१७ डिसेंबर १९३३ रोजी कसोटी सामन्यांमधील भारतीयाचे पहिलेवहिले शतक आले. ज्या फलंदाजाने सर्वप्रथम भारताकडून तीन-अंकी धावसंख्या गाठली त्या फलंदाजाचा हा पदार्पणाचा सामना होता. सामना होता इंग्लंडविरुद्ध बॉम्बेच्या जिमखाना ग्राऊंडवर आणि तो फलंदाज होता लाला अमरनाथ. (तपशिलासाठी पहा : फ्लॅशबॅक ११ सप्टेंबर)
पदार्पणाच्या कसोटीत शतक नोंदविण्याची कामगिरी आजवर बारा भारतीयांना जमलेली आहे :
<१. लाला अमरनाथ
<२. दीपक शोधन
<३. ए जी कृपालसिंग
<४. अब्बास अली बेग
<५. हनुमंत सिंग
<६. गुंडाप्पा विश्वनाथ
<७. सुरेंदर अमरनाथ
<८. मोहम्मद अझरुद्दीन
पहिल्या डावात ११० धावा. पुढच्या सलग दोन कसोट्यांमध्येही शतके. एकूण ९९ कसोट्यांमधून २२ शतके.
पहिल्या डावात ११० धावा. पुढच्या सलग दोन कसोट्यांमध्येही शतके. एकूण ९९ कसोट्यांमधून २२ शतके.
<९. प्रवीण आमरे
<१०. सौरव गांगुली
<११. वीरेंदर सेहवाग
<१२. सुरेश रैना
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply