३० डिसेंबर १९३२ या दिवशी कसोटीविश्वातील सर्वोत्तम सार्वकालिक फलंदाज मानले जाणारे सर डॉन ब्रॅडमन कसोटी कारकिर्दीत प्रथमच पहिल्या चेंडूवर बाद झाल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध आहे. याआधी एकदा कसोटी कारकिर्दीत ते शून्यावर बाद झालेले होते पण त्या सामन्यात त्यांनी सामना केलेल्या चेंडूंची संख्या उपलब्ध नाही.
३० डिसेंबर १९३२ या दिवशीच अॅशेस मालिकेतील दुसरी कसोटी मेलबर्न क्रिकेट मैदानावर सुरू झालेली होती. करारासंबंधीच्या एका प्रश्नावर मंडळाशी मतभेद झाल्याने पहिल्या कसोटीत ब्रॅडमन खेळले नव्हते. दुसर्या कसोटीत यजमान कांगारू कर्णधाराने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. सलामीवीर वुडफूल १० धावांवर परतला. मग त्याच्या जागी आलेला ओब्रायनही १० धावांवर परतला. चौथ्या क्रमांकावर आलेले डॉन ब्रॅडमन पहिल्याच चेंडूवर त्रिफळाबाद झाले. गोलंदाज होता बिल बोव्ज.
सर डॉन ब्रॅडमन यांचे कसोटी सामन्यांमधील शून्य धावांचे डाव असे :
कसोटी १४ : त्रिफळाबाद गोलंदाज हर्मान ग्रिफिथ. चेंडूंची संख्या उपलब्ध नाही.
कसोटी २० : त्रिफळाबाद बिल बोव्ज. चेंडू १.
कसोटी २९ : झेल आर्थर फॅग गो. गबी अॅलन. चेंडू २.
कसोटी ३० : झेल गबी अॅलन गो. बिल वोज. चेंडू १.
कसोटी ४१ : त्रिफळाबाद गोलंदाज अॅलेक बेडसर. चेंडू ९.
कसोटी ४८ : झेल लेन हटन गो. अॅलेक बेडसर. चेंडू १०.
कसोटी ५२ : त्रिफळाबाद गोलंदाज एरिक हॉलीज. चेंडू २.
किमान ५ वेळा ब्रॅडमनचा बळी मिळविणारे गोलंदाज :
हेडले व्हेरिटी (इंग्लंड) : तब्बल ८ वेळा.
अॅलेक बेडसर (इंग्लंड) : ६ वेळा.
मॉरिस टेट (इंग्लंड) : ५ वेळा.
बिल बोव्ज (इंग्लंड) : ५ वेळा.
हॅरॉल्ड लार्वूड (इंग्लंड)
: ५ वेळा.
ब्रॅडमनचा बळी मिळविण्यात केवळ दोनच भारतीय गोलंदाजांना यश मिळाले. तेही एकेकदाच . पहिले दत्तू फडकर आणि दुसरे लाला अमरनाथ.
बाद होण्याच्या पद्धतींचे प्रमाण :
कारकिर्दीतील एकूण ८० डावांपैकी १० डावांमध्ये ब्रॅडमन नाबाद राहिले.
कधीही यष्टीचित, उशिरा आल्यामुळे वा क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याने बाद नाही.
एकदा स्वयंचित गो. लाला अमरनाथ. (१.४ %)
एकदा धावबाद. (१.४ %)
सहादा पायचित (८.६ %)
दहादा यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद (१४.३ %)
तेवीसदा त्रिफळाबाद (३२.९ %)
एकोणतीसदा झेलबाद (यष्टीरक्षकाव्यतिरिक्त) (४१.४ %)
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply