लेखक एम.टी.एन.एल. मध्ये अधिकारी होते. त्यांना हिमालयात पायी फिरण्याचा छंद होता. पायी जात असताना निसर्गाचं रम्य दर्शन, बर्फाच्छादित शिखरं, वन्य प्राणी, विविध रंगाची फुलं, वनौषधीची झाडं यांचा त्यांना परिचय झाला. गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ या धार्मिक स्थळांना भेट देताना त्याचे पुराणातील संदर्भ त्यांनी दिले आहेत. निसर्गाचं विराट रुप त्यांना सतत आकषिर्त करीत होतं तर जिम कार्बेटचं जंगल जीवन त्यांना शीळ घालीत होतं. वन्यप्राण्यांच्या विशेषत: वाघाच्या शिकारीवर निर्बंध घालणार्या जिम कार्बेटला ते सलाम करतात. त्या सर्व ठिकाणांची पुराणाचा आधार घेऊन केलेली वर्णनं मनाला मोहवून टाकतात.
हिमशिखरांच्या सहवासात
लेखक : प्रकाश लेले
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : १८०/- रुपये
पाने : १५०
हिमालयाच्या निसर्गाला पावित्र्याची, अध्यात्माची, संस्कृतीची जोड आहे. हिमालयातील स्थाने, मंदिरे, पर्वत शिखरे, सरोवरे, प्रपात, नद्या बघताना मन मंत्रमुग्ध होते. हिमालयाचा निसर्ग अनुभवावयाचा असेल तर अनवट वाटेवरुन पदभ्रमंती सारखा दुसरा पर्याय नाही. या पुस्तकातील सर्व स्थाने उत्तराखंडातील आहेत. या सर्व हिमशिखरांचे आभार कसे मानायचे हेच कळत नाही. त्या हिमशिखरांनी माझ्यावर केलेल्या प्रमाचा, आपुलकीचा वर्षाव आहे. सर्वांना माझे एकच सांगणे आहे, वर्षातील काही दिवस तरी तुम्ही अशा सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात घालवा.
— प्रकाश लेले
Leave a Reply