२९ सप्टेंबर १९४१ रोजी “युद्धासाठी खास बोलविण्यात आलेल्या बँक कारकुनाचा” जन्म झाला. १९७५ साली वयाच्या ३३ व्या वर्षी लिली आणि थॉम्सनविरुद्ध त्याला पाचारण करण्यात आले तेव्हा वृत्तपत्रांनी डेविड स्टीलचे असेच वर्णन केले होते. स्टील त्या वेळी प्रथमश्रेणीतून निवृत्त होणयचा विचार करीत होता. टोनी ग्रेगने त्याचा तशातच इंग्लिश क्रिकेट संघात समावेश करविला. चष्मा लागलेला आणि अर्धेअधिक केस कायमचे पांढरे झालेल्या अवस्थेत डेविडने तिखट मार्याचा नेटाने सामना करीत ६०.८३ च्या सरासरीने ३६५ धावा काढल्या. लॉर्ड्सवर पदार्पणात त्याने ५० आणि ४५ धावा काढल्या.
एकूण ८ कसोटी सामन्यांमधून ४२ च्या सरासरीने त्याने ६७८ धावा जमविल्या. एका एदिसातून ८ धावा त्याने काढल्या. तो तुफान लोकप्रिय ठरला. १९७५ साली बीबीसीने घेतलेल्या सर्वेक्षणात वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटू म्हणून त्याची निवड झाली. हे वर्ष स्टील मदतनिधी वर्ष म्हणून पाळण्यात आले. एका स्टीलप्रेमी स्थानिक खाटकाने त्याच्या प्रत्येक प्रथमश्रेणी धावेसाठी त्याला मांसाचा एक तुकडा देण्याचे ठरविले. मोसमाअखेर असे सत्राशे छप्पन तुकडे (खरोखरच) स्टीलला मिळाले.
लान्स गिब्ज २९ सप्टेंबर १९४१ रोजी कसोट्यांमध्ये सर्वप्रथम ३०० बळी घेणार्या फिरकीपटूचा जन्म झाला. लान्स्लॉट रिचर्ड गिब्ज त्याचं नाव. जन्मस्थान जॉर्जटाऊन, ब्रिटिश गुयाना. सडपातळ अंगकाठी आणि लांबसडक बोटे असणार्या गिब्जने ७९ कसोट्यांमधून ३०९ बळी घेतले. फ्रेड ट्रूमननंतर ३०० बळींचा टप्पा गाठणारा तो पहिलाच. या बळींमध्ये १८ पाच बळींचे गठ्ठे होते. षटकामागे कारकिर्दीत त्याने सरासरी धावा दिल्या १.९९. वेस्ट इंडीजच्या ऑस्ट्रेलिया दौर्यात पहिल्या दोन सामन्यांमध्ये तो संघाबाहेर राहिला पण सिडनीत त्याने चार चेंडूंमध्ये तीन गडी बाद केले आणि नंतर अडलेडमध्ये त्रिक्रम साधला. बार्बडोस्मध्ये भारताविरुद्ध ५३.३-३७-३८-८ असा त्याचा धडाका कायम अरहिला. हे आठ बळी १५ षटकांच्या अवकाशात फक्त सहा धावांच्या मोबदल्यात आले होते. गिब्ज याहून चांगली कामगिरी कधी करू शकला नाही.
फलंदाज म्हणून तो अगदीच लल्लू होता. प्रथमश्रेणीत त्याला कधीही पन्नाशी गाठता आली नाही – ४३ ही त्याची एका डावातील सर्वोच्च धावसंख्या आहे. निवृत्तीनंतर तो अमेरिकेत स्थायिक झाला आहे. क्लाईव लॉईड हा त्याचा चुलतभाऊ. दोघे राष्ट्रीय संघासाठी बर्याचदा एकत्र खेळलेले आहेत. ३ एदिसांमधून गिब्जने २ बळी मिळविले आणि एदिसांमध्ये आपल्या धावांचे खाते त्याला उघडता आले नाही.
खूपच चांगली आहे. नंतर त्याने कॅनडा, विंडीज या संघांना प्रशिक्षण दिले. आता तो बर्मुडाचा प्रशिक्षक आहे. त्याच्या प्रशिक्षकपदाच्या काळातच त्याच्या मायभूमीच्या संघाने (बर्मुडा) विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळविली.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply