पोंद्या वॉर्नर आणि बुधी कुंदरनग्रॅन्ड ओल्ड मॅन ऑफ इंग्लिश क्रिकेट किंवा ‘पोंद्या’ या नावाने ओळखल्या जाणार्या सर पेलहॅम फ्रान्सिस वॉर्नरचा जन्म २ ऑक्टोबर १८७३ रोजी त्रिनिदादमध्ये झाला. वॉर्नर प्रथमश्रेणी क्रिकेट मात्र ऑक्स्फर्ड विद्यापीठ, मिडलसेक्स आणि इंग्लंडकडून खेळला. विज्डेनचा वर्षातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू हा मान एकदाही मिळणे कठीण असते पण पोंद्याला तो दोनदा मिळाला – १९०४ आणि १९२१ मध्ये. १८९८-९९ च्या हंगामात पदार्पणातच त्याने जोहान्सबर्गमध्ये नाअबद १३२ धावा काढल्या. या सामन्यात दुसरा कोणताही इंग्रज तिशीही ओलांडू शकला नव्हता. कारकिर्दीत खेळलेल्या १५ कसोट्यांपैकी २/३ मध्ये तो इंग्लंडचा कर्णधार होता. त्याच्या नायकपदाच्या कारकिर्दीत प्रथमच इंग्लंडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका गमाविण्याची ‘कामगिरी’ केली.१९२१ मध्ये द क्रिकेटर नावाचे नियतकालिक पोंद्याने सुरू केले. १९३२-३३ च्या हंगामातील इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिका शरीरवेधी गोलंदाजीमुळे गाजली होती. या मालिकेत पोंद्या वॉर्नर इंग्लिश संघाचा व्यवस्थापक होता. १९६३ मध्ये वॉर्नरचे निधन झाले. त्याची रक्षा लॉर्डसवरील त्याच्याच नावाच्या स्टँडसमोर विखुरण्यात आली.२ ऑक्टोबर १९३९ रोजी कर्नाटकातील मंगलोरजवळील मल्कीत बुधिसागर कृष्णाप्पा कुंदरन यांचा जन्म झाला. आपल्या कारकिर्दीत संघातील त्यांची मुख्य भूमिका यष्टीरक्षकाची राहिली. भारताकडून १८ कसोट्या ते खेळले. १९५० च्या द्शकात भारताकडे नरेन ताम्हाणे, प्रोबीर सेन आणि नाना जोशी असे तोडीस तोड यष्टीरक्षक होते. जोशी आणि ताम्हाणेंना एक एक कसोटी दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील तिसर्या कसोटीत बुधींना संधी मिळाली. पहिल्याच कसोटी डावात ते स्वयंचित झाले पण पुढच्या कसोटीत त
्यांनी ७१ आणि ३३ धावा काढल्या. साठच्या दशकात फारूख एंजिनिअर हा नवा प्रतिस्पर्धी बुधींना मिळाला. काही कसोटी मालिकांमध्ये ते एकत्र खेळले. १९६३-६४ च्या हंगामात भारत दौर्यावर आलेल्या इंग्लंडविरुद्ध फारूखची निवड यष्टीरक्षक म्हणून झाली होती
पण ते तंदुरुस्त नसल्याने बुधींना संधी मिळाली. सलामीला येऊन पहिल्या दिवस अखेर बुधी १७०
धावांवर नाबाद राहिले. ३१ चौकारांसह त्यांनी १९२ धावा काढल्या. यापुर्वी त्यांनी अकराव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. आता पहिल्या क्रमांकावर ! मालिकेतील दिल्ली कसोटीतही त्यांनी शतक काढले. या मालिकेत त्यांनी एकूण ५२५ धावा काढल्या.पुढच्या मालिकेसाठी भारतीय निवडकर्त्यांनी फारूख आणि बुधी दोघांनाही वगळून के एस इंद्रजितसिंहजींची निवड केली !! झीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी पुन्हा दोघे संघात आले. फारूख यष्टीरक्षक तर जखमी दिलीप सरदेसाईंच्या जागी बुधी सलामीवीर. १९६६-६७ च्या हंगामात मुंबईत त्यांनी विंडिजविरुद्ध ७९ धावा काढल्या. या डावात सुरुवातीला झेलबाद झाल्याचे समजून ते परत निघाले होते पण गॅरी सोबर्सने स्वतःहून एका टपनंतर आपण चेंडू पकडल्याचे सांगितले होते. एकाच कसोटीत सलामीवीर आणि काही खासविक्रम :सलामीचा गोलंदाजही !!रणजी पदार्पणात द्विशतक. (जॉर्ज अबेल, गुंडाप्पा विश्वनाथ, अमोल मुजुमदार आणि अंशुमन पांडे यांनीही अशी कामगिरी केलेली आहे.)रणजी करंडक सुरू झाल्यानंतर रणजी सामना न खेळता थेट कसोटी खेळणारे बुधी कुंदरन पहिलेच. (त्यांच्यानंतर दोन – विवेक राझदान आणि पार्थिव पटेल.)
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply