१३ डिसेंबर १९८१ रोजी फरिदाबादमध्ये अजय रात्राचा जन्म झाला. यष्टीरक्षक असणारा रात्रा उजव्या हाताने फलंदाजी करतो. बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीच्या प्रशिक्षणार्थींच्या पहिल्या गटात त्याचा समावेश होता (इ. स. २०००). तिथे त्याला रॉड मार्श आणि सय्यद किरमाणीसारख्या यष्टीरक्षकांबरोबर चर्चा करून आपले रक्षण सुधारण्याची संधी मिळाली. २००० मध्ये भारताच्या अंडर-१९ संघाने विश्वचषक जिंकला, त्यात रात्राचा समावेश होता. नंतर संघाचे नेतृत्व त्याच्याकडे आले. इंग्लंडविरुद्ध मायदेशात झालेल्या मालिकेत त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विजय मिळविला. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीच भारतीय निवडकर्त्यांसमोर यष्टीरक्षक निवडीचा यक्षप्रश्न उभा राहिला होता. एका वर्षाच्या कालावधीत सहा यष्टीरक्षकांच्या समावेशानंतर अजय रात्राला संधी मिळाली. २००२ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध अँटिग्वात रात्राने नाबाद ११५ धावा काढल्या. ही त्याची तिसरीच कसोटी होती. या शतकासोबतच अजय रात्रा कसोटी शतक काढणारा सर्वात लहान वयाचा कसोटीपटू झाला. या सामन्यात वेस्ट इंडीजचा यष्टीरक्षक रिडली जेकब्जनेही शतक काढले होते. एका कसोटी सामन्यात सहभागी असलेल्या दोन्ही संघांच्या यष्टीरक्षकांनी वैयक्तिक शतके काढण्याची कसोटिहासातील ही पहिलीच वेळ होती. या कसोटीचा वीर अजय रात्राच ठरला.या मालिकेनंतर मात्र रात्राचा दिवस सरला आणि त्याची संघातील जागा गेली. कसोटी सामन्यांसाठी पार्थिव पटेलला संधी मिळाली आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये राहुल द्रविडवर यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली. २००८-०९ च्या हंगामापासून भारतीय क्रिकेट मंडळाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही स्थानिक विसविशीत सामन्यांची स्पर्धा सुरू केली आहे. या सामन्यांमध्ये अजय रात्रा गोव्याच्या संघाकडून सहभागी झाला आ
े. रणजी चषकात हरयाणाच्या संघाचे नेतृत्व त्याने केलेले आहे.१३ डिसेंबर १९७४ रोजी पर्थमधील वाका मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान अॅशेस मालिकेतील दुसरी कसोटी सुरू झाली. आधीच्या तीन दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात नसणारा आणि गेल्या साडेतीन वषांमध्ये कसोटी न खेळलेला एक खेळाडू या सामन्यात खेळत होता. चार-पाच
दिवसांपूर्वी केंटमधील आपल्या घरात बसून
तो क्रिस्मसची तयारी कशी काय करावी याचे नियोजन करीत होता !पहिल्या कसोटीनंतर डेनिस अमिस आणि जॉन एड्रिच जायबंदी झाल्याने इंग्लंडच्या संघाला एका अनुभवी फलंदाजाची गरज होती. आणीबाणीच्या क्षणी बोलावला गेलेला हा इसम होता कोलिन कौड्री. या कसोटीच्या अहवालात विज्डेन म्हणते – “आपल्या १८८ व्या कसोटी डावासाठी कौड्री बाहेर आला (तेही साडेतीन वर्षांमधील पहिल्या कसोटीत) तेव्हा कँटरबरीतील प्रेक्षकांनी त्याला खड़ी मानवंदना दिली. पहिल्याच तीन चेंडूंवर आपली विकेट वाचविताना त्याने वेगवान गोलंदाजांविरुद्ध संरक्षणात्मक कसे खेळावे याचे प्रात्यक्षिक दिले. … (नॉट, टिटमस आणि कौड्री) या तिघांनीच थॉम्सन आणि लिलीसारख्या गोलंदाजांविरुद्ध आपापली शरीरे चेंडूच्या रेषेत आणून खेळत स्लिपमध्ये चेंडू उडणार नाही याची दक्षता घेतली.”कौड्रीने पहिल्या डावात २२ तर दुसर्या डावात सलामीला येऊन ४१ धावा काढल्या. पहिल्या डावात खेळण्यासाठी आल्यावर ऑस्ट्रेलियाई गोलंदाज जेफ थॉम्सनला तो मिश्किलपणे म्हणाला होता : “हलो, आऽम कोलिन कौड्री. आय डोन्ट बिलीव वीऽहॅव मेट.”
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply