घडामोडी
७६२ : खलिफा अल-मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.
१५०२ : क्रिस्टोफर कोलंबस आपल्या चौथ्या सफरीदरम्यान होन्डुरासच्या किनाऱ्याजवळील बे आयलँड्स बेटांतील ग्वानाहा येथे उतरला.
१६२९ : इटलीच्या नेपल्स शहरात भूकंप. सुमारे १०,००० ठार.
१७२९ : बाल्टिमोर शहराची स्थापना.
१८११ : शिवावा, मेक्सिको येथे स्पॅनिश राज्यकर्त्यांनी फादर मिगेल हिदाल्गो इ कॉस्तियाला मृत्युदंड दिला.
१८६६ : न्यू ऑर्लिअन्स येथे राजकीय पक्षाच्या बैठकीवर पोलिस हल्ला. ४० ठार, १५० जखमी.
१८७१ : वेस्टफील्ड या स्टेटन आयलंड फेरीबोटीवर स्फोट. ८५ ठार.
१९३० : उरुग्वेने माँटेव्हिडीयोमध्ये पहिला फिफा विश्वचषक जिंकला.
१९४५ : दुसरे महायुद्ध – जपानच्या आय-५८ या पाणबुडीने अमेरिकेची युएसएस इंडियानापोलिस ही नौका बुडवली. ८८३ ठार.
१९६५ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सनने सोशल सिक्युरिटी ऍक्ट ऑफ १९६५वर सही करून मेडिकेर व मेडिकेडची रचना केली.
१९७१ : अपोलो १५ चंद्रावर उतरले.
१९७१ : मोरियोका, जपान येथे ऑल निप्पॉन एरवेझच्या बोईंग ७२७ आणि जपानी वायुसेनेच्या एफ-८६ विमानांची टक्कर. १६२ ठार.
१९८० : व्हानुआतुला स्वातंत्र्य.
२००६ – इस्रायेली वायुसेनेच्या हल्ल्यात १६ बालकांसह २८ असैनिकी व्यक्ती ठार.
२०१४ – पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० पेक्षा अधिक ठार.
जन्म
१९४७ – आर्नोल्ड श्वार्झनेगर, ऑस्ट्रियाचा अभिनेता व कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर.
१९७३ – सोनू निगम, पार्श्वगायक.
मृत्यू
१९४७ – जोसेफ कूक, ऑस्ट्रेलियाचा सहावा पंतप्रधान.
१९९४ – शंकर पाटील, मराठी लेखक.
Leave a Reply