स्वातंत्र्य दिन – पेरू
घडामोडी
१५४० – दरबारी राजकारणात इंग्लंडचा राजा हेन्री आठव्याने थॉमस क्रॉमवेलला मृत्युदंड दिला.
१९५० – मनुएल ओड्रिया पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
१९५६ – मनुएल प्राडो उगार्तेशे पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
१९६३ – फर्नान्डो बेलॉँडे टेरी पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
जन्म
१९२९ – जॅकलीन केनेडी-ओनासिस, जॉन एफ. केनेडीची पत्नी.
१९३८ – आल्बेर्तो फुजिमोरी, पेरूचा राष्ट्राध्यक्ष.
१९४५ – जिम डेव्हिस, अमेरिकन व्यंगचित्रकार.
मृत्यू
१८४९ – चार्ल्स आल्बर्ट, सार्डिनियाचा राजा.
१९३४ – लुइस टँक्रेड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९६८ – ऑट्टो हान, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
ऐतिहासिक घडामोडी
२८ जुलै १६८२ : फ्रान्सिको ताव्होरा, आल्वोरचा काउंट हा सन १६८१ पासून १६८६ पर्यंत गोव्याचा मुख्य गव्हर्नर असून संभाजी कदाचित गोवा हस्तगत करून आपला उठाव करेल या भीतीने शक्य तितक्या उपायांनी गोव्याचा बचाव करण्याच्या तयारीत होता. आजच्या दिवशी संभाजी राजांना पत्र पाठवून नुकत्याच झालेल्या पुत्राच्या ( शाहू ) गोष्टीचे अभिनंदन केले.
२८ जुलै १६८२ :
मराठ्यांच्या वकीलामार्फत शंभूराजाला पुत्र झाल्याचे जेव्हा विजरईला समजले तेव्हा त्याने शंभूराजांना पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केले व नवीन जन्मलेल्या पुत्रास ( शाहूस ) एक दागिना नजर केला.
२८ जुलै १६८२ : संभाजी राजांनी येसाजी गंभीरराव बरोबर विजरईला दुसरे पत्र लिहून कळवले कि, ‘डिचोली व कुडाळ यांच्या परिसरात आपण २ दारूचे ( तोफांची दारू ) कारखाने उभारले असून कर्नाटकात व मलबारमध्ये तोफा, गंधक हे सामान विकत घेण्याची परवानगी मिळाली आहे तरी त्यास पोर्तुगीज आरमाराकडून अडथळा निर्माण होऊ नये. यानंतर, आजच्या दिवशी विजरईने पत्र लिहून महाराजांच्या सर्व मागण्या मान्य केल्या.
Leave a Reply