नवीन लेखन...

२१ व्या शतकातील संगणक प्रेम !!

 

खालील कविता ही राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी , श्री बबलू वडार (शिक्षक -कोल्हापूर) यांनी लिहिली होती. कविता पठण स्पर्धेत त्यांना पहिला नंबर मिळाला.

Out dated झालंय आयुष्य

स्वप्नही download होत नाही

संवेदनांना ‘virus’ लागलाय

दु:खं send करता येत नाही

जुने पावसाळे उडून गेलेत

delete झालेल्या file सारखे

अन घर आता शांत असतं

range नसलेया mobile सारखे

hang झालेय PC सारखी

मातीची स्थिती वाईट

जाती माती जोडणारी

कुठेच नाही website

एकविसाव्या शतकातली

पीढी भलतीच ‘cute’

contact list वाढत गेली

संवाद झाले mute

computer च्या chip सारखा

माणूस मनानं खुजा झालाय

अन ‘mother’ नावाचा board,

त्याच्या आयुष्यातून वजा झालाय

floppy Disk Drive मध्ये

आता संस्कारांनाच जागा नाही

अन फाटली मनं सांधणारा

internet वर धागा नाही

विज्ञानाच्या गुलामगिरीत

केवढी मोठी चूक

रक्ताच्या नात्यांनाही

आता लागते facebook…………….

— मराठीसृष्टी व्यवस्थापन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..