२४ डिसेंबर १९३२ रोजी भारतातील बंगळुरात एका इंग्लिश दांपत्याला पुत्रप्राप्ती झाली. वडील क्रिकेटवेडे असल्याने या बालकाचे नामकरण मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या आद्याक्षरांवरून मायकेल कोलिन कौड्री असे ठेवले गेले (एमसीसी).
जुलै १९४६ मध्ये, अर्थात वयाच्ता तेराव्या वर्षी कोलिन लॉर्ड्सवर पदार्पण करता झाला, एका आंतरशालेय सामन्यात खेळून. आजही तो लॉर्ड्सवर सर्वात लहान वयात खेळलेला खेळाडू आहे. या सामन्यात त्याने ७५ आणि ४४ धावा काढल्या आणि आठ गडी बाद केले. चार वर्षांनंतर केंट संघाकडून त्याने पदार्पण केले आणि १९७६ मधील निवृत्तीपावेतो तो केंटचा खेळाडू राहिला.
१९५४-५५ च्या हंगामात ज्या इंग्लिश संघाने ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडचा दौरा केला त्या संघात कौड्रीचा समावेश होता. बॉक्सिंग डे कसोटीत (थोडी प्रतीक्षा….) त्याने मेलबर्नवर शतक झळकावले. १९५९ मध्ये पहिल्याप्रथम तो इंग्लंड संघाचा कर्णधार झाला- जन्मदेशाविरुद्ध. सत्तावीस कसोट्यांमध्ये त्याने इंग्लंडचे नेतृत्व केले.
१९६३ मध्ये लॉर्ड्सवर विंडीजविरुद्धच्या कसोटीत एक मनगट प्लॅस्टरमध्ये बांधलेले असताना कौड्री फलंदाजीच्या तयारीने मैदानात आला ! नशीब त्याला चेंडूचा सामना करावा लागला नाही, करावा लागला असता तर आपण तो एकाच हातात बॅट धरून केला असता असे कौड्री सांगतो ! कौड्रीच्या या धाडसामुळे तो सामना अनिर्णित राहिला. अन्यथा इंग्लंड पराभूत झाले असते.
१९७४-७५ च्या हंगामात क्रिसमसच्या तोंडावर कौड्रीला कसोटीसंघात बोलावणे आले होते (पहा १३ डिसेंबर) आणि ऑस्ट्रेलियाई माध्यमांनी त्याची चिकार टर उडवली होती.
शंभर कसोटी सामने खेळणारा कसोटिहासातील पहिला खेळाडू म्हणजे कोलिन कौड्री. शंभरहून अधिक प्रथमश्रेणी शतके काढणार्या अगदी मोजक्या खेळाडूंमध्ये कौड्रीचा समावेश आहे. एके क ळी कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक धावा जमविण्याचा विक्रम कौड्रीच्या नावावर होता.
४ डिसेंबर २००० रोजी कोलिन कौड्री निवर्तले.
<किमान शंभर कसोट्या
खेळलेले खेळिये
सचिन तेंडुलकर- १७५.
स्टीव वॉ- १६८.
अॅलन बॉर्डर- १५६.
रिकी पॉन्टिंग- १५१.
राहुल द्रविड- १४८
शेन वॉर्न- १४५.
जॅक कॅलिस- १४३.
मार्क बाऊचर- १३७.
मुथय्या मुरलीदरन- १३३.
अॅलेक स्टेवर्ट- १३३.
अनिल कुंबळे-१३१.
कोर्टनी वॉल्श- १३१.
कपिल देव- १३१.
शिवनरीन चंदरपॉल- १२९.
मार्क वॉ- १२८
सुनील गावसकर- १२५.
जावेद मियांदाद- १२४.
ग्लेन मॅग्रा- १२४.
विविअन रिचर्ड्स- १२१.
इंझमाम-उल-हक- १२०.
इअन हिली- ११९.
ग्रॅहम गूच- ११८.
वांगीपुरपू लक्ष्मण- ११८.
डेविड गॉवर- ११७.
डेस्मंड हेन्स- ११६.
महेला जयवर्दने- ११६.
दिलीप वेंगसरकर- ११६.
माईक आथर्टन- ११५.
कोलिन कौड्री- ११४.
सौरव गांगुली- ११३.
स्टीफन फ्लेमिंग- १११.
चमिंडा वाज- १११.
सनथ जयसुरिया- ११०.
क्लाईव लॉयड- ११०.
ज्येफ बॉयकॉट- १०८.
गॉर्डम ग्रिनीज- १०८.
शॉन पोलॉक- १०८.
डेविड बून- १०७.
जस्टिन लँगर- १०५.
मार्क टेलर- १०४.
वसिम अक्रम- १०४.
मॅथ्यू हेडन- १०३.
सलीम मलिक- १०३.
डॅनिएल वेटोरी- १०३.
इअन बोथम- १०२.
कार्ल हूपर- १०२.
गॅरी कर्स्टन- १०१.
मखाया एन्टिनी- १०१.
ग्रॅहम थॉर्प- १००.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply