नवीन लेखन...

हृदयविकार आणि पक्षाघात

हृदयविकाराचा झटका येणे आणि पक्षाघात होणे (शरीराचा एक भाग लुळा पडणे) या दोन्ही विकारांचे कारण त्या त्या अवयवाला रक्ताचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यात रक्तपुरवठ्यास निर्माण झालेला अडथळा हे असते. असा अडथळा निर्माण होण्यामागे बरीच कारणे असू शकतात. या कारणांपैकी बरीच कारणे आता शास्त्राला उलगडलेली आहेत. या आजारांचा प्रतिबंध म्हणजे या कारणांचा प्रतिबंध करणे. सर्वच माणसांनी याबाबत जागृत असणे आदर्श आहे. किमान ज्यांच्या घराण्यात या प्रकारचे आजार ज्ञात आहेत, अशा वयाच्या चाळिशीच्या पुढच्या पुरुषांनी आपली तपासणी करून घेऊन योग्य तो जीवनशैलीत बदल करणे आवश्याक आहे. जीवनशैली म्हणजे आपला आहार, आपला व्यायाम, आपली व्यसने (विशेषतः तंबाखूचा वापर), आपली विचारांची पद्धत, आपले मनोरंजनाचे मार्ग आणि आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान.

आहाराचा शास्त्रशुद्ध विचार नऊ विभागांत केला जातो
१) उष्मांक, २) प्रथिने, ३) स्निग्ध पदार्थ, ४) कर्बोदके, ५) जीवनसत्त्वे, ६) खनिजे, ७) पाणी, ८) चोथा आणि ९) तृप्ती. यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार योग्य बदल (वाढ किंवा घट) एक किंवा अधिक अन्नघटकांत करणे इष्ट असते. सर्वसाधारणपणे आपले अन्नघटक पुढील असतात – १) तृणधान्ये (गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, वरी, नाचणी), २) डाळी व कडधान्ये (मूग, मसूर, मटकी, चवळी, सोयाबीन, तूर इत्यादी), ३) भाज्या (पालेभाज्या, शिरांच्या भाज्या), ४) कोशिंबिरी, ५) दूधदुभते, ६) ऋतुमानाप्रमाणे फळे, ७) अन्नास चव येण्याकरता वापरलेले मीठ, मसाले, तेल, तूप व स्निग्ध पदार्थ, ८) चहा, कॉफी, इतर पेये याखेरीज मांसाहाराचादेखील विचार आवश्य क आहे.

वजन योग्य पातळीवर येण्याच्या दृष्टीने उष्मांकांवर लक्ष हवे. वजन जास्त असले तर ते कमी करण्याकरता आहारातील उष्मांक कमी करून नियमाने व्यायाम करणे आवश्यवक आहे. त्या दृष्टीने मद्यपान (आणि धूम्रपान) कटाक्षाने वर्ज्य करावे. साखर सोडावी. भात, बटाटा, रताळे, साबुदाणादेखील शक्या तेवढा टाळावा किंवा सेवन मर्यादित ठेवावे. तीच योजना तेल, तूप, साय, लोणी, तळलेले पदार्थ यांच्याबद्दल असावे. मिठाचे सेवन चवीपुरतेच असावे. जीवनसत्त्व ब १२ व फोलिक यांचे सेवन आवश्य,क आहे. या दृष्टीने दूध नियमाने घ्यावे व ताज्या कोशिंबिरी सेवने इष्ट आहे. या कोशिंबिरींवर ताजे कापलेले लिंबू पिळून घ्यावे.

संथगतीने सपाटीवर चालण्याचा व्यायाम वजन कमी करण्याच्या दृष्टीने चांगला आहे. दररोज ४० मिनिटे सकाळी व संध्याकाळी (दिवसाकाठी ८० मिनिटे) पायी चालण्याने दर आठवड्याला दोन हजार उष्मांक वापरले जातात. नऊ हजार उष्मांक वापरले गेले, की एक किलो मेदाचे विघटन होते म्हणजे ४० मिनिटे सकाळी व संध्याकाळी नियमाने संथगतीने सपाटीवर चालण्याने सहा आठवड्यांत एक किलो वजन कमी व्हावे. ही गती चालू ठेवल्यास सहा महिन्यांत निदान तीन किलो वजन घटेल. या प्रमाणात तीन वर्षांत पुरेसे वजन घटेल. कोणत्याही व्यायामाच्या बाबतीत काही मूलभूत नियम पाळावेत. व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. वाढलेला रक्तदाब, त्रास न होणारा हृदयविकार, मधुमेह, गुडघ्यांचे आजार, पायांत दोष इत्यादी नाहीत याची शहानिशा आवश्याक आहे. व्यायामाची सुरवात माफक प्रमाणातच करावी. व्यायाम करून झाल्यावर अतिरेकी प्रमाणात थकवा येऊ नये. व्यायाम नियमित करावा. केवळ शनिवार – रविवार खूप व्यायाम करणे आणि इतर दिवशी व्यायाम न करणे हे अपायकारक ठरते. सुरवातीच्या माफक व्यायामात सावकाश वाढ करावी. कोणता व्यायाम करावा याचे मार्गदर्शन तज्ज्ञांमार्फत करून घ्यावे.

आपल्या जीवनाचे ध्येय ठरविताना व्यवहार्यतेचा आणि वास्तवाचा विचार आवश्याक असतो. आपले विचार कितीही उच्च पातळीवर असले तरी पाय जमिनीवरच ठेवून माणसाने आपले ध्येय ठेवावे. आपली कुवत आणि परिस्थितीची पारख आणि जाणीव वास्तवाला धरून नसल्यास आपण ठरविलेले ध्येय गाठणे अव्यवहार्य ठरेल. त्यातून सतत अपेक्षाभंगाचे अनुभव येत राहतील. त्यातून मनावर विपरीत परिणाम घडेल. अस्वस्थ मनाचा परिणाम शारीरिक व्याधी निर्माण होण्याकडे होतो. रक्तदाब वाढतो, रक्तशर्करा वाढते, रक्तातील कोलेस्टेरॉल व इतर मेदघटक वाढतात. या साऱ्यांचा परिणाम हृदयविकार होण्यात होतो. हृदयविकार टाळणे शक्य् आहे. जेथे या रिस्क फॅक्टकर्सबद्दल समाजाचे प्रबोधन केले गेले आहे आणि बहुसंख्य लोकांनी योग्य आहार, नियमाने व्यायाम, तंबाखूपासून मुक्ती, उच्च रक्तदाबाचा ताबा आणि रक्तातील मेदघटांचे योग्य प्रमाण राखले तेथे हृदयविकार घटलेला आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- सकाळ / डॉ. ह. वि. सरदेसाई

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..