हिंदुमहासभा आणि सावरकरलेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्रीप्रभू श्रीरामचंद्रांचे चरित्र अगदी सरळ आहे, परंतु भगवान श्रीकृष्णांचे चरित्र उलगडत जाते. एक गाठ सोडवीण्याचा प्रयत्न केली की दुसरी गाठ बसते. तसेच अगदी तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरित्राचे आहे. सावरकरांचे विचार कळणे फार कठीण आणि जरी ते कळले तर ते पचवणे त्याहूनही अधिक कठीण. त्यांचे चरित्र आणि चारित्र्य अलौकिक आहे. सावरकरांनी ह्या राष्ट्राला जो संदेश दिला तो अगदी साधा, सोपा व तर्कशुद्ध होता. तो जर कुणाला कळला नाही तर तो दोष सावरकरांचा नव्हे, तो दोष त्या अल्पबुद्धी माणसाचा आहे. सावरकरांवर उगाच आरोप करण्यात येतो की ते काळाच्या पुढे होते. उलटपक्षी सावरकर हे काळाशी सुसंगत होते. म्हणून तर त्यांनी हिंदुची अप्रतिम व्याख्या सांगितली,”आसिंधु सिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका,पितृभू पुण्यभूश्वैव स वै हिंदुरिती स्मृतः”यावर स्वामी श्रद्धानंद म्हणाले “प्राचिन ऋषींना जशी ऋचा स्फुरत त्याचप्रमाणे लेखकाला हिंदुची व्याख्या स्फुरली आहे”. बर्याचशा पुढार्यांनी सांगितले होते की जे वेद मानतात ते हिंदु आहेत.त्यावर सावरकर म्हणतात त्यांनी सांगितलेली व्याख्या चुकीची नाही अगदी बरोबर आहे. परंतु जे बौद्ध, जैन, शिख, व चार्वाक पंथ हे वेद मानीत नाही, म्हणून काय त्यांना हिंदु मानायचे नाही का? म्हणून सावरकरांनी हिंदुची ही व्याख्या सांगितली. यावरुन हे स्पष्ट होते की सावरकर हे काळाच्या पुढे नव्हते तर ते काळाच्या बरोबरीने जात होते. परंतु त्यांचे विचार हे प्रत्येक काळाला अनुसरुन होते व प्रत्येक काळाला अनुकूल ठरते म्हणून आपल्याला वाटते की सावरकर काळाच्या पुढचा विचार करायचे. जसे डॉक्टर रुग्णाला पाहून औषध देतात. दोन वेगळ्या प्रवृत्तींचे रुग्ण असतील व त्यांना एकच आजार झाला असेल तरीही त्यांच उपचार वेगवेगळ्या पद्धतीने होतो. तसेच सावरकर परिस्थीतीची जाणीव झाल्यावरच एखादा सिद्धांत मांडतात. सावरकर हे निजलेल्या हिंदुंचे डॉक्टरच होते. त्यांनी हिंदुजनांना चेतना दिली, चैतन्य दिले. परंतू गांधीवादाच्या चिखलात माखलेल्या भारतीय जनतेला सावरकर कळणे फार कठीण गेले व जात आहे.२३ जानेवारी १९२४ साली बाबाराव व तात्याराव सावरकरांच्या प्रेरणेने रत्नागिरी हिंदुमहासभेची स्थापना झाली. रत्नागिरीच्या १३ वर्षांच्या वास्तव्यात सावरकरांनी हिंदुमहासभेच्या व अन्य संस्थेच्या नावाने सहभोजन, जातीभेद, अस्पृश्यता, भाषाशुद्धी, स्वदेशी, साक्षरता प्रसार अशी अनेक चळवळी यशस्वीरित्या केल्या. शिवू चव्हाण नावाचा भंगी जातीतील एक मुलगा म्हणतो “तात्या मला पहाटे ५ ते ७ वाजेपर्यंत शिकवीत असत”. अखिल हिंदु उपहारगृहाची स्थापना तात्यांनी १९३३ साली रत्नागिरीत केली. या उपहारगृहात पूर्वास्पृश्य चहा करीत असत व देत असत. तेथे चहा प्यायले म्हणून थोर चरित्रकार धनंजय कीर ह्यांच्यावर भंडारी समाजाने बहिष्कार घातला होता. १९२९ साली, पतितपावन मंदिराच्या समारंभात हिंदुंच्या वतीने पांडू महारांनी शंकराचार्यांना हार घातला. तो शंकराचार्यांनी स्वीकारला व महारांना प्रसाद म्हणून श्रीफल दिले. केवढे मोठे कार्य आहे हे. त्याची माहिती बर्याच जणांना नाही. कारण सावरकरांनी त्यांच्या कार्याची जाहिरात कधीच केली नाही. सावरकर हे चंदनासारखे आहेत, त्यांना जाहिरातीची गरज नाही. जाहिरातीची गरज गांधी-नेहरुंना होती, आजही तीच अवस्था आहे म्हणा. सावरकरांवरील निर्बंधाची कालमर्यादा १९२९ साली संपणार होती, परंतू मुंबई सरकार प्रत्येक वेळी काही ना काही कारण सांगून ही मर्यादा दरवर्षी वाढवू लागले. त्यांच्या सुटकेचा विषय विधीमंडळात गेला. लक्षावधी लोकांनी स्वाक्षर्यांची मोहीम राबवली. का ी तरुण आपल्या प्रिय महात्मा गांधी यांची स्वाक्षरी घेण्याकरिता गेले. तेव्हा अहिंसेच्या माहनायकाने त्या सावरकरभक्तांना पहिला प्रश्न विचारला “कोण सावरकर?”. ज्या सावरकरांची लंडन व रत्नागिरीत भेट झाली असूनही गांधीं म्हणाले, कोण सावरकर?. यावरुन गांधींचा द्वेश दिसून येतो. “भोंदू पंडीत” नेहरूंनी तर स्वाक्षरीचा कागदच भीरकावून लावला. कॉंग्रेसने नेहमीच सावरकरांच द्वेश केला, त्यांना आपला शत्रु मानले. पण सावरकर म्हणायचे राजकारणातील प्रतिस्पर्धी हा कधीच शत्रु नसतो. इथे एक घटना सांगावीशी वाटते, “एकदा सावरकर सोलापूरला येणार होते, तेव्हा रामकृष्ण जाजल हे कॉंग्रेसचे प्रमुख होते. त्यांनी सावरकरांच्या दौर्याचा विरोध केला, इतकेच नव्हे तर त्यांनी वृत्तपत्रात बातमी छापली की जर सावरकर आले तर त्यांची आम्ही गाढवावरून धींड काढू. तेव्हा आचार्य अत्रे म्हणाले, बरोबर आहे सावरकार जेव्हा सोलापूरात येतील तेव्हा रामकृष्ण जाजल यांच्या खांद्दावर बसवून सावरकरांना आणू. कारण त्यांच्यासारखा गाढव दुसरा मिळणे नाही”. एखाद्दाचा द्वेश करायचा तो किती? जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, असो.पण १९३७ साली मंत्रिमंडळातील अर्थमंत्री जमनादास मेहता यांच्या विशेष आग्रहामुळे सावरकर पुर्णपणे मुक्त झाले व तेव्हापासून तात्याराव राजकारणात प्रत्यक्ष भाग घेऊ लागले.१९०६ साली व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो ह्याच्या आशिर्वादाने मुस्लिम लीगची स्थापना झाली. मुस्लिम लीग ही पुर्वीपासून ब्रिटीशांशी एकनिष्ठ होती. लीगच्या स्थापनेमागे महत्वाचे कारण हिंदु-मुस्लिम ह्यांत दरी वाढवीणे. म्ह्णुन इंग्रजांची मुस्लिमांचे लाड पुरवणे व त्यांना अधिक प्रतिनीधीत्व देऊन त्यांचे राजकिय महत्व वाढवीणे व मुस्लिम बहुसंख्य प्रांत निर्माण करणे, अशी धोरणे हाती घेतली. त्या काळात आबालवृद्धांना मतदान करण्याची अनुमती नव्हती.प्राप्तीकर भरणारा, पदवीधर किंवा घर-जमीन असणाराच मतदान करु शकत असे. वरिष्ठ जातीतील लोकांना कनिष्ठ जातीतील लोकांची जमीन विकत घेता येणार नाही असा नियम १९०१ साली इंग्रजांनी पंजाब प्रांतात लागू केला. व्यापार, उद्दोग करणार्या हिंदूंना वरिष्ठ ठरवीण्यात आले व जाट, शेतकरी आणि सर्व मुस्लिम समाज हा कनिष्ठ ठरवीण्यात आला. यामुळे मुस्लिमांना जमीनी विकत घेऊन मतदार होणे सोपे झाले. म्हणून १९०७ साली पंजाब हिंदुसभेची स्थापना झाली व १९१५ साली अखिल भारतीय हिंदुमहासभेच्या स्थापनेत स्वामी श्रद्धानंद, मालवीय अशा बड्या नेत्यांचा सहभाग होता. आता हिंदुमहासभेला पर्यायाने हिंदुस्थानाला सावरकरांच्या रुपात एक थोर व महान राजकीय नेता लाभला होता. १९३७ च्या हिंदुमहासभेच्या कर्णावतीच्या अध्यक्षीय भाषणात सावरकर हिंदुमहासभा म्हणजे नेमके काय,याचे स्पष्टीकरण देतात, “हिंदु महासभा ही काही प्रामुख्याने हिंदु धर्मसभा नाही, तर ती प्राधान्येकरून ’हिंदु राष्ट्रसभा’ आहे, सामाजिक, राजकिय नि सांस्कृतिक अशा सर्वच अंगांनी हिंदुराष्ट्राच्या भवितव्याला आकार देणारी ती एक ’अखिल हिंदु संघटना’च आहे”. परंतू त्यांच्या याच भाषणात एके ठीकाणी “हिंदुस्थान हे एकता पावलेले नि विसंवादरहित राष्ट्र मानता येत नाही, तर उलट हिंदुस्थानात हिंदु आणि मुसलमान अशी दोन राष्ट्रे विद्दमान आहेत”. असे वाक्य आहे. यावरुन विनाकारण सावरकरांच्या विरोधकांनी सावरकरांनी द्वीराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला,असी गरळ ओकायला सुरुवात केली. मुळात मुस्लिम हे राष्ट्र मानीत नाही. ते एकाच प्रार्थनास्थळाला मानतात. त्यामुळे हिंदु हे राष्ट्र आहे ही संकल्पनाच मुस्लिमांना मान्य नाही,याअर्थाने सावरकरांनी वरील भाष्य केले होते. परंतू अल्पबुद्धी लोकांना ते कळणे कठीण होते.त्यांच्या बुद्धीला ” हिंदुंचा तिरस्कार व सावरकरांचा अपमान” हेच पटत होतं. आजही असे लोक अस्तित्वात आहेत, भगवंत त्यांच्या बुद्धीला पुरुषत्व (स्थिरता/चालना) देवो. लंडनमध्ये एका चौकात सावरकरांचा अर्धकृती पुतळा आहे. तो तिथे बसवू नये म्हणून conservative पक्षाने वाद घातला. परंतू laber सरकारने सांगीतले, “इंग्लंडच्या शत्रुंमध्ये जे सर्वश्रेष्ठ आहेत, सावरकर हे त्यातील एक आहेत. इंग्लंड भाग्यवान राष्ट्र आहे त्याला सावरकरांसारखा चारित्र्यसंपन्न, प्रखर राष्ट्रभक्त व कमालीचा बुद्धिमान शत्रु मिळाला”. छत्रपति शिवरायानंतर शत्रुने ज्याची स्तुती केली ते तात्याराव सावरकर. सावरकरांनी भरकटलेल्या तरुणांना “लेखण्या मोडा आणि बंदुका घ्या” हा दिव्य संदेश दिला. १९३८ साली हिंदुमहासभेच्या नागपूर अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून पुनः सावरकरांची निवड करण्यात आली. निजामाच्या राज्यात बहुसंख्य हिंदु प्रजेवर अत्याचार होत होता व त्यांचे धर्मस्वातंत्र्य, नागरिकस्वातंत्र्य निजामाने बळकावून घेतले, त्या विरुद्ध या अधिवेशनात आंदोलन करण्याचे ठरले. हिंदु महासभा ह्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे गांधीनी, हे आंदोलन जातीय झाले आहे असे सांगून, गांधींनी स्टेट कॉंग्रेस आणि आर्यसमाजाला आंदोलन स्थगीत करायला सांगितले. परंतु आर्यसमाजाचे १७००० व हिंदुसमहासभेचे ४००० हिंदुभूमीपुत्र व सेनापती बापट यांनी लढ्यात भाग घेतला. अखेर सावरकरांच्या तेजस्वी नेतृत्वापुढे निजाम नमला आणि नागरिक स्वातंत्र्याला मान्यता व सुधारणांची घोषणा केली. सावरकरांच्या नेतृत्वाखाली भागानगरचा निःशस्त्र लढा यशस्वी झाला. १९३९ साली तात्यासाहेब हिंदुमहासभेच्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष होते, त्यांनी बंगालच्या हिंदुंना सावध व संघटीत राहण्याचा गुरूमंत्र दिला. १०४० साली तमीळनाडू, केरळमध्ये अनेक ठीकाणी जिल्हा व न गर हिंदुसभेची स्थापना, सभासद नोंदणी अशी अनेक कामे केली. कुठलेही काम त्यांना लहान वाटले नाही. दुसर्या महायुद्धाच्यावेळी २३ मार्च १९४२ या दिवशी ब्रिटनचे मंत्री स्टीफर्ड क्रिप्स भारतात आले. एकीकडे युद्धसमाप्तीनंतर देशाला स्वराज्य व प्रांतांना स्वतंत्र घटना बनवीण्याची योजना तर दुसरीकडे संस्थानांना संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याची सवलत आणि संघराज्य होईपर्यंत संरक्षण मंत्रालयावर ब्रिटनचे नियंत्रण, अशी विचीत्र आणि विक्षीप्त योजना घेऊन क्रिप्स आले होते, त्याला नेहरूंसकट अनेक नेते भाळले. गोर्यांवर भाळण्याची प्रथा तेव्हापासून आहे. परंतु सावरकरांनी क्रिप्सला चांगलेच ओळखले, सांवरकरांच्या सुचनेनुसार हिंदुमहासभेने ती योजना फेटाळून लावली. चर्चेच्या वेळी क्रिप्स तात्यारांना कॅनडा, द. अफ़्रिकेची उदाहरणे देऊ लागले. तेव्हा मातृभूमीचे लाडके नि निष्ठावान सुपूत्र तात्यासाहेब म्हणाले, हिंदुस्थान हा एक अखंड देश असल्याचे तुमच्याच शासनाने मान्य केले आहे. इंडियन आर्मी, इंडियन रेल्वे असे तुम्हीच म्हणता, स्वयंनिर्णयाचे तत्व देशाला लागू असते, प्रांतांना नाही. यावर क्रिप्स निरुत्तर झाले. सावरकरांच्या आदेशावरून हिंदुमहासभेने १० मे १९४२ हा दिवस स्वातंत्र्य दिन व पाकिस्थान विरोधी म्हणून देशभर पाळला. लुई फिशर हे अमेरिकन पत्रकार तात्यासाहेबांना म्हणाले “तुम्ही पाकिस्थान देऊन का नाही टाकत”, तेव्हा सावरकर गरजले “तुम्ही निग्रोस्थान का नाही देऊन टाकत”, यावर बिच्चारे फीशर यांना काहीच सुचेना. इंग्रजांनी निग्रोंचा पुष्कळ छळ केला. डेस्मंड टुटू हा दक्षिण अफ़्रिकेतला पहिला आर्चबीशप म्हणतो, गोरे लोक आमच्या देशात आले तेव्हा त्यांच्या हातात बायबल होते व आमच्याकडे जमीन होती. आम्ही डोळे उघडून पाहिले तेव्हा त्यांचे बायबल आमच्या हाती आले व आमची जमीन त्यां च्याकडे गेली. हेच सत्य आहे, लेखिका शीतल करंदेकर म्हणतात, उन्हापासून रक्षण व्हावं म्हणून अरबस्थानात काळा बुरखा घालतात.मुस्लिमांनी आक्रमण केले, आमच्या मुली बाळींना पळवून नेले म्हणून आमच्याकडे गोशा आणि मोठा पदर घेण्याची पद्धत आली. असे असताना हे लोक आम्हाला मागासलेले म्हणणार. ज्या काळी ह्यांना कपडे घालण्याचीही अक्कल नव्हती (ती तर आताही नाही) त्या काळी आमच्याकडे विज्ञान, अध्यात्म अशा अनेक शास्त्रांची प्रगती झाली होती. आता हे आम्हाला शिकवतात, ह्यांची लायकी ती काय?१९४६ च्या निवडणूकीत सावरकरांनी, कॉंग्रेसला मत म्हणजे पाकिस्थानला मत”अशी घेषणा दिली. दुर्दैवाने याच वेळी सावरकर आजारी पडले. त्यामुळे त्यांना निवडणूकीत सक्रिय भाग घेता आले नाही. जे घडू नये तेच घडले, हिंदुमहासभा या पक्षाचे पार कंबरडेच मोडले. जिंकलेल्या कॉंग्रेसने फाळणीच्या ठरारावर शिक्कामोर्तब करून देशवासियांचा विश्वासघात केला. पुढे १९४७ साली फाळणी झाली. आधी पाकिस्थानला स्वातंत्र्य मिळाले आणि नंतर भारताला स्वातंत्र्य दिले. “दिले” हा शब्द मुद्धामच वापरला आहे. एखाद्दाला भीक द्यावी तसे स्वातंत्र्य दिले आणि आमच्या निर्लज्ज पुढार्यांनी ते हसत स्वीकारले. मुळात भारताला स्वातंत्र्य मिळालेच नाही. एकीकडे आमच्या हिंदु बंधूंवर अत्याचार होत होता, आमच्या माता-भगिनींवर बलात्कार होत होता, दुसरीकडे आमचे कॉंग्रेसजन दिवाळी साजरी करत होते. स्वातंत्र्य दिन हा”दीन” झाला होता, असो. फार भयाण आठवनी आहेत. आजही त्याची उजळणी होत आहे.सावरकरांचे राजकीय आयुष्य केवळ दहा वर्षांचे होते. कॉंग्रेससारखा पक्ष असूनही सावरकरांनी हिंदु महासभा हा पक्ष निवडला. यावरुन हिंदुमहासभेची खरी योग्यता पटते.सावरकरांचे नेतृत्व कॉंग्रेसला परवडणारे नव्हते. सावरकर हे पुरुषोत्तम होते आणि कॉंग्रेस गांधी च्या नेतृत्वाखाली षंढ झाली होती, आजही आहे. षंढ पती आपल्या पत्नीकडे पाठ करून निजतो, तसेच कॉंग्रेसचे आहे, कॉंग्रेस जनतेकडे पाठ फिरवून आहे. सावरकरांमुळे हिंदुमहासभेला एक वेगळं वळण आलं होतं. त्यांनी हा पक्ष हिंदुस्थानाच्या कानाकोपर्यात पोचवला. हिंदु महासभेचे कार्य फार मोठे आहे. परंतू कॉंग्रेसने भारताचा इतिहास लिहीला आहे, त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य म्हटले की कॉंग्रेस आठवते. पण तसे नाही, हिंदु महासभेचा सिंहाचा वाटा आहे. नेहरूंनी “भारत की खोज” हे पुस्तक लिहीले, काय खोज केली कुणास ठाऊक? सुर्य आणि चंद्र पुर्वी होते तसेच आहेत. त्यांची खोज करावी लागत नाही. तसेच भारत हे भूतळावरचे पहिले प्रगत राष्ट्र आहे, त्याची खोज करणारे नहरू कोण? हा प्रश्न विचारण्याची कुणाचीही छाती झाली नाही. हे दुर्भाग्य आहे आपल्या राष्ट्राचे. भारतात ११५ कोटीहून अधिक हिंदु राहतात तरीही हा देश हिंदुराष्ट्र होत नाही याची हिंदुंना लाज वाटली पाहिजे. आधीच्या पीढीने आपल्यासाठी आणि आपण पुढच्या पीढीसाठी वृक्ष लावायचे असते, ही आपली संस्कृती आहे. सावरकरांनी विचाररूपी वृक्ष लावून आपल्यावर उपकार केले आहेत. त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी त्यांनी लिहीलेली पुस्तकं वाचाण्याचे थोडेफार कष्ट घ्यावे लागेल. कारण पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक उगीच कुणापुढेही नतमस्तक होत नाही. ज्या वेळी वर्तमानातले आदर्श दिसत नाहीत त्या वेळी भूतकाळातले आदर्श समोर ठेवायचे असतात. सावरकर क्रांतिकारक नव्हते, ते क्रांतिचे कारक होते. सावरकर एखाद्दा “योगी” सारखे जगले. संसार थाटूनही ते वैरागी होते, तुकाराम महाराजांसारखे. तात्यांचा शेवट संतांनाही हेवा वाटावा असा झाला. त्यांचे डोळे समाधीनंतरही उघडेच होते. जणू ते त्यांच्या तेजस्वी डोळ्यांनी सर्वांना भासवत होते की,सबंध ब्रह्मांडच मी माझ्या डोळ्यात सामावले आहे. धन्योहं, धन्योहं……स्वताला हिंदुत्ववादी म्हणवणार्यांनी हिंदुंचा घात केला आहे. आज हिंदुमहासभेकडे पुरेसा पार्टी फंड नसल्याने त्याचा प्रचार होत नाही. परंतू भविष्यात हिंदुमहासभा भारतावर शासन करेल अशी अपेक्षा आपण ठेऊया. प्रत्येक हिंदुने आपले मत हिंदुमहासभेला देणे आवश्यक आहे आणि आर्थीक सहाय्य करणे गरजेचे आहे. कारण हिंदुमहासभा हाच एक पक्ष आहे जो ४० वर्षे बहिष्कार असूनही हिंदुंच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे. कदाचित हीच सावरकरांची ईच्छा आहे.लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री
— जयेश मेस्त्री
Leave a Reply