नवीन लेखन...

नोव्हेंबर १८ : सातवी बरोबरी आणि ब्रॅडमनचा ‘फ्लॉवरी’ अवतार

 

 

एकदिवसीय सामन्यांच्या निकालांचा इतिहास अत्यंत उत्कंठावर्धक आहे. आज प्रचलित असलेले एकदिवसीय सामन्यांच्या निकालाबाबतचे निर्णय हे केवळ गरजेतून जन्माला आलेले आहेत. दुसर्‍यांदा फलंदाजी करणार्या संघाने पहिल्या संघाइतक्या धावा जर काढल्या नाहीत तर दोन्ही संघाच्या बाद झालेल्या फलंदाजांची संख्या विचारात घेतली जाई. समान धावसंख्या झाल्यास बाद झालेल्या गड्यांची संख्या निर्णायक ठरे. नंतर धावगतीचा निकष वापरला जाई. आताही हे दोन्ही निकष निर्णायक ठरतात पण ते ‘अडथळे’ आल्यामुळे पूर्ण खेळ होऊ न शकलेल्या सामन्यांमध्येच.

 

या तारखेने १९९३ मध्ये एकदिवसीय सामना दुर्मिळ होण्याची घटना पाहिली इंदूरमध्ये. नेहरू स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात मोहम्मद अझरुद्दीन आणि अँडी फ्लॉवर हे प्रतिस्पर्धी कर्णधार होते. प्रथम फलंदाजी करणा्र्‍या भारताने पाहुण्यांसमोर विजयासाठी एक-कमी-अडीचशेचे आव्हान ठेवले. भारताकडून मनोज प्रभाकर ९१, विनोद कांबळी ५५, अझरुद्दीन नाबाद ५४ यांची कामगिरी लक्षणीय होती.

 

झिम्मींचा नववा गडी २३७ धावांवर बाद झाला. अखेरच्या षटकासाठी चेंडू अझरने मनोज प्रभाकरकडे सोपविला. हीथ स्ट्रीक-जॉन रेनी या जोडीला १२ धावा अखेरच्या षटकात काढावयाच्या होत्या. पहिल्या पाच चेंडूंवर १० धावा घेत या जोडीने आपले काम चोख बजाविले. शेवटचा चेंडू स्ट्रीकच्या बॅटच्या संपर्कात येऊ शकला नाही पण एक धाव त्याला मिळाली. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला.

 

हिरो चषकाचा हा सातवा सामना होता. एकूण एदिसांच्या इतिहासातील हा बरोबरीत सुटलेला सातवा सामना होता.

 

एखाद्या खेळाडूच्या यशापयशाचे मोजमाप करताना सरासरीचा सर्वाधिक वापर केला जातो. अनेकदा तो फसवा ठरू शकतो कारण सातत्याचे प्रतिबिंब एकूण सरासरीत उमटू शकत नाही. त्यामुळे लागोपाठच्या डावांमध्ये किंवा सामन्यांमध्ये लक्षणीय कामगिरी करण्याला आगळेच महत्त्व असते. ‘फलंदाजाला बाद होण्यासाठी एक चेंडूच पुरेसा असतो’ असे यासंदर्भात नेहमी म्हटले जाते.

 

१८ नोव्हेंबर २००० रोजी भारताविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या

कसोटीत दिल्लीत झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवरने (वरच्याच फोकसमधील तुल्यबळ कर्णधार) नाबाद १८३ धावा काढल्या. त्यानंतरच्या सलग डावांमधील त्याच्या धावा पहा : ७०, ५५, नाबाद २३२, ७९, ७३, २३, ५१, ८३,४५, नाबाद ८, १४२, नाबाद १९९, ६७, नाबाद १४, २८, नाबाद ११४, ४२ आणि १०. पाच शतकांसह आणि सात पन्नाशांसह १३ महिन्यांच्या कालावधीत १३३.२७ च्या ‘पारंपरिक’ सरासरीने एकूण १,४६६ धावा !

 

सन २००२ च्या पहिल्या चार डावांमध्ये तो केवळ २० धावाच जमवू शकला. ब्रॅडमनसादृश अतिमानवाच्या अवतारानंतर अखेर अँडी ‘माणसां’मध्ये आला.

 

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..