद्ध विनोदी नट आगा यांचे चिरंजीव. उच्च शिक्षणानंतर पुण्यातील F.T.I मध्ये शिक्षण घेतले.
जलाल आगा यांनी मुगल-ए-आझम या चित्रपटातल्या बालपणातल्या जहांगीराची भूमिकेद्वारे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
जलाल आगा यांनी १९६७ साली के.ए.अब्बास यांच्या बंबई रात की बाहो में या चित्रपटा द्वारे हिरो म्हणून पदार्पण केले.
त्यांचे शोले मधील गाणे मेहबुबा मेहबुबा अजुन ही लक्षात आहे. त्यांनी ज्युली, घर घर की कहानी, थोडीशी बे वफाई, दिल आखीर दिल है,गांधी अशा चित्रपटातुन १९९० च्या दशकापर्यंत विनोदी व चरित्र अभिनेता म्हणून हिंदी, तसेच काही इंग्लिश चित्रपटांतून अभिनय केला.
सई परांजपे यांनी सांगीतलेली मा.जलाल आगा यांची F.T.I मधील आठवण.
उच्च शिक्षण झालेला, हुशार, मिश्किल आणि महाद्वाड. एकसारखे काही ना काहीतरी करून वर्गाला आणि मलाही तो हसवायचा. एकदा मी मुलांना एक उतारा लिहून घ्यायला सांगत होते. मधला मजकूर गाळायचा होता. तेव्हा मी म्हटलं, ‘या वाक्यानंतर काही टिंबे टाका. म्हणजे काही भाग गाळला आहे, हे लक्षात येईल.’ हात वर करून जलाल उभा राहिला. गंभीर चेहरा करून त्याने विचारले, ‘दीदी, किती टिंबं टाकायची?’ एकदा मी त्याच्यावर फारच रागावले. त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याचे ठरवून त्याच्याकडे अजिबात न पाहता मी वर्ग घेऊ लागले. दोन दिवसांच्या या उताऱ्यानंतर तो मला भेटला आणि म्हणाला, ‘मला रागवा, उभे करा; पण प्लीज, माझ्याकडे दुर्लक्ष करू नका. नटाला ती फार कठोर शिक्षा आहे. मी यापुढे शिस्त पाळीन.’ त्यानंतर दोन-चार दिवस तो बरा वागला.
जलाल आगा यांचे ५ मार्च १९९५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply