तोवरच्या १,०५२ कसोट्यांच्या इतिहासातील केवळ दुसरी बरोबरीत संपलेली कसोटी २२ सप्टेंबर १९८६ रोजी ‘संपली’. प्रतिस्पर्धी होते भारत-ऑस्ट्रेलिया.पाहुणा कर्णधार अलन बॉर्डरने १८ सप्टेंबरच्या सकाळी चेन्नईतील एम ए चिदम्बरम मैदानावर नाणेफेक जिंकली आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. डीन जोन्सचे द्विशतक आणि डेविड बून व बॉर्डर यांच्या शतकांच्या जोरावर पाहुण्यांनी ५७४ धावा उभारल्या. डीन जोन्सला उष्मा मानवला नाही. डाव संपल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करवून घ्यावे लागले.गावसकर-श्रीकांत या भारतीय सलामीवीरांनी ६२ धावांची सलामी दिली. तीत गावसकरचा वाटा केवळ ८ धावांचा होता. या सामन्याद्वारे गावसकरने ओळीने १०० कसोट्यांमध्ये खेळण्याचा अनोखा विक्रम केला. श्रीकांत, अझरुद्दीन, रवी शास्त्री यांची निमशतके आणि कर्णधार कपिल देवचे शतक यांच्या साहाय्याने भारताने ३-कमी-४०० धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ५ बाद १७० धावांवर चौथ्या दिवशी संध्याकाळी घोषित केला. भारतीयांना सामना जिंकण्यासाठी एका दिवसात ३४८ धावांचे आव्हान मिळाले. या खेपेला गावसकरने ९० धावा केल्या. कपिल देवची १ धाव वगळता बिनीच्या सर्वच फलंदाजांनी ‘धावदान’ दिले आणि सामना हळूहळू अत्यंत रंगतदार अवस्थेकडे जाऊ लागला. दिवसात किमान ८७ षटक्र फेकली जाणे अपेक्षित होते. ६ बाद ३३० धावा झालेल्या असताना किमान ५ षटकांचा खेळ बाकी होता. ५ षटके आणि १८ धावा असे आव्हान होते.रे ब्राईटच्या पुढच्या षटकात चेतन शर्मा आणि किरण मोरे बाद झाले. अचानक निकालाच्या चार शक्यतांपैकी भारत पराभूत होणार ही शक्यता जास्त जाणवू लागली पण एका बाजूने रवी शास्त्री उभा होता. शिवलाल यादवने मॅथ्यूजला षटकार खेचला पण त्याच्या दांड्या उडवून मॅथ्यूजने ते वादळ शांत केले.९ बाद ३४४. शेवटची जोडी. मनिंदर सिंग फ
दाज क्र. ११. भारताला जिंकण्यासाठी चार धावांची गरज. मनिंदर सिंग आणि रवी शास्त्री या जोडीने ८ चेंडू खेळून काढले तर
सामना अनिर्णित
राहणार होता. दोन चेंडू मनिंदरने खेळून काढले. शेवटच्या षटकासाठी सुकाणू रवी शास्त्रीकडे गेले.मॅथ्यूज. त्याच्या दुसर्या चेंडूवर शास्त्रीने २ धावा घेतल्या. तिसर्या चेंडूवर त्याने एकेरी धाव काढली आणि तीच अखेर नडली….भारत हरणार नाही हे स्पष्ट झाले पण दोन-तीन चेंडूंचा साथीदार अशी सार्थ ओळख असलेल्या मनिंदराला बाद करण्यासाठी तीन राजरोस चेंडू मॅथ्यूजकडे होते. त्याला तेवढे लागले नाहीत. पाचव्या चेंडूवर मनिंदर पायचित दिला गेला. ४८ धावा काढलेला रवी शास्त्री नाबाद राहिला.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply