नवीन लेखन...

सप्टेंबर २५ – ‘हॅन्सी’ क्रोनिए आणि मॅडम क्लेअर



२५ सप्टेंबर १९६९ रोजी एका दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचा जन्म झाला. वेसल जोहान्नेस ‘हॅन्सी’ क्रोनिए हे त्याचं नाव. सामन्यांच्या निकालाची पूर्वनिश्चिती करणार्‍या प्रवृत्तींच्या अस्तित्वाचा एक थेट आणि विश्वासार्ह पुरावा हॅन्सीकडून सर्वप्रथम आला होता. फेब्रवारी १९९२ मध्ये एदिसा तर एप्रिल १९९२ मध्ये कसोटीपदार्पण हॅन्सीने साजरे केले. गोलंदाज म्हणून हॅन्सी अत्यंत प्रभावी ठरला आणि संघाला गरज असताना तो हमखास धावा काढी. या सगळ्यापलीकडे त्याचे नेतृत्वही उठून दिसणारे होते. अत्यंत शिस्तप्रिय आणि चतुर कप्तान अशी त्याची ओळख होती. १९९४ ते २००० या काळात ५३ कसोट्या आणि १३८ एदिसांमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले. पुनरागमनानंतरच्या दक्षिण आफ्रिकेचा तो एक राजदूत समजला जात होता.भारत दौर्‍यावर असताना नवी दिल्ली पोलिसांनी केलेल्या एका गुप्त तपासानुसार सामन्यांसंबंधीची संवेदनशील माहिती लाच स्वीकारून बुकींना दिल्याचा आरोप क्रोनिएवर ठेवण्यात आला. त्याचा त्याने जोरदार इन्कार केला. त्याचे घराणे आफ्रिकेतील एक प्रतिष्ठित घराणे होते (त्याचे वडील प्रथमश्रेणी खेळलेले होते). द. आफ्रिका मंडळाचे अध्यक्ष अली बाकर यांनीही अशा कृत्याचा इन्कार केला पण आरोपांनंतर ४ दिवसांनी अली बाकर यांना पहाटे ३ वाजता दूरध्वनी करून हॅन्सीने आपण ‘पूर्णपणे प्रामाणिक’ नसल्याची कबुली दिली आणि क्रिकेटच्या इतिहासातील एका वादळी पर्वाला आरंभ झाला.‘सैतानाने आपली बुद्धी भ्रष्ट केली होती’ असे हा कर्णधार नंतर म्हणाला. एका मालवाहू विमानातून आपल्या घराकडे परतत असताना (१ जून २००२) नियतीने त्याचा बळी घेतला. दोन्ही वैमानिकही मारले गेले. क्रोनिए हा त्या विमानातील एकटाच ‘प्रवासी’ होता. त्याच्या मृत्यूनंतर आणि नंतर २००९ च्या विश्वचषकादरम्यान झालेल्या बॉब वूल
मर यांच्या मृत्यूनंतरही क्रिकेटच्या सामन्यांच्या निकालाची पूर्वनिश्चिती करणार्‍या आंतरराष्ट्रीय गटाने त्याची हत्या घडवून आणल्याची चर्चा झाली.

२५ सप्टेंबर १९७५ रोजी समंथा क्लेअर टेलरचा जन्म झाला.

आपल्या फलंदाजीने समग्र क्रिकेटविश्वाचे लक्ष

वेधून घेणार्‍या क्लेअरच्या नावावर काही उल्लेखनीय विक्रम आहेत.कॉलेजात असतानाच क्लेअरने कॉलेजच्या हॉकी संघाचे नेतृत्व केले होते. ती क्रिकेटही उत्तम खेळे. व्हायोलिनवादक म्हणूनही ती विख्यात आहे आणि गणितातील मास्टर्स ही पदवी तिने मिळविलेली आहे. ऑक्सफर्डमधून शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील एक व्यवस्थापकीय नोकरी स्वीकारली पण क्रिकेटचे वेड तिला स्वस्थ बसू देईना.२००१ मध्ये क्लेअरने नोकरी सोडून पूर्ण वेळ क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. महिला क्रिकेटमधून मिळणारी पुंजी तुटपुंजी असल्याने तिला या निर्णयानंतर आपल्या पालकांकडे राहण्यासाठी जाणे भाग पडले. याच वर्षी तिने आपल्या अक्सोटी कार्किर्दीतील पहिले शतक झळकावले – ऑस्ट्रेलियाविरुद्ध हेडिंग्लेत.१४ ऑगस्ट २००६ रोजी लॉर्डसवर झालेल्या भारताविरुद्धच्या सामन्यात क्लेअरने १५१ चेंडूंवर नाबाद १५६ धावा तडकावल्या. लॉर्ड्सवरील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील ही आजवरची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. त्यापूर्वी हा विक्रम एका पुरुषाच्या नावे होता – व्हिव रिचर्ड्स – १९७९ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नाबाद १३८ धावा. २००९ च्या विश्वचषकविजेत्या इंग्लंड संघात क्लेअर होती. या विश्वचषकादरम्यान तिने आपल्या कारकिर्दीतील आठवे शतक पूर्ण केले – महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा विक्रम आहे.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..