उत्पल दत्त हे उच्च दर्जाचे अभिनेता, दिग्दर्शक आणि नाटककार होते. त्यांचा जन्म २९ मार्च १९२९ रोजी झाला. त्यांनी केवळ बंगाली चित्रपट वर आपली छाप टाकली नाही तर हिंदी चित्रपटावर पण. सीरियस पासून कॉमेडी पर्यंत त्यांनी प्रत्येक भूमिका अतिशय गंभीरपणे केली. मा.उत्पल दत्त यांचे शेक्सपियर साहित्यावर खूप प्रेम होते. १९४० मध्ये एका थिएटर कंपनीतून आपल्या अभिनयास सुरवात केली. थिएटर कंपनीतर्फे अनेक नाटके भारत आणि पाकिस्तानात आयोजित केली. १९५० पासून त्यांची बंगाली चित्रपट कारकीर्द सुरू झाली. अनेक बंगाली नाटके व चित्रपट दिग्दर्शित केले. या वेळी तो लिहिले नाही,. नाटकांच्या लिहिले बंगाली राजकारण अनेकदा वाद वाढ दिली. १९५० मध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माते मधू बोस यांनी चित्रपट माइकल मधुसुधन या चित्रपटात मुख्य भूमिका दिली. मा.उत्पल दत्त यांनी सत्यजित रे यांच्या चित्रपटांत अभिनय केला आहे. पण उत्पल दत्त हिंदी चित्रपट एक महान विनोदी म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक लघुपटात पण कामे केली आहेत. गुड्डी, गोल-माल, नरम-गरम, रंग बिरंगी व शौकीन या चित्रपटात उत्पल दत्त यांनी कमाल केली आहे. त्यांची सर्वात गाजलेली विनोदी भुमिका गोलमाल मधील होती त्यांना गोलमाल मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट हास्य अभिनेता फिल्मफेयर पुरस्कार मिळाला होता. १९६० साली चित्रपट अभिनेत्री शोभा सेन यांच्याशी उत्पल दत्त यांनी विवाह केला. उत्पलदत्त हे मार्क्सवादी नेता होते. १९ ऑगस्ट १९९३ रोजी उत्पल दत्त यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply