नवीन लेखन...

हॉलीवूड, बॉलीवूड चित्रपट सृष्टीतील कलाकार अनुपम खेर

अनुपम खेर यांचे वडील सरकारी क्लार्क होते. मा.खेर यांचे प्राथमिक शिक्षण सिमला येथील D.A.V प्रशालेत झाले. त्यांचा जन्म ७ मार्च १९५५ रोजी झाला.नंतर महाविद्यालयीन शिक्षण दिल्ली विद्यापीठातून केले. कलेची आवड असल्यामुळे नाटक व रंगमंचाची आवड त्यांना होती. अभिनयात करियर करण्याच्या हेतूने ते मुंबईला आले. हॉलीवूड, बॉलीवूड दोन्ही आघाडय़ांवर कार्यरत राहून निर्माता, दिग्दर्शक, शिक्षक आणि अगदी लेखकाच्या भूमिकेतूनही वावरणाऱ्या अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरवात १९८२ साली “आगमन” या चित्रपटाने झाली. पण १९८४ सालचा महेश भट्ट दिग्दर्शित ‘सारांश’ या चित्रपटाने मा.अनुपम खेर यांचे नाव झाले. ‘सारांश’मध्ये बी. व्ही. प्रधान या शाळेच्या निवृत्त झालेल्या मुख्याध्यापकांची भूमिका करायची होती. या भूमिकेसाठी निर्मात्यांना कोणी तरी प्रसिद्ध आणि अनुभवी कलाकार हवा होता. त्या वेळी या भूमिकेच्या मानाने तरुण असलेल्या अनुपम खेर यांनी ही भूमिका आपण उत्तम वठवू शकू, असा विश्वास दिला होता. अनेक घडामोडींनंतर अखेर ही भूमिका त्यांच्या पदरी पडली आणि त्यांची कारकीर्द सुरू झाली. बॉलीवूडमध्ये ‘हम आपके है कौन’, ‘डॅडी’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ सारख्या व्यावसायिक चित्रपटांपासून ते ‘वेनस्डे’, ‘स्पेशल २६’, ‘खोसला का घोसला’, ‘मैने गांधी को नही मारा’सारख्या वेगळ्या वाटेवरच्या चित्रपटांमधूनही त्यांनी भूमिका केल्या आहेत. बॉलीवूडप्रमाणेच हॉलीवूडमधलीही त्यांची वाट जुनीच आहे. ज्या वेळी ओम पुरी, नसीरुद्दीन शहा यांच्यासारखे मोजकेच कलाकार हॉलीवूडमध्ये काम करत होते त्याच वेळी अनुपम खेर यांनी तिथली वाट धरत ‘बेंड इट लाईक बेकहॅम’, अँग लीचा ‘लस्ट, कॉशन’ आणि वूडी अॅडलनचा ‘यू विल मीट अ टॉल डार्क स्ट्रेंजर’ अशा हॉलीवूडपटांमधून काम केलं होतं. अकॅडमी अॅशवॉर्ड विजेता ठरलेला रॉबर्ट डी निरो यांचा ‘सिल्वर लाइनिंग्ज प्लेबुक’ हा त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरलेला हॉलीवूडपट आहे. त्याशिवाय, हॉलीवूड अभिनेता गेरार्ड बटलर बरोबर ‘द हेडहंटर कॉलिंग’ या मार्क विल्यम दिग्दर्शित हॉलीवूडपटातही त्यांनी काम केलं असून हे दोन्ही चित्रपटाही त्यांनी काम केले आहे. अनुपम खेर यांनी ५०० हून अधिक चित्रपटात व १०० हून अधिक नाटकात काम केले आहे. पाचशेव्या चित्रपटाचं नाव ‘द बिग सिक’ असं असून मायकेल शोवॉल्टर दिग्दर्शित या चित्रपटात ऑस्कर विजेता अभिनेता हॉली हंटर, झो काझन आणि रे रोमानो हे हॉलीवूड कलाकार काम केले आहे. मा.अनुपम खेर यांना ५ वेळा बेस्ट कॉमिक रोल साठी फिल्मफेयर चा अवार्ड मिळालेला आहे. चित्रपट विजय साठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर चा फिल्मफेयर अवार्ड मिळाला आहे. एक अभिनेता असण्यासोबत ते भारतीय सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टीफिकेशन नेशनल स्कूल ऑफ ड्रामा इंडिया चे अध्यक्ष पण राहिले आहेत. हिंदी सिनेमा आणि कला क्षेत्रात अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने २००४ मध्ये त्यांना पदमश्री व वर्ष २०१६ मधेच पद्मभूषण देवून सन्मानित केले आहे. त्यांचे संपूर्ण परिवार अभिनय क्षेत्रात आहे. त्यांची पत्नी एक उत्कृष्ट अभिनेत्री व चंदिगढ येथून संसद सदस्य आहेत. त्यांचा मुलगा सुद्धा हिंदी सिनेमात अभिनेता आहे.

अनुपम खेर भारतीय फिल्म सेंसर बोर्ड चे अध्यक्ष सुद्धा राहिले आहेत. ते भारतीय नेशनल स्कूल ऑफ ड्रामा चे अध्यक्ष सुद्धा होते. १९७८ मध्ये याचे ते विद्यार्थी सुद्धा होते. २००७ मध्ये अनुपम खेर यांचे प्रिय मीटर सतीश यांच्या सोबत मिळून करोल बाग फिल्म प्रोडक्शन कंपनी स्थापन केली. या प्रोडक्शन खाली तेरे संग हि पहिली फिल्म होती. २०११ मध्ये मल्याळम अभिनेता मोहनलाल आणि अभिनेत्री जयाप्रदा सोबत मल्याळम भाषी रोमांटिक ड्रामा प्राणायाम चित्रपट सुरु केला होता. त्यांनी मराठीतही अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. याशिवाय पंजाबी, कश्मीरी, मल्याळम भाषांच्या विविध अंगाने अभिनय केला आहे. २००९ मध्ये कार्ल फ्रेड्रिंकसन यांच्यासाठी उडी मधील अनिमेशन मधील बांगलादेश निर्मिती वरील ड्रामा फिल्मसाठी करारबद्ध केले गेले आहे. २०१६ मध्ये ABP न्यूज वरील भारताच्या इतिहासाची ओळख सांगणाऱ्या डॉक्युमेंटरीचे सूत्र संचालन केले आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..