नवीन लेखन...

सप्टेंबर २६ – विजय मांजरेकर आणि इअन ‘चॅपेली’



२६ सप्टेंबर १९३१ रोजी तेव्हाच्या बॉम्बेत विजय लक्ष्मण मांजरेकरांचा जन्म झाला. वेगवान गोलंदाजांना सफलपणे तोंड देऊ शकणारे फलंदाज भारताकडे जवळजवळ नसण्याच्या काळात त्यांनी वेगवान गोलंदाजी खेळण्याचे दंडक घालून देण्याजोगी फलंदाजी केली.१९५२ मध्ये, वयाच्या विसाव्या वर्षी हेडींग्लेवर इंग्लंडविरुद्ध त्यांनी शतकी खेळी केली. ते फलंदाजीला आले तेव्हा संघाची अवस्था ३ बाद ४२ अशी झालेली होती. कप्तान विजय हजारे आणि मांजरेकर विजय यांनी चौथ्या गड्यासाठी २२२ धावांची भागीदारी केली. आजही भारत-इंग्लंड सामन्यांदरम्यानचा हा विक्रम आहे. फ्रेड ट्रूमन, अलेक बेडसर आणि जिम लेकरसारखे गोलंदाज तेव्हा इंग्लंडच्या संघात होते. ५५ कसोटी सामन्यांमधून ३९.१२ च्या सरासरीने ७ शतकांसह त्यांनी ३,२०८ धावा जमविल्या. त्यांच्या नावावर एक कसोटी बळीदेखील आहे. मुंबई, महाराष्ट्र, आंध्र, बंगाल, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या संघांकडून ते प्रथमश्रेणी खेळले. ऑक्टोबर १९८३ मध्ये चेन्नईत त्यांचे निधन झाले. विख्यात भारतीय कसोटीपटू संजय मांजरेकर हा त्यांचा मुलगा.

२६ सप्टेंबर १९४३ रोजी इअन मायकल चॅपेलचा जन्म झाला. ‘चॅपेली’ या नावाने तो ‘लाडका’ आहे. अनेक लेखक-विश्लेषकांच्या मते इअन चॅपेल हा क्रिकेटच्या सर्वश्रेष्ठ कर्णधारांपैकी एक आहे. मालिकेआधी आणि सामन्यांदरम्यानही शब्दांचा अस्त्र म्हणून वापर करण्यास प्रारंभ त्यानेच केला. १९७० च्या दशकात ऑस्ट्रेलियाई क्रिकेटमध्ये आलेल्या धंदेवाईकपणामागे चॅपेलीच होता. ‘वर्ल्ड सिरीज क्रिकेट’ किंवा पॅकर सर्कस या नावाने ओळखल्या जाणार्‍या इंप्रिलीच्या पूर्वरूपाच्या प्रणेत्यांमध्येही तो होता.त्याच्या काही खास लकबी होत्या. फलंदाजी सुरू असताना आपले कपडे आणि संरक्षक वस्तू जागच्या जागी असल्याची पुन्हा पुन्हा खात्री करणे, गोलंदाज फेकीपूर्वीची धाव घेत असताना अतिशय अस्वस्थपणे आणि जलदगतीने बॅट आपटत राहणे ह्या त्यांपैकी काही उल्लेखनीय. हुक हा त्याचा खास फटका होता. ‘एका

षटकात तीन उसळे चेंडू असायला माझा विरोध नाही, कारण त्यांचा माझ्यासाठी अर्थ १२ धावा

असा होतो” असे तो म्हणे.आपल्या क्रिकेट कारकिर्दीवर सर्वात जास्त प्रभाव कुणाचा असेल तर इअन चॅपेलचा असे शेन वॉर्नचे म्हणणे आहे.

१९७१ ते १९७५ या काळात चॅपेलीने कांगारूंच्या संघाचे नेतृत्व केले. १९७६ मध्ये त्याचे चॅपेली नावाचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. नंतर तो स्तंभलेखक, रेडिओ समालोचक आणि दूरदर्शन समालोचकही झाला. सध्या तो दक्षिण आफ्रिकेत चॅम्पिअन्स लीगच्या समालोचन चमूत आहे.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..