राज कपूर यांचा जन्म १४ डिसेंबर १९२४ रोजी झाला. पेशावरहून मुंबईत वडिल पृथ्वीराज कपूरसोबत आलेल्या राजकपूर यांना पृथ्वीराजनी सल्ला दिला होता, की त्याने करिअरची सुरुवात खालच्या स्तरावरुन करावी, तरच तो वरिष्ट पातळी गाठू शकेल. वडिलांचा हा सल्ला मानत १७ वर्षीय राज कपूर यांनी ‘रंजीत मुव्हीकॉम’ आणि ‘बॉम्बे टॉकीज’ फिल्म प्रॉडक्शनमध्ये ‘स्पॉट बॉय’ म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्याकाळातील नामांकित दिग्दर्शक केदार शर्मा यांच्याकडे ते ‘क्लॅप बॉय’ म्हणून कामाला सुरुवात लागले. एका शॉटच्यावेळी राज कपूरने क्लॅप इतक्या जोरात मारली की नायक अभिनेत्याच्या दाढीचे केस त्यात अडकले आणि त्याची नकली दाढीच निघाली. यामुळे चिडलेल्या केदार शर्मा यांनी राज कपूरच्या श्रीमुखात लगावली. त्याच दिग्दर्शक केदार शर्मा यांनी पुढे जाऊन निलकमल या सिनेमाचा नायक म्हणून राज कपूरला घेतले.
राज कपूरचे वडिल पृथ्वीरीज हे त्याकाळातील नामवंत रंगकर्मी आणि अभिनेता होते. राज कपूर यांना अभिनयाचा वारसा त्यांच्याकडूनच मिळाला. राज कपूर त्यांच्यासोबत नाटकात काम करीत असत. त्यांच्या अभिनयाची सुरुवात तेथूनच झाली होती. राज कपूर यांचे पूर्ण नाव ‘रणबीर राज कपूर’ असे होते. ‘रणबीर’ हे आता त्यांचा नातवाचे म्हणजेच ऋषि – नितू कपूर यांच्या मुलाचे नाव आहे.
राज कपूर लहानपणी पांढरी साडी नेसलेल्या एका स्त्रीवर मोहित झाले होते. त्यानंतर त्यांचे पांढऱ्यासाडीचे आकर्षण कधीच कमी झाले नाही. त्यांनी आपल्या अनेक अभिनेत्रींना (नर्गिस, पद्मिनी, वैजयंतीमाला, झीनत अमान, पद्मिनी कोल्हापुरे, मंदाकिनी) पांढऱ्या साड्या नेसायला भाग पाडले. इतकेच नाही तर त्याच्या घरी पत्नी कृष्णा नेहमी पांढरी साडी नेसायच्या. राज कपूर यांच्या गाजलेल्या सिनेमामध्ये मेरा नाम जोकर’, ‘श्री ४२०’,’आवारा’, ‘बेवफा’, ‘आशियाना’, ‘अंर’, ‘अनहोनी’, ‘पापी’, ‘आह’, ‘धुन’, ‘बूट पॉलिश’ इत्यादीचा समावेश होतो. भारत सरकारने त्यांना १९७१ साली हिंदी सिनेमातील त्यांच्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. १९८७ साली त्यांना हिंदी सिनेमातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. याशिवाय त्यांना १९६० मध्ये ‘अनाडी’ आणि १९६२ मध्ये ‘जिस देश में गंगा बहती है’ या सिनेमांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा ‘फिल्म फेय़र’ पुरस्कार मिळाला होता. १९६५ मध्ये ‘संगम,’ १९७० मध्ये ‘मेरा नाम जोकर’ आणि १९८३ मध्ये ‘प्रेम रोग’ या सिनेमांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा फिल्म ‘फेय़र पुरस्कार’ मिळाला होता. भारतीय सिनेमातील राज कपूर यांचे योगदान केवळ त्यांच्यापुरते मर्यादित नाही. त्यांच्या चार पिढ्यांनी हा वारसा कायम राखला आहे. कपूर परिवारात दादासाहेब फाळके पुरस्कार दोनदा आला. राज कपूर यांच्यासह हा पुरस्कार पृथ्वीरीज कपूर यांना १९७२ मध्ये मिळाला होता. त्यांनी ‘बरसात’, ‘आवारा’, ‘श्री ४२०’, ‘संगम’, ‘मेरा नाम जोकर’, ‘बॉबी’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘प्रेमरोग’, ‘राम तेरी गंगा मैली’ यांचे दिग्दर्शन केले होते. त्यांना पद्मभूषण पुरस्कार, चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार , फिल्म फेअर या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. मा. राज कपूर यांचे २ जून १९८८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply