जगात सुमारे २०० राष्ट्रे आहेत. पण जगातील ६० टक्के व्यापार फक्त १२ राष्ट्रांच्या हातात आहे. ९० टक्के व्यापार फक्त ३० ते ४० टक्के राष्ट्रे करतात. सुमारे १६०-१७० देश जागतिक व्यापार व जागतिक अर्थव्यवस्थेच्या बाहेर आहेत, असे समजण्यास हरकत नाही. जी राष्ट्रे जागतिक आर्थिक व्यवस्थेत समाविष्ट आहेत,
त्यांतदेखील अंतर्गत विषमता आहे. आज २०१० साली जगाच्या ७०० कोटी लोकसंख्येपैकी निम्मे लोक गरिबीत जगत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने असलेले हे लोक जोपर्यंत असंतूष्ट आहेत तोपर्यंत गुन्हेगारी, हिंसाचार प्रवृत्ती वाढणारच.
संदर्भ – एका दिशेचा शोध, लेखक-संदिप वासलेकर,प्रकाशक-राजहंस प्रकाशन, पुणे२०१०.
वरील आकडेवारी पाहिल्यास जागतिक व्यापारक्षेत्रातील असंतूलन किती प्रमाणात आहे ते आपल्या लक्षात येइल. जे देश जागतिक व्यापारक्षेत्राच्या बाहेर आहेत त्यांना बेरोजगारी, गरिबी यांसारख्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. स्थानिक प्रशासन आणि सरकारतर्फे नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध न झाल्याने प्रामुख्याने तरुण वर्ग चुकीच्या मार्गाला लागत आहे. तरुण वर्ग वाममार्गाला लागल्यास त्याचे काय दुष्परिणाम होतात याची उदाहरणे आपणासमोर आहेतच. जागतिक पातळीवर व्यापार वाढवण्यासाठी देशांतर्गत संबंध सुधारुन इतरही देशांना प्रोत्साहन देण्याची आणि बाजारपेठ बळकट करण्याची गरज आहे. हे न झाल्यास नागरिकांतील असंतुष्टतेचे प्रमाण वाढत जाउन गुन्हेगारी, हिंसाचाराचे प्रकार वाढत जातील. या आणि अशा अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर संदिप वासलेकरांनी आपल्या ’एका दिशेचा शोध’ या पुस्तकात विस्तृत चर्चा केली आहे.
— तुषार भामरे
Leave a Reply