नवीन लेखन...

हिंदू: जगण्याचा एक संमृद्ध मार्ग

 

हिंदू: जगण्याचा एक संमृद्ध मार्गभाग- १. हिंदू आणि हिंदूत्वआपला भारत देश हा अध्यात्म प्रधान संस्कृती असलेला एकमेव प्राचीन देश आहे. इ.स.पू. १०००० वर्षे हा ऋग्वेदाचा काळ मानला जातो. त्यापूर्वीही इथे एक संमृद्ध, सुसंस्कृत, सुसंघटीत समाज धर्माचरण करत होता. अमेरिका युरोपला ५०० वर्षांपूर्वी माहीत झाली. पण युरोपचाही इतिहास ३ हजार वर्षांपेक्षा जुना नाही. आज जे धर्म स्वतःला देवाचा एकमेव धर्म म्हणवून घेतात आणि धर्माच्या नावावर अश्लाघ्य कृत्य करतात, त्यांचा २००० हजार वर्षांपूर्वी मागमूसही नव्हता. इ.स.पू. ८००० ते इ.स. १५०० पर्यंतच्या प्रचंड कालखंडात जगभरातील बहुतेक सर्व देशात हिंदू संस्कृतिचा प्रभाव होता. ज्या वेळी भारत देशात श्रेष्ठ प्रतीचे तत्वज्ञान आणि अध्यात्माचा विकास होत होता, त्यावेळी पाश्चात्य देश अप्रगत अवस्थेत होते. हिंदू धर्मात अनेक पंथ, जाती, पोटजाती यांचा समावेश आहे. परंतु आता आहे तसा पूर्वी ह्यांच्यात द्वेष नव्हता. हिंदू धर्मात मुर्तिपुजेला फ़ार महत्व आहे. माणसाचे मन हे फ़ार चंचल असते. ते क्षणभरही स्थिर राहू शकत नाही. मानसपुजेने मन स्थिर होत नाही. मनाची एकाग्रता साधावयाची असेल तर समोर भगवंताची सुंदर मु्र्ति हवी असते. म्हणून मुर्तिपुजा ही आवश्यक आहे. मुर्तिपूजा हे अज्ञान नसून अप्रतिम विज्ञान आहे. मुळात हिंदूंचे अध्यात्म हे विज्ञानावर आधारित आहे. पण इतर धर्म हे मानत नाही आणि मर्तिभंजनासाठी प्रवृत्त होतात. ह्यासारखे दुसरे अज्ञान नाही. ह्यासारखे दुसरे पाप नाही. इतर धर्म आणि हिंदू धर्म ह्याच्यात अंतर काय?हिंदू धर्म ही पायवाट आहे तर इतर धर्म हे रस्ते आहेत. पायवाट कुणी निर्माण केली हे सांगता येत नाही. तसेच हिंदु धर्माचे आहे तो कुणी निर्माण केली हे सांगता येत नाही. तो फ़ार पुरातन आहे, सनातन आहे आणि म्हणूनच ईश
्वरनिर्मीत आहे. त्या उलट

रस्ता हा तयार करावा लागतो. तो कुणी तयार केला, त्याचे नाव माहीत असते. इतर धर्मांचे धर्मगुरु आहेत. त्यामुळे ते धर्म केव्हा स्थापन झाले, ते कुणी स्थापन केले याची माहिती सहज उपलब्ध आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रस्ता हा लांबचा पल्ला असतो. पायवाटेचे तसे नसते. पायवाटेने जाताना अंतर कमी होते व लवकर जाता येते. थोडक्यात सांगायचे झाले तर हिंदू धर्म हा भगवंताकडे जाण्याची पायवाट (short-cut ) आहे. आपला हिंदू धर्म समजण्यासाठी पात्रतेची जरुरी आहे. ज्याची पात्रता नाही तो हिंदू होऊ शकत नाही. हिंदू असणे हे सौभाग्याचे आहे. आपण हिंदू आहोत कारण गेल्या जन्मी आपण फ़ार मोठे पुण्यकर्म केले होते. आणि म्हणूनच आपण ह्या जन्मी हिंदू म्हणून जन्माला आलो. आपल्या धर्मानुसार परमेश्वर अवतरतात ही फ़ार मोठी बाब आहे. इतर देशात देवाचे प्रेषीत/ अनुयायी जन्माला येतात. पण आपल्या हिंदूस्थानात साक्षात भगवंत अवतरतात. केवढे पुण्यवान आहोत आपण? भगवंत अवतरतात आणि स्वतः भगवंत गीता सांगतात. गीतेबद्दल टीळकांनी सुंदर शब्द वापरलेला आहे “संसारशास्त्र”. ते म्हणतात गीतेमद्दे संन्यासमार्ग सांगितलेला नसून ईश्वरावर श्रद्धा ठेवून निष्काम बुद्धीने अखंड कर्ते होण्यास सांगितले आहे…. अखंड हिंदूस्थानचे अखंड कर्ते. इतर धर्मात अनुयायी जन्माला येतात तेही अनानुभवी असतात. म्हणून त्यांच्यात अंधानुकरण जास्त दिसून येते. असे धर्म स्थितिशील राहतात. आहे त्याच स्थितित राहतात. त्यांच्यात हिंसा, असहिष्णूता सहज दिसून येते. उलटपक्षी हिंदूधर्म सहीष्णू आहे. संग्रामसिंह चौधरी “भारताचा इतिहास” या पुस्तकात लिहितात की ’हिंदूस्थानी संस्कृतीस विचारस्वातंत्र्य आणि सहिष्णूता हे हिंदू अध्यात्माचे योगदान आहे. ह्याचे मूळ ऋग्वेदात आहे.’ आणि म्हणूनच नेहमी हिंदूत्ववादी असावे. हिंदू आणि हिं
ूत्व म्हणजे काय?सावरकरांनी हिंदूची अप्रतीम व्याख्या सांगितलेली आहे.“आसिंधु सिंधुपर्यंता यस्य भारतभुमिका .पितृभूः पुण्यभूश्वैव स वै हिंदूरिती स्मृतः”म्हणजे सिंधूनदीपासून सागरापर्यंत पसरलेल्या या विशाल भूभात राहणारा जो, या भूमीला पितृभूमी आणि पुण्यभूमी मानेल तो हिंदू असे समजावे. आज बर्‍याच लोकांना हिंदू असण्याचे वाईट वाटते, असुरक्षीत वाटते. हिंदू हा शब्द उच्चारताच काहींना पोटदुखी होते, जुलाब होतात. भगवा आतंकवाद यासारखे शब्द अस्तित्वात नसतानाही उच्चारले जातात. आज टी.व्ही, फ़िल्म्स यामुळे मुले बिघडत चालली आहेत. बर्‍याचशा पुढारलेल्या स्त्रीया आज स्वताला पुरुषांपासून मुक्त समजतात. स्त्रीमुक्ती चळवळ म्हणे. चळवळ कसली?…. वळवळ म्हणा. अश्लील कपडे घालणे, सीगारेट, मद्दपान करणे, फ़्री-सेक्स ही तुमची स्त्रीमुक्ती चळवळ का? पूर्वी हिंदूस्थानात पर-स्त्री ही मातेसमान मानली जायची. आता पर-स्त्री ही वेश्ये-समान मानली जाते. अहो रस्त्याने चालणार्‍या स्त्रीकडे कोण चांगल्या नजरेने पाहतो? सांगा ना? अशा लोकांना चाबकाने फ़ोडून काढलं पाहिजे. हे सर्व कशामुळे होतं? धर्मशिक्षणाच्या अभावामुळे. हिंदू धर्म कर्मठ आहे. पण काळ बदललाय. हिंदूनी कर्मठ असण्यापेक्षा कर्मनिष्ट असावे. एक ध्यानात ठेवावे, धर्मामुळे नव्हे तर धर्म अजिबात सुटल्यामुळे आपली अधोगती झाली आहे. बरेचसे लोक विचारतात की what is a defination of hindu and hinduism? मला त्यांना सांगायचे आहे की hindu means human and hinduism means humanism. हिंदू म्हणजे माणूस (आर्य) आणि हिंदूत्व म्हणजे माणूसकी. माणसाने माणसाशी माणसा सारखे वागणे म्हणजेच हिंदूत्वावादी असणे. आज मला स्वताचा अभिमान वाटतो कारण मी या विशाल आणि भगवंत निर्मित हिंदू संस्कृतीत जन्माला आलो. सर्वांनाच याचे अभिमान वाटले पाहिजे. हिंदूमय होणे म्हणजे भगवंतम
य होणे, गीतामय होणे. “बुद्धी स्थिर ठेवून प्राप्त परिस्थितीत स्वतःचे कर्तव्य कोणते ते ओळखणे आणि रागलोभ बाजूला ठेवून अनन्यभावाने त्यानुसार आचरण करणे म्हणजे गीतामय होणे” असे स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात.हिंदू धर्माचे रक्षण करणे हेच आपले प्रथम कर्तव्य आहे. आपापसातले रागलोभ बाजूला ठेवून हिंदू म्हणून एकत्र यावे आणि त्यानुसार आचरण करावे.

या जगाला जर विनाशापासून मुक्त करावयाचे असेल तर “हिंदू” हाच एक पर्याय आहे. जगाच्या प्रत्येक समस्येवर “हिंदू” हेच एक औषध आहे. कारण हिंदू आणि फ़क्त हिंदूच जगण्याचा समृद्ध मार्ग आहे. (कुणीतरी हे भालचंद्र नेमाडेंना सांगावे, ही विनंती)धन्यवाद……लेखक: जयेश मेस्त्रीमोबाईल: ९८३३९७८३८४.ई-मेल : smartboy.mestry@gmail.com jaysathavan@gmail.com

— जयेश मेस्त्री

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..